Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून - जन्मतारखेनुसार भविष्य..

किरोच्या नजरेतून – जन्मतारखेनुसार भविष्य..

30 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य तुला आहे. आहे त्या परिस्थितीतून वर येण्याची सतत महत्त्वाकांक्षा असेल. त्यासाठी जीवतोड मेहनत कराल. एक टप्पा गाठला की दुसर्‍या टप्प्यासाठी घोडदौड चालू होईल. धनप्राप्तीच्या बाबतीत काळजी करावे असे काही नाही. पण चिंता करण्याच्या सवयीमुळे एकाच वेळी अनेक उद्योग करून समाधान वाटते.

1 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुम्हाला समाजाचा किंवा उद्योगाचा नेता म्हणजे प्रमुख बनविले तर जाल तेथे महत्त्व प्राप्त होईल. जीवनस्तर वृद्धी करतांना बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीत तडजोड करून मानसिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न कराल. रूळलेल्या रस्त्याने न जाता बौद्धिक क्षमतेच्या जोरावर वेगळे मार्ग काढून भरपूर पैसा मिळवण्यात यश मिळेत यात शंका नाही.

- Advertisement -

2 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. सर्व प्रगती रूळलेल्या मार्गाने न जाता जन्मतःच प्राप्त दैवी सामर्थ्य व प्रतिभेच्या जोरावर होईल. आपल्या योजनेचा परिपाठ किंवा शेवट सोपा जाईल. स्वतःच्या घेतलेल्या निर्णयातून चांगले यश मिळेल. पैशांच्या बाबतीत दुसर्‍यांचा सल्ला घेणे महागात पडेल. तर स्वनिर्णयाने धनी व्हाल.

3 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. गुरूचा प्रभाव अधिक असल्याने इच्छाशक्ती व निश्चयात्मक बुद्धी प्रबळ राहील. कोणते का करिअर असेना ग्रहांची चौकट इतकी मजबूत असेल की, यश तुम्हाला शोधत येईल. बरोबरीच्या लोकांपेक्षा बराच वरचा दर्जा प्राप्त होईल. प्रत्येक काम मनापासून केल्याने उत्तम मानसिक आरोग्य लाभेल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे श्रीमंत व्हाल.

4 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य, मंगळ, शनि, शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. हर्षल आणि शनिच्या प्रभावामुळे तुमचे जीवन एकदम वेगळे राहील. त्यामुळे जीवनात विचित्र अनुभव येतील. आपण नियतीच्या हातातील बाहुले आहोत सर्व नाड्या नियतीच्या हातात आहे याला दैववाद म्हणतात. सुरूवातीच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत अडथळे पार करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल. उत्तरार्धात मात्र आर्थिक आवक चांगली राहील.

5 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या सूर्य, बुध, शनि, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. बुध, शुक्र, शनि या ग्रहांचे एकत्र येणे व्यक्तीमत्वाला पोषक आहे. त्यामुळे व्यक्तीमत्वात विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. कुटुंबियांसाठी वाटेल तो त्याग करण्याची सदैव तयार असाल. कधी कधी त्यामुळे प्रगतीमध्ये आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात आर्थिक सुस्थिती येईल.

6 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. शुक्राचा प्रभाव असल्यामुळे मित्रांची संख्या मोठी राहील. लोकप्रिय असाल. सामाजिक संबंधात खर्चाचे प्रमाण जास्त राहील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे असे सर्वांना वाटेल. स्वतःचा निर्णय कार्यान्वित केल्यास सहकार्याच्या मदतीने उत्तम धनप्राप्ती होईल.

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या