केस विंचरताना करू नयेत या चुका...

केस विंचरताना करू नयेत या चुका...

आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये आणि शास्त्रांमध्ये आपली दैनंदिन दिनचर्या आणि व्यावहारिक गोष्टी यासंबंधात काही ठराविक नियम सांगितले गेले आहेत. याशिवाय प्राचीन काळापासून काही गोष्टींबाबत लोकांच्या मनामध्ये काही ठराविक धारणा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या नियमांचे पालन आजवर लोक करत आले आहेत. अशाचप्रकारे स्त्रियांच्या साजशृंगाराच्या बाबतीतही काही चालीरीती अगदी पूर्वीपासून चालत आल्या आहेत. आज आपण त्यावरच चर्चा करणार आहोत. स्त्रिया ज्यावेळेस आपले केस विंचरतात (combing hair) त्यावेळी त्यांनी पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

या परिस्थितीत केस विंचरणे टाळा- स्त्रियांनी कधीही उभ्याने आपले केस विंचरू (hair combing) नयेत. अ से केल्यास त्यांचे सौभाग्य कमी होते असे मानले जाते. म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य कमी होते. त्यामुळे महिलांनी ही खात्री करून घ्यावी की केस विंचरताना त्या आरामात बसलेल्या असतील.

सूर्यास्तानंतर महिलांनी हे करू नये- सुर्यास्तानंतर स्त्रियांनी कधीही केस विंचरू नयेत.तुम्हाला केस विंचरायचे (hair combing) असल्यास सूर्यास्त होण्यापूर्वीच विंचरावेत. असे करणे शुभफलदायी आणि सौभाग्यवर्धक मानले जाते.

डोके असे खाजवणे टाळा- स्त्रियांनी (women) या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की जर त्यांच्या डोक्यात खाज येत असेल तर चुकूनही दोन्ही हातांनी केस खाजवू नयेत. विष्णुपुराणात असे सांगितले गेले आहे की याने आर्थिक नुकसान होते. असे करण्याने देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) नाराज होऊन दूर निघून जाते आणि घरात दारिद्र्य येते.

भांगेत कुंकू भरताना- महिला भांगेत कुंकू भरतात. असे करताना तोंड उत्तर दिशेला ठेवून कुंकू भरा. उत्तर दिशा ही शिव-पार्वतीची दिशा आहे. त्यामुळे त्या दिशेला तोंड करून कुंकू लावल्याने शिव-पार्वतीचा आशीर्वाद लाभतो.

रात्री झोपताना असे केस ठेवू नको- रात्री अनेक महिला केस मोकळे ठेवून झोपतात. हे योग्य नाही. रात्री केस मोकळे ठेवायला नको. असे केस मोकळे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो, असे म्हणतात.

चुकूनही असा भांग पाडू नका- वाकडा तिकडा भांग पाडणे समुद्रशास्त्रात सांगितले आहे की तिरपा भांग नात्यांमध्ये दुरावा आणतो. आजकाल झिगझॅग भांग पाडण्याशी फॅशन आहे. कधीतरी चेंज म्हणून हे केलं तरी तिला नेहमीची सवय बनवू नका.

Related Stories

No stories found.