Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधख्यातिकीर्त मेधा पाटकर

ख्यातिकीर्त मेधा पाटकर

मेधा पाटेकर यांचा जन्म 1 डिसेंबर 1954 रोजी मुंबई येथे खानोलकर कुटुंबात झाला, मेधा यांचे वडील वसंत खानोलकर एक स्वातंत्र्य सेनानी आणि कामगार संघटना नेते होते, त्यांची आई इंदुमती खानोलकर ह्या पोस्ट आणि टेलिग्राफ विभागातील राजपत्रित अधिकारी होत्या. मेधा खानोलकर यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून सामाजिक विषयात एम.ए.पदवी मिळवली. मेधा यांचे लग्न पाटकर घराण्यात झाले, परंतु घटस्फोट झाल्याने विवाह फक्त सात वर्षे टिकला व त्यामुळेच त्या मेधा खानोलकर न राहता मेधा पाटकर म्हणून ओळखल्या जातात.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

मेधा पाटकर यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये 5 वर्षे आणि गुजरातच्या ईशान्येकडील आदिवासी जिल्ह्यांमध्ये तीन वर्षे स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले. पाटकर यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सदस्या म्हणून काम केले परंतु त्यांनी प्रत्यक्ष प्रांतात वा प्रदेशात जाऊन काम करणे पसंद केले. पाटकर यांनी पीएच.डी. ढखडड मधील विद्वान, अर्थशास्त्राचा विकास आणि त्याचा पारंपरिक समाजांवर होणारा परिणाम यांचा अभ्यासक्रम निवडला त्यानी एम.फिलपर्यंत काम केल्यानंतर त्यांची पीएच.डी. अपूर्ण राहिली कारण त्या नर्मदा खोर्‍यातील आदिवासी आणि शेतकरी समुदायांसोबत कामात मग्न होत्या. लहानपणापासून त्यांच्यावर सामाजिक बांधिलकीचे संस्कार झाले, सामाजिक बांधिलकीच्या मुशीतून तयार झालेल्या मेधा यांचा ओढा साहजिकच सामाजिक कार्याकडे ओढला गेला. त्यांनी समाजशास्राच्या अभ्यास क्रमातच पदव्या मिळविल्या त्यामुळे समाज कार्य करावयाचे हा त्यांचा निर्णय पक्का होत गेला.

- Advertisement -

डावा हात – मेधा पाटकर यांचा डावा हात हा संचिताचा आहे व उजवा हात हा कर्माचा. डाव्या हातावरील मस्तक रेषा व आयुष्य रेषेमध्ये मोठे अंतर आहे, आयुष्य रेषा व मस्तक रेषा यांच्यात उगमस्थानी अंतर असता असे लोक निग्रही असतात, स्वतंत्र विचाराचे व प्रवृत्तीचे असतात व त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता असते. मस्तक रेषेला दोन फाटे फुटले आहेत हे फाटे पहिल्या बोटाच्या खाली म्हणजे अगदी सुरुवातीलाच वयाच्या 25 व्या वर्षांंपासून आहेत. त्यामुळे तरुणपणातच तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्राप्त झाली आहे. मस्तक रेषेला आणखी एका मस्तक रेषेने हृदय रेषेच्या खाली हाताच्या मध्यभागी छेद दिला आहे, मस्तक रेषेने मस्तक रेषेला उभा छेद दिल्यास वैवाहिक सौख्यात बाधा येते व ही बाधा मेधा यांच्या आयुष्यात लग्नानंतर सात वर्षांतच घटस्फोट झाल्याची ती निशाणी आहे.

