Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधशेतकर्‍यांना कृषी व पशुधनापासून लाभ

शेतकर्‍यांना कृषी व पशुधनापासून लाभ

ऑक्टोबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात गुरु, तृतीयात राहू-हर्षल, चतुर्थात मंगळ, सप्तमात रवि-बुध-शुक्र, नवमात केतू, व्ययात शनी-प्लूटो अशी ग्रहस्थितीे आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू, गो, गे, सा, सी, से, सो अशी आहे. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष आहे. राशी स्वामी शनी. तत्व-वायु,राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही.रागाचा पारा जेवढ्या लवकर वर चढतो तेवढ्या लवकर खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष, तमोगुणी स्वभाव, काहीसा क्रूर, प्रकृती-कफ, वात, पित्त. राशीचा अंमल पायांच्या पोटर्‍यावर आहे. शुभ रत्न-निलम, शुभ रंग-आकाशी, निळा, काळा. देवता- शनी, हनुमान. शुभ अंक-8, शुभ तारखा-8/17/26.

तृतीयातील हर्षल लेखक वर्गासाठी चांगला आहे. लेखनात सूर लागेल. प्रसिद्धी मिळेल. ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. विचीत्र स्वभावाच्या लोकांपासून सावधान रहा नुकसान होईल.

व्ययातील प्लूटोने खर्चाचे प्रमाण काहीसे वाढविले असले तरी अध्यात्मात उत्तम प्रगती होऊन मानसिक शांती मिळेल.

स्त्रियांसाठी – सप्तमात शुक्र आहे. वैवाहिक सुख चांगले राहील.नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थामधून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होतील.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 17, 18, 19, 21, 24, 26, 30, 31

नोव्हेंबर – 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी -नेपच्यून, द्वितीयात-गुरू, तृतीयात राहू-हर्षल, पंचमात मंगळ, नवमात रवि-बुध-शुक्र, व्ययात शनि-प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात राहू आहे. आतापर्यंत भांबावून टाकणार्‍या समस्यांना उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या ही यशाची ओळख आहे. हे सर्व नष्ट होतील काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमाने. शास्त्रसंशोधनात यश मिळेल. सौख्य व विलास उपभोगावयास मिळेल. नोकर वर्गाला पदोन्नतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. शेतकर्‍यांना कृषी व पशुधनापासून लाभ होतील. राहू-केतू अस्तित्वात नसणार्‍या व न दिसणार्‍या हवेप्रमाणे मानवी जीवनावर बरे वाईट परिणाम करतात. भाग्यातील केतू तळागाळातील लोकांच्या सहकार्याने जीवनाच्या नावेची प्रगतीपथाकडे गतीत वृद्धी करील. त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे.

स्त्रियांसाठी -भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौर्द्याच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र यांचे सुख उत्तम लाभेल. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा – 2, 3, 5, 6, 10, 12, 13, 14, 17, 20, 26, 28, 29

डिसेंबर – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात-गुरू, तृतीयात राहू-हर्शल, चतुर्थात मंगळ, नवमात केतू, दशमात रवि, लाभात बुध-शुक्र, व्ययात शनी-प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयस्थानातील गुरूमुळे विद्वत्तेबद्दल विशेष नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वात विशेष यश मिळेल. शब्दाने लोकांवर हुकूमत गाजवता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. आर्थिक आवक विपुल प्रमाणात राहील. सुग्रास भोजन मिळेल. नेहमी आनंदी वृत्ती राहील. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा स्वतंत्र योग आहे. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

व्ययात शनी आहे. धार्मिक बाबतीत स्वतंत्र मते असली तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाचा आळस करावा. यश तुम्हाला शोधत येईल. शनिला मेहनत व कष्ट करणारी व्यक्ती आवडते. फळ देतांना तो विलंब करतो पण हात आखडता घेत नाही.

एकादशात बुध आहे. राजकृपेेने चांगले लाभ होतील.

स्त्रियांसाठी – व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या