Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

आर्थिक आवक उत्तम राहील

- Advertisement -

नोव्हेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्शल, द्वितीयात राहू, सप्तमात रवि-मंगळ-बुध, नवमात शुक्र, अष्टमात केतू, दशमात गुरू-शनि-प्लुटो, लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षर चू, चो, चे,ला, ली, लू. ले, लो अशी आहेत. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी मंगळ आहे. तत्त्व -अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल.पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती. राशीचा अंमल डोक्यावर असल्यामुळे डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग- लाल, शुभ रत्न- पोवळे, शुभ दिवस- मंगळवार व रविवार. देवता- शिव, भैरव, मारूती. शुभ अंक- 9, शुभ तारखा- 9/18/27. मित्र राशी- सिंह, तुला, धनु. शत्रु राशी- मिथून, कन्या. स्वभाव अत्यंत क्रोधी. कुटूंबाचे उत्तम प्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्विकारण्याची खुमखुमी.

सप्ताहात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याचा योग आहे.आनंदीवृत्तीला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. थोर व सन्माननीय व्यक्तींशी वादविदवाद करण्याची हौस वाटेल. पण बोलतांना त्यांचा नकळत अपमान होणार नाही याची काळजी घ्या.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारीपाजारी यांचे संबंध चांगले राहिल्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उत्साही राहील. गायनवादनादी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणामुळे केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. लेखनाचा सराव जितका वाढवाल तितक्या प्रमाणात टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा – 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्षल,द्वितीयात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमात रवि-केतू-बुेध, नवमात शुक्र, दशमात शनि-प्लुटो, लाभात गुरू- नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. े

सप्तमास्थानी मंगळ आहे. कौटुंबिक सुखामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहीतांनी प्रेमविवाहाच्या भानगडीत पडू नये. फसगत होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी घरातील कलह घरात मिटवावे. नवीन संंबंध जोडू नये. अंगाशी येतील. व्यापार्‍यांनी सौदे पुढे ढकलावेत.

अष्टमात बुध आहे. शत्रुंचा नाश करण्यास समर्थ असाल. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्यान व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुष होऊन तुमची समाजात असलेली छबी आणखी उजळून निघेल. व प्रगती होईल.

दशमस्थानी शनि आहे. भाग्याचे दरवाजे उजळतील. आपल्या बुद्धीमत्तेने लोकांना चकित कराल. जनमनात आदर निर्माण होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे करण्याने सत्तापक्षातील प्रतिनीधींना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाग्यवृद्धी होऊन राजाप्रमाणे सुख उपभोगाल. आपल्या क्षेत्रात थोर अधिकार मिळतील. शेतकर्‍यांना लाभ होतील. स्वपराक्रमाने उदयास याल. नम्रतेमुळे लोकप्रियतेत वृद्धी होईल.

स्त्रियांसाठी – महिलांना पतीराजांचे सहकार्य उत्तम राहील. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे धोरण अवलंबा. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21, 24, 25, 27, 28

जानेवारी – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्षल, द्वितीयात राहू , अष्टमात मंगळ-केतू, नवमात रवि-शुक्र, दशमात बुध-शनी-प्लुटो,लाभात गुरू-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

लाभस्थानी गुरू आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांचा तुमच्यापासून चांगलाच फायदा होईल. वाहनसुख उत्तम असेल. थोर लोकांचा स्नेह संपादन कराल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबरच भाग्योदयास प्रारंभ होईल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. चतुष्पाद प्राण्याचे सुख मिळेल. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तूंनी भरलेला राहील. अंतर्मनाने पुढे घडणार्‍या घटना आधीच कळून येतील.

राशीच्यास्थानी हर्षल असल्याने धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल राहील. इतरांना विचित्र वाटेल असा राहील. राजकारणात असाल तर भाषणातून आश्वासनांचा पाऊस पाडाल.