घटस्फोट होणार असेल तर विवाह रेषेतसुद्धा दोष आढळून येते त्याप्रमाणे मेधा यांच्या डाव्या हातावरची विवाह रेषा दोषपूर्ण आहे. मेधा यांच्या डाव्या हातावरील गुरु ग्रह अति फुगीर आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव अहं ब्रह्मासि आहे व ते कोणाचे ऐकण्याच्या किंवा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. डाव्या हातावरच्या हृदय रेषेला दोन फाटे आहेत एक फाटा पहिल्या बोटाच्या तिसर्‍या पेर्‍यात गेला आहे त्यामुळे मेधा यांच्या अंगी निष्ठा आहे व त्यामुळेच त्यांना ज्यांनी मोठे केले त्यांच्याशी त्या कायम एकनिष्ठ राहिल्या. हृदय रेषेचा एक फाटा सरळ गुरु ग्रहावर आडवा असल्याने मेधा ह्या खूप भावनिक आहेत. परंतु उजव्या हातावरील हृदय रेषा खूप भिन्न आहे ही रेषा गुरू ग्रहाच्या आधी समाप्त झाली आहे व तिचा पोत जाड असून ती सरळ रेषेत आहे. अशी हृदय रेषा हातावर असता असे लोक कठोर व स्वार्थी असतात व हे गुण मेधा यांचेकडे त्यांच्या कर्माच्या म्हणजे उजव्या हातावर असल्याने वयाच्या 25 व्या वर्षापासून त्यांच्यात व्यवहारीपणा आला व स्वतःचा स्वार्थ कळायला लागला. थोडक्यात उजव्या हाताच्या कर्माचे कारकत्व व भाग्याने त्यांना साथ देण्यास सुरुवात वयाच्या 25 व्या वर्षांपासून झाली.

वयाच्या 25 वय वर्षांपासून कर्म प्रभावी झाले व संचिताच्या डाव्या हातावरील रेषांचा प्रभाव कमी झाला, डाव्या हातावरील संचिताचा प्रभाव व्यक्ति स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत असतो, एकदा का व्यक्ति कमवायला लागली व आई वडिलांच्या छत्र छायेतून मुक्त झाली की, उजव्या कर्माच्या हाताचा प्रभाव वाढतो. थोडक्यात सक्रिय हात डावा असो अथवा उजवा सक्रिय हातावरील कर्मा प्रमाणे मनुष्याच्या जीवनाची 80% वाटचाल असते, उर्वरित 20% संचीताच्या डाव्या हातावरील वैवाहिक सौख्य, अनुवांशिक आजार, शुभ -अशुभ चिन्हे व येणारी संकटे किंवा गंडांतर योग असतात व हे भोगावेच लागतात. मात्र डाव्या हातावरील ग्रहांचा परिणाम हा उजव्या हातावरील ग्रहांचा एकत्रित शुभ अशुभ परिणाम अबाधित राहतो.

डाव्या हातावरची आयुष्य रेषा वय वर्ष 50 नंतर दुहेरी व नाजूक झाली आहे त्यामुळे वयाच्या 50 नंतर उत्तोरोत्तर मेधा यांची शारीरिक क्षमता कमी कमी होत जाणारी आहे. करंगळी लांब आहे त्यामुळे उपजत हुशारी व वक्तृत्व आहे, अंगठा मजबूत आहे, पहिले पेर मोठे व विस्तारित आहे; त्यामुळे कल्पना मोठ्या आहेत, परंतु दुसर्‍या पेर्‍यावर मध्यभागी एक आडवी रेषा आहे. ही आडवी रेषा मेधा यांना विचार न करता घाई घाईत निर्णय घेण्यास भाग पाडते अश्या वेळेस निर्णय चुकण्याचा मोठा संभव असतो.

उजवा हात – मेधा यांच्या संचिताचा डाव्या हातापेक्षा कर्माचा उजवा हात खूपच भाग्यशाली आहे. भाग्य रेषा खूपच उच्च दर्जाची अमिताभबच्चन यांच्या हातावरच्या भाग्य रेषेच्या तोडीची आहे. भाग्य रेषा मणिबंधाजवळ आयुष्य रेषेतून उगम पावणारी व थेट मधल्या शनी बोटावर जाणारी उच्च प्रतीची असल्याने मेधा यांना भाग्याची साथ खूप मोठी आहे. उजव्या हातावरील भाग्य रेषा वयाच्या47 वर्षा पासून गडगंज पैसा व ऐश्वर्य आयुष्याच्या शेवटपर्यंत दाखवित आहे. भाग्य रेषेतूनच बुध रेषेचा उगम होत असल्याने स्वतःला जगापुढे आपल्या सामाजिक कार्याची प्रसिद्धी करण्यात त्या कधीही कमी पडल्या नाही व पडणार नाहीत. बुध रेषा अत्यंतिक हुशारीची व चतुराईची असते, तिचा उगम भाग्य रेषेतून झाल्याने प्रत्येक सामाजिक आंदोलनात आर्थिक मदत लागते व ही मदत त्यांनी आयुष्यभर बुध रेषेच्या कल्पकतेने मिळवली.

