डोळ्यांच्या आरोग्यासाठी

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

आजच्या काळात आपण स्क्रीनवर 9 तासांपेक्षा जास्त वेळ घालवता .यामुळे डोळ्यांची समस्याही वाढली आहे. संगणकानंतर, लोक मोबाईल देखील हाताळतात. यामुळे डोळ्यांवर ताण येणं साहजिक आहे. डोळ्याच्या त्रासाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे काही साधे उपाय आहेत. ज्यांना अवलंबवून आपण डोळ्यांना आराम देऊ शकता. हे व्यायाम आपण ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून देखील करू शकता.

1) डोळ्यांची हालचाल- आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये सतत बघत असतो. काही वेळ जरी डोळ्यांची हालचाल केली तर डोळ्यांना त्रास होऊ लागतो. आपण आरामशीर खुर्चीवर बसा, आपल्या समोर घड्याळ ठेवले आहे असा विचार करा. सर्वप्रथम डोळे 12 वाजेच्या दिशेने फिरवा नंतर 6 वाजेच्या सुई कडे बघून डोळे फिरवा.

2) उजवी-डावी,वर-खाली हालचाल करा- डोळे स्थिर ठेवा. नंतर 9 वाजेच्या सुईवर डोळे ठेवा नंतर काट्यासह डोळे फिरवा. 3 वर डोळे ठेवा आणि सुईसह डोळे फिरवा. त्याच क्रमाने 11,2 4,7 च्या सुईवर वर डोळे केंद्रित करा नंतर फिरवा.

3) जवळ-लांब- बर्‍याचदा डोळ्यांसाठी एकाच ठिकाणी जास्तवेळ ठेववल्याने लांब आणि जवळचे बघायला त्रास होतो. अशा परिस्थितीत आपण आपला अंगठा जवळ लांब करत राहा. असं किमान 10 वेळा करा. आपण अंगठ्याला शक्य तेवढे लांब न्या नंतर नाकाच्या जवळ आणा. नंतर उलट्या दिशेने करा. असं किमान 10 वेळा करा.

4) डोळ्यांना स्वच्छ करा-बर्‍याचवेळा आपण असे म्हणतो की डोळ्यात जळजळ होते.डोळ्यांना स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय आहे. कोणत्या ही वस्तूला समोर ठेऊन त्याच्या कडे एकटक बघा. पापण्यांची उघडझाप करू नका. असं डोळ्यातून पाणी येईपर्यंत करा. असं केल्याने काही वेळातच आपल्याला आराम वाटेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com