किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे
किरोच्या नजरेतून

जन्मतारखेनुसार भविष्य..

14 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्र, नेपच्यूनया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. भोवतालच्या परिस्थितीचा मनावर परिणाम होणार आहे. थोडीशी स्तूती केल्यास त्याच्या कामाला धावून जाल. आयुष्याच्या उत्तरार्धात आत्मविश्वास प्राप्त झाल्यामुळे प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू होईल. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. आर्थिक बाबतीत भरभरून यश मिळेल. स्वतः घेतलेले निर्णय कृतीत आणायला हवे. अनेक प्रकारच्या कामातून धनप्राप्ती होईल.

15 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. प्रचंड महत्त्वाकांक्षा असल्याने कर्तृत्व आणि मनोरंजन याची धमाल उडवून द्याल. अंंधविश्वासाविरूद्ध असाल. नशीबावर विश्वास असला तरी स्वप्रयत्नाने त्यात सुधारणा करण्याची धमक आहे. आर्थिक बाबतीत फार भाग्यवान आहात.

16 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. इच्छाशक्ती वाढवली तर तीक्ष्ण बुद्धीमत्तेद्वारा जीवनात चांगली प्रगती करू शकाल. कलाकारांना चांगले यश मिळेल. महत्त्वाकांक्षा दांडगी असल्याने लक्ष्य उच्च प्रकारचे असेल. आर्थिक बाबतीत फार विचीत्र अनुभव येतील. तुमच्या जीवनात आर्थिक दृष्टीने अचानकपणे अनेक लोक येतील व तितक्याच अचानकपणे जातील.

17 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनि, नेपच्यून,चंद्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. शनीचा फार मोठा प्रभाव असल्याने स्वभाव गंभीर असून इच्छाशक्ती प्रबळ राहील. त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे. किेतीही प्रयत्न केला तरी विशीष्ट मर्यादेच्या बाहेर पडून पुढे जाणे जमणार नाही. सट्टा, शेअर्स या बेभरवश्याच्या व्यवहारात भाग न घेण्याचे पथ्य पाळल्यास व सातत्याने काम करीत गेल्यास आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

18 जुलै - वाढदिवस असलेल्या मंगळ, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. दबाव आल्यास त्याविरुद्ध बंड कराल. स्वभाव निडर व स्वतंत्र बाण्याचा आहे. क्रोधाचा पारा लवकर वाढतो. नातेवाईकांशी पटणार नाही. लवकर विवाह जीवनाच्या दृष्टीने घातक आहे. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत एक तर अतिशय यशस्वी व्हाल किंवा उलटही होण्याची शक्यता आहे. तरी एखादी योजना यशस्वी होऊन आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

19 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि,हर्षल, चंद्र, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कर्क आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, करिअरमध्ये अनेक बदल होत रहातील. आयुष्यात हळुहळु प्रगती होईल. प्रसिद्धीच्या झोतात रहाल. करिअरमध्ये सतत बदल केल्यास धनसंग्रह करणे फार जड जाईल. प्रवासासंबंधी व्यवसायात चांगला पैसा मिळेल.

20 जुलै - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, नेपच्यून, सूर्य, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे महत्त्वाकांक्षा व स्वप्ने मोठ मोठी असतील. कामाविषयी उत्साह दांडगा राहील. कलाक्षेत्रात विशेष क्रांती करता येईल. आर्थिक स्थितीत चढ उतार राहील. त्याचे कारण गुंतवणूकीच्या बाबतीत घाईगर्दीने निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती एकाच पातळीवर ठेवणे जड जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com