किरोच्या नजरेतून

12 ते 18 मे 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

12 मे - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अतिशय चांगली आहे. मात्र शुक्राने गुरूवर कुरघोडी करू नये याची काळजी घ्या. तुमचे लक्ष्य पूर्णपणे महत्त्वाकांक्षेवर केंंद्रीत करायला हवे. सामाजिक दर्जा व आर्थिक बाबतीत सबळ असलेल्या लोकांशी संबंध टेवणे फायद्याचे राहील. अन्यायाविरूद्ध लढण्याचे फार आकर्षण वाटेल. कृतीत कलेची झळाळी असेल. आर्थिक बाबतीत भिण्याचे कारण नाही. यश स्वतःहून तुमच्याकडे येईल. शुन्यातून विश्व निर्माण करण्याची किमया आहे.

13 मे - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट वेगळी आणि विचीत्र आहे. त्यामुळे जीवनात बर्‍याच वेगळ्या घटना घडतील. यातून उत्तम लेखक व संगीतकार निर्माण झाले आहेत. भौतिक दृष्टीने भाग्यवान आहात. असे म्हणणे धाडसाचे राहील. कारण सतत जीवनात बदल होत राहील. शत्रुंची संख्या वाढती राहील. तरीही अडथळ्यांना पार करत पुढचे पाऊल पुढेच राहील. बारीक सारीक गोष्टींवर टीका करणे टाळा. आर्थिक बाबतीत अनुभव वेगळे असतील. अनपेक्षित घटना जास्त घडतील आणि वेगळ्याच मार्गाने धनी व्हाल.

14 मे - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट चांगली आहे. त्यामुळे बुद्धी सूक्ष्म, जागृत असेल. तर्कशक्ती बलवान असल्याने कोणत्याही मु्द्यांवर वाद घालणे चांगले वाटेल. स्वतंत्र बाण्याचे आहात. कोणत्याही विषयात रस घेतल्यास सरस कामगिरी कराल. आर्थिक बाबतीत उलीढालींबद्दल मनात काय विचार आहेत कोडे वाटेल. पैशाने पैसा मिळवणे यात पटाईत रहाल.

15 मे - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. प्रेम हेच जीवन अशी तुमची धारणा असेल. तुमच्या भावना तीव्र असतील. भक्ती योागामुळे उत्साह दांडगा असेल. कलावंत, लेखक ई. मध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ लाभेल. चांगल्या संधी प्राप्त होतील. मोठ्या कंपनीत प्रचंड यश मिळेल.

16 मे - वाढदिवस असलेल्या चंद्र, नेपच्यून, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृषभ आहे. स्वभाव सौम्य असल्याने लक्ष्य वर्तमानापेक्षा भविष्याकडे असेल. तुमची व्हिजन अद्भूत आहे. अध्यात्म व गूढशास्त्रे याविषयी आकर्षण वाटेल. एकाच प्रकारच्या जीवनाचा कंटाळा येईल. आर्थिक बाबतीत काही अडचणी येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र सर्व सुरळीत होऊन गाडी एकदा रूळावर आली की, आर्थिक प्रगतीचा वेग चांगला राहील.

17 मे - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनि, चंद्रे ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुमचे जीवन व करिअर एकदम चांगले असेल किंवा त्या उलटही असू शकेल. कारण प्रगतीची दोरी भाग्याच्या हातात राहिल. अनेक लोकांच्या संपर्कात असूनही एकाकी आहोत अशी टोचणी सतत मनाला राहील. तुमच्याकडून घेणारे जास्त व देणारे कमी असतील. यामुळे आपण लुबाडले गेलो ही भावना तीव्र राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कारण खर्चावर नियंत्रण, काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक हे असेल. सट्ट्यासारख्या व्यवहारात यश मिळणार नाही.

18 मे - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृषभ आहे. ग्रहांची चौकट अतिशय सामर्थ्यवान आहे. त्यामुळे धाडसी गोष्टी आवडतील. इच्छाशक्ती प्रबळ आहे. मोठमोठ्या संस्थाचे संचालन करणे, मोठ्या योजना कार्यान्वित करणे संपत्ती व सत्ता प्राप्त करणे आवडत असले तरी आवश्यक खर्चाची तरतूद अवघड वाटेल. व्यापार, उद्योगात विपुल प्रमाणात पैसा मिळेल.

Related Stories

No stories found.