किरोच्या नजरेतून

18 ते 24 ऑगस्ट 2022 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्म तारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

18 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ,चंद्र, नेपच्यून,सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची मांडणी अशी आहे की, बंधने घालण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्याविरूद्ध बंड कराल. स्वभाव निडर असून स्वतंत्र बाण्याचे आहात. छोट्या छोट्या गोष्टींवरून रागाचा पारा लगेच वर चढेल. त्यावर नियंत्रण ठेवल्यास त्या शक्तीचा प्रगतीसाठी चांगला उपयोग होईल.आर्थिक बाबतीत एक तर फार मोठ्या प्रमाणावर यश मिळेल नाही तर नेमके त्याउलट घडेल आणि नवनवीन कल्पना काढून अर्थप्राप्ती कराल.

19 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी राहील की, महत्वाकांक्षा दांडगी आहे. विचार व निर्णय घेण्याची गती वेगवान राहील. विचारांचे कृतीत रूपांतर करण्याची क्षमता चांगली आहे. परिश्रमाची आवड आहे. दिलेला शब्द कटाक्षाने पाळाल. भाग्य असे आहे की, मातीचे सोने कराल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात काही अडचणी येण्याची शक्यता आहेश त्यानंतर प्रगतीकडे वेगवान घोडदौड सुरू राहील.

20 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट बुद्धीमत्ता धारदार करण्यासाठी चांगली मदत करेल. विचार उच्च दर्जाचे असल्यामुळे समाजात मान सन्मान मिळेल. कोणत्याही प्रकारचे करिअर निवडले तर त्यात लवकर प्रगती करण्याची संधी मिळेल. कला, संगीत, साहित्य क्षेत्रात उत्तम प्रगती. आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळेल. अलौकीक मार्गाने पैसा येत राहील.

21 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि,हर्षल, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. सूर्य आणि गुरूच्या प्रभावामुळे महत्त्वाकांक्षा प्रबळ असेल. कितीही यश आले तरी ते कमी वाटल्यामुळे आणखी उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न कराल. उच्चपदावर पोहोचण्याचा प्रयत्न कराल. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होईल. संपत्ती व आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय अचूक निघाल्यामुळे श्रीमंत होणे फार अवघड नाही. भावी घटनांची अचूक वेध घेण्याची दैवी शक्ती प्राप्त असल्याने व्यापार उद्योग किंवा आर्थिक उलाढालीत यश मिळेल.

22 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या रवि, हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. हर्षलच्या प्रभावामुळे वैयक्तीक विशेष गुणांचा इतरांवर फार लवकर व मोठा प्रभाव पडेल. इतरांच्या हाताखाली काम करणे जड जाईल. कामाचा प्रमुख म्हणून काम केल्यास जीवनात उत्तम यश मिळेल. कामात इतरांपेक्षा नाविन्य व वेगळेपण असल्याने काही लोकांना स्वभाव विचीत्र वाटून गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत योजना व रणनिती इतरांच्या लक्षात येणे कठीण आहे. विपुल धनप्राप्तीचे योग आहेत.

23 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, हर्शल ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट फार चांगली आहे. सखोल बुद्धीमत्ता व अचूक निर्णयाच्या जोरावर उत्तम प्रगती करू शकाल. दुसर्‍याच्या मनात तुमच्याविषयी काय चालले आहे हे सहज ओळखता येईल. मात्र उतावळेपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. सावध रहावे. तीक्ष्ण बुद्धीमुळे आर्थिक क्षेत्रात नवनवीन योजना तयार करून त्यातून भरपूर पैसा मिळवणे सहज शक्य होईल.

24 ऑगस्ट - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध,शुक्र, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. शुक्राच्या प्रभावामुळे सर्वांशी वागणूक सहानूीभुतीपूर्वक राहील. प्रेमाला फार महत्व राहील. हे आदर्श प्रेम असल्यामुळे विकाराचा मुळीच भाग नसेल. सामाजिक कामाची आवड वाटेल. निरनिराळ्या वित्तीय संस्थातून गुंतवणूक करून धनी व्हाल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com