Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधचुकूनही अशाप्रकारे भोजन करू नका

चुकूनही अशाप्रकारे भोजन करू नका

माता अन्नपूर्णाला (Annapurna) अन्नाची देवीचा दर्जा देण्यात आला आहे. धर्मग्रंथानुसार, ज्या घरात आई अन्नपूर्णा (Annapurna) आशीर्वाद देते त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. म्हणूनच, माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहणे फार महत्वाचे आहे. आई अन्नपूर्णाला (Annapurna) आनंद देणे खूप सोपे आहे आणि तिची पूजा केल्याने, आणि तसेच खाली दिलेल्या उपाययोजना करून आईचा आशीर्वाद मिळू शकेल.

आई अन्नपूर्णा (Annapurna