मेधा यांना जाणीव होती की,आर्थिक मदतीशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, त्यासाठी मेधा यांनी युक्ती लढवून शेकडो पुरोगामी लोकांच्या संघटनांशी युती केली, त्या व्यतिरिक्त मेधा पाटकर ह्या धरणांच्या जागतिक आयोगाच्या आयुक्तपदी होत्या, त्यांनी पर्यावरणीय, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पैलू आणि जागतिक स्तरावर मोठ्या धरणांच्या विकासाचे परिणाम आणि त्यांचे पर्याय यावर सखोल संशोधन केले. मेधा अनेक वर्षे राष्ट्रीय समन्वयक आणि नंतर नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्सच्या संयोजक होत्या. आणि आता छअझच च्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. छअझच च्या बॅनरखाली, विकासाच्या असमानता, अस्थायीता, विस्थापन आणि अन्यायाविरुद्ध भारतातील विविध जनसंघर्षांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय डाव्या विचारसरणीच्या संघटनेने व भारतातील विरोधी पक्ष्याच्या व डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्ष्यांची मेधा यांच्या आंदोलनासाठी सर्व प्रकारची भरभरून मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली.

मेधा पाटकर ह्या डाव्या विचारसरणीच्या होत्या व आहेत, लहानपणीच वडिलांकडून वंचितांच्या कनवाळूपणाचे बाळकडू त्यांना प्राप्त झाले. मेधा यांच्या उजव्या हातावर डाव्या विचारसरणीचा पगडा हा अतिशय तीव्रतेने आहे. हृदय रेषा व मस्तक रेषेच्या दरम्यान पहिल्या बोटाखाली गुरु ग्रहावर एक ठळक आडवी रेषा आहे ही रेषा मस्तक रेषेचा एक स्वतंत्र तुकडा आहे.

या आडव्या रेषेने गुरु ग्रहाचा आकार संकोचित केला आहे व गुरु ग्रह आकाराने छोटा झाला आहे. गुरु ग्रहाखाली असलेल्या ह्या मस्तक रेषेचा तुकडा, खालच्या मंगळ ग्रहाच्या जवळ आहे. हृदय रेषा व मस्तक रेषेतील मधल्या भागास मंगळाचे मैदान म्हणतात, या मंगळाच्या मैदानावरच खालच्या धाडसी व पराक्रमी मंगळाच्या सानिध्यात हा मस्तक रेषेचा तुकडा असल्याने मेधा ह्या धाडसी, पराक्रमी, लढाऊ वृत्तीच्या व परिणामांची पर्वा न करता जलद निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे.

उजव्या हातावरील गुरु ग्रहाचा आकार संकोचित झाल्याने मेधा यांच्यातील सात्विकता कमी झाली, तसेच डाव्या हातावरील अति फुगीर गुरू ग्रहाने मी म्हणेन मी करेन तेच खरे अशी प्रवृत्ती असल्याने त्यांनी आपल्या ध्येयासाठी कोणालाच जुमानले नाही. आपण करित असलेल्या विरोधाची व आंदोलनाच्या परिणामांमुळे होणार्‍या विकास व समृद्धीच्या बाजूकडे त्यांनी कायम सोयीस्कर दुर्लक्ष केले. मेधा यांच्या दोनही हातावरील गुरु ग्रह हा बिघडलेला असल्याने त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या होणार्‍या परिणामांची कधीच तमा बाळगली नाही.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या