कितीही फील गुड वाटत असले तरी इतरांना वाटेलच असे नाही. कुलाचार व रूढी यांच्या विरुद्ध वर्तन ठेवण्याचे भूषण वाटेल. स्वभाव क्षणात शांत तर क्षणात उच्छुंखल राहील.

स्त्रियांसाठी – व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 15, 18, 20, 22, 23, 26, 29, 30

जन्मतारखेनुसार भविष्य..

4 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक आहे. हर्षल आणि मंगळ यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपले जीवन इतरांपेक्षा वेगळ्या वळणावर नेऊन यशस्वी कराल. विशेषतः संशोधनाच्या कामात चांगले यश मिळेल. दुर्दैवाने कुसंगतीत पडल्यास वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे. मौलिक कल्पनांतून विपुल धनप्राप्ती होईल.

5 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण आहे. व्यवस्थापनाच्या कामात भरपूर यश मिळेल. धूर्तपणाने काम करून घेतांना इतरांविषयी शंका वाटेल. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवणार नाही. कलाक्षेत्रात सहज यश मिळवाल. धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल.

6 नोव्हेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. दुसर्‍याच्या मदतीला धावून जाल. त्यासाठी थोडे फार नुकसानही होईल. सुरूवातीचे आयुष्य थोडे त्रासात जाईल. एखाद्या विषयात रूची निर्माण झाल्यास कुणी विरोध केला तरी सोडणार नाही. कलाक्षेत्राविषयी आपुलकी वाटेल. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवस्थापन केले तर फायदा होईल. उच्चस्तरीय राहणीमान आवडत असले तरी धनसंग्रह करण्यात यश मिळेल.

7 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ,नेपच्यून, चंद्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. नेपच्यून ग्रहाचे प्रभुत्व बुद्धीवर असून सांसारिक गोष्टीवर नाही. त्यामुळे दैवी शक्तींचा साक्षात्कार होऊन भावी घटनांची चाहूल लागेल. विज्ञानाद्वारे उत्तम प्रगती होईल. पैसे मिळवण्याचे आकर्षण नसले तरी अनेक उद्योगातून पैसा मिळत राहील. वारसाहक्काने, बक्षिसाद्वारे, संशोधनातून अशा व इतर कामांतून पैसे मिळतील.

8 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य वृश्चिक तुला आहे. यादोन ग्रहांचे एकत्र होणे तुम्हाला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. शनी न्यायाधीश असल्याने तो अर्थप्राप्तीचे मार्ग अवैध असल्यास गोत्यात आणू शकतो. अध्यात्माच्या बाबतीत उत्तम प्रगती होईल. आत्मसंयमनासाठी या दोन ग्रहांची युती चांगली आहे. आर्थिक बाबतीत जसे ठरवाल तसे होईल. आर्थिक यश मिळवण्याचे ठरवल्यास धनी व्हाल.

9 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मंगळाला अंगारक म्हणतात. सर्व कृतीच्या पाठीमागे हा अग्नी नेहमी प्रज्वलित राहील. यशामुळे अनेक शत्रु निर्माण होतील. व्यवस्थापन कौशल्य चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन असल्याने तुमच्या हातात अनेक विधायक कार्य पार पडतील. प्रगळ इच्छाशक्तीमुळे अशा कार्यात सहज यश मिळेल. मातीचे सोने बनवण्याची कला अवगत असल्याने कोणत्याही कार्यक्षेत्रात विपुल धनप्राप्ती होईल.

10 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. मौलिकतेची दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे प्रयत्न केल्यास साहित्य, नाटक, प्रचारक म्हणून उत्तम यश मिळेल. रंगभूमीवरील कोणत्याही प्रकारचे काम करणे फायद्याचे राहील. महत्त्वाकांक्षा जागरूक राहील. नावलौकीक होईल. प्रसिद्धीच्या झोतात रहाल. आर्थिक बाबतीत उत्तम यश मिळेल. मात्र मिळवलेला पैसा टिकवणे जड जाईल.

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या