किरोच्या नजरेतून - जन्मतारखेनुसार भविष्य..

7 ते 13 ऑक्टोबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून - जन्मतारखेनुसार भविष्य..
जन्मतारखेनुसार भविष्य..Future By Date Of Birth

ऑक्टोबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी प्लूटो, द्वितीयात शनि-गुरू, तृतीयात नेपच्यून, पंचमात राहू, दशमात रवि-मंगळ-बुध, व्ययात शुक्र-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धर्नुधारी सज्ज पुरूषाचा हसा पुरूष मुखरहित घोड्यावर बसलेला आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव. द्विस्वभावी रास असल्याने निर्णय घेण्यास विलंब होतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष असल्याने काही बायकांचे वागणे पुरूषी थाटाचे . वर्ण क्षत्रिय. स्वभाव- क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर आहे. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस - गुरूवार, देवता- विष्णू, मित्र राशी- मेष व सिंह, शत्रु राशी - कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकपणा, मुडी स्वभाव, स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण.

दशमस्थानीतील रविमुळे खात्रीने महत्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांचा याची जास्त प्रचिती येईल. निवडणुकीच्या संदर्भात पुढार्‍यांना विशेष प्रचारकार्य करण्यात यश येईल. पितृसुख उत्तम लाभेल.

स्त्रियांसाठी - द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी -माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा - 2, 3, 8, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 24,26, 28, 29

नोव्हेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात शनी- गुरू- प्लुटो, तृतीयात -नेपच्यून, पंचमात हर्षल, षष्ठात राहू , लाभात रवि-मंगळ-बुध, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू साध्य होतील. शत्रुंना गोड बोलून वश कराल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापकांचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास प्रगती होईल.

पंचमात हर्षल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास तो सोडा. यश मिळण्याची शक्यता नाही. संततीविषयक काही त्रास संभवतो. विवेकाची कास धरावी. संततीच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी.

द्वितीयात शनी आहे. आर्थिक व्यवहार जपून करावे. भागीदारीच्या व्यवसायात सतर्क रहावे किंवा शक्यतो टाळावेत.

स्त्रियांसाठी - व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात शनि-प्लुटो, तृतीयात गुरु-नेपच्यून, पंचमात हर्षल, षष्ठात राहू, लाभात मंगळ, व्ययात रवि-बुध-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तीक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. पण मित्रांची पारख आवश्यक आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगती ठेवल्यास भांडणाचे वारंवार प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

तृतीयात गुरू असता मनुष्य पराक्रशील असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कंजूसपणा करण्याकडे कल राहील. बांधवाकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. विशेष पराक्रम न करता भाग्यवृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.

स्त्रियांसाठी - लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा - 1, 3, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21,24 , 25, 27, 28

7 ऑक्टोबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, नेपच्यून, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य तुला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता समतोल राखण्याची कला अवगत केल्यास असामान्य बुद्धीमुळे महत्त्वाकांक्षा सहज पूर्ण करू शकाल. काव्य, साहित्य, संगीत, कला अशा प्रकारच्या कोणत्याही कलेमध्ये फार उत्तम यश मिळेल. स्वभाव अतिशय संवेदनशील आहे. कधी एकदम श्रीमंत तर कधी एकदम साधारण अशी आर्थिक परिस्थिती राहील.

8 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. वारसाहक्काने संपत्ती मिळालेली असल्यास जीवन सुरळीतपणे चालेल. अन्यथा कष्ट करण्याची आवड नसल्यामुळे आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असल्यामुळे डॉक्टर,वैज्ञानिक, वकीली अशा व्यवसायात उत्तम यश मिळेल. महिलांना सामाजिक विषयात लेखन करणे आवडेल.

9 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. प्रत्येक काम घाईने व विचार न करता करण्याच्या सवयीमुळे अनेक लोक तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. किंबहूना भांडणाची आवड आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मुत्सद्दीपणाने वागल्यास जीवनात प्रगती होऊ शकेल. जबाबदारीची पदे व अधिकार स्वतःहून चालत आल्यामुळे आर्थिक बाबतीत नेहमी सुस्थिती राहील.

10 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, व्यक्तीमत्व बहुआयामी आहे. आपल्या अवतीभवती शांतता असावी यासाठी प्रयत्नात असाल. दुसर्‍यांच्या भांडणात हस्तक्षेप करून ते मिटवणे चांगले जमेल. दांडगी महत्त्वाकांक्षा असली तरी जबाबदारीमुळे पुढे जाणे कठीण होईल. बौद्धीक कार्यात उत्तम धनप्राप्ती होईल.

11 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनि, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. प्रत्येक कामात अदृश्य शक्तीची मदत असल्यासारखे स्वप्नाद्वारे किंवा अन्य मार्गाने संदेश मिळतील. जीवनात पुढे जाताना दैवी शक्तीचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे याची जाणीव होत राहील. जवळच्या लोकांमुळे कधी कधी आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.

12 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या गुरू, शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. इच्छाशक्ती प्रबळ राहील. घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कृती केल्याशिवाय चैन पडणार नाही. जीवनात यश मिळवण्याच्या दृष्टीने ग्रहांची चौकट चांगली आहे. आर्थिकदृष्ट्या भाग्यवान आहात. व्यापार, आर्थिक उलाढाल किंवा उद्योगात उत्तम आर्थिक यश मिळेल.

13 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. हर्षल आणि शनी यांच्या एकत्रित प्रभावामुळे जीवनात अनेक बदल व विचीत्र अनुभव संभवतात. त्यातल्या त्यात शुक्र निर्बल असल्याने विवाहाच्या बाबतीत वेगळ्या प्रकारचे अनुभव येतील. आयुष्यात अनेक विचीत्र मंडळींशी संबंध येत राहील. ज्यांच्या भौतिक प्रगतीसाठी काही उपयोग होणार नाही. भागीदारीच्या बाबतीत आर्थिक फायदा तर बाजूलाच राहून त्यांच्यासाठी झीज सोसावी लागेल.

सौ. वंदना अनिल दिवाणे

Related Stories

No stories found.