Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

13 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, हर्षल, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, जीवनात अशा काही वेगळ्या घटना घडतील. ज्यामुळे विरोधाभास निर्माण होतील. अकल्पित घटना घडतील. जीवन एकसारखे असणार नाही. करिअर आणि योजनांमध्ये अनेक बदल होतील. त्यातून आपल्या आवडीचा एकच मार्ग निवडा. एकट्याने आर्थिक प्रयत्न केल्यास उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल. बरोबर भागीदार घेण्यापेक्षा एकट्याने स्वतंत्रपणे आर्थिक उन्नतीचा प्रयत्न केल्यास उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

- Advertisement -

14 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमचे जीवन अतिशय चांगले किंवा वाईट होऊ शकते. तुम्ही अतिशय भाग्यवान किंवा दुर्दैवी ठरू शकतात. मानसिक प्रगती विविध रंगांनी रंगलेली हुशारी व चातुर्ययुक्त राहील. तुमचे विचार व कृती गतीमान राहील. तर्कशक्ती अतिशय चांगली आहे. कोणताही विषय सहज आत्मसात करू शकाल. वाचनाची आवड राहील. स्मरणशक्ती चांगली आहे. आर्थिक स्थितीचे सुकाणू तुमच्या हातात राहील. ठरवाल तेवढी उंची आर्थिक क्षेत्रात गाठू शकाल.

15 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मेष आहे. शुक्राची आनंदी वृत्ती दांडगा उत्साह, मंगळाची शक्ती आणि उत्साह यांचे मिश्रण तुमच्या स्वभावात राहील. स्वभाव प्रेमळ, प्रसन्न, सहानुभूतीपूर्ण भावनाप्रधान आणि विकाराधिष्ठीत आहे. समाजात लोकप्रियता मिळेल. जिथे जाल तिथे मैत्री कराल. अडचणीच्या काळात मदतीला धावून जाल. पैसा सढळ हाताने खर्च करत असल्यानेक घराच्या सुशोभीकरणासाठी सढळ हाताने खर्च कराल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास आर्थिक चिंता निर्माण होतील.

16 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. आयुष्य ग्रहांच्या या चौकटीमुळे बरेच वेगळे राहील. गूढशास्त्रे, गुप्तसंस्था, परलोक विद्या याविषयी रस वाटेल. साधनेने ज्यात उत्तम प्रगती करता येईल. भावना प्रबळ असतील. तसेच आर्थिकविचार व नितीनियम कडक असतील. प्रवासाची आवड असेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक स्थितीत चढउतार चालू राहील. आवश्यकता पडल्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत राहील.

17 एप्रिल –वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनि या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनाच्या पूर्वार्धात बर्‍याच अडचणी निर्माण होतील. अनेक लोकांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी लागेल. निश्चयी स्वभाव व अचूक परिश्रमाच्या जोरावर महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. उद्योग व्यवसायात चांगले भागीदार मिळतील. तसेच पत्नी म्हणून सुगृहीणी स्त्री प्राप्त होईल. आर्थिक उलाढालीत दुसर्‍याने हस्तक्षेप केलेला अजिबात चालणार नाही. हट्टी स्वभावामुळे आर्थिक बाबतीत उत्तम यश मिळेल.

18 एप्रिल – वाढदिवस असलेल्या मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. विचार व कृती स्वतंत्र राहील. दुसर्‍यांनी घातलेल्या बंधनांना झिडकारून द्याल. स्पष्टवक्तेपणामुळे शत्रुंची संख्या वाढत राहील. आर्थिकदृष्ट्याही नुकसान सोसावे लागेल. निडरवृत्तीमुळे संरक्षण दलातील नोकरी चांगली राहील. साहसी कृत्याशी निगडीत राहील्यामुळे बर्‍याच वेळा अपघात संभवतात. कॉर्पोरेट सेक्टर किंवा हाताखाली काम देऊन प्रचंड प्रमाणात आर्थिक यश मिळवू शकाल.

19 एप्रिल- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, मंगळ ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, हाती घेतलेल्या कुठल्याही कामात यश मिळेल. हाती मातीचे सोने करण्याची किमया आहे. आर्थिक जीवन लवकर सुरू होऊन त्यातून मौलिक योजना असल्याने सृजनशीलतेद्वारे धाडसाने व निश्चयाने यश ओढवून आणाल. महत्त्वाकाक्षा दांडगी आहे. साथ देवो अथवा न देवो प्रगतीपथावर सदैव आगेकूच कराल. संमोहनशील व्यक्तीमत्वामुळे हाताखालच्या अनेक लोकांना घेऊन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उत्तम यश मिळवाल. अवाक्याबाहेर जाणार्‍या योजना मात्र नाकाराव्यात.

- Advertisment -

ताज्या बातम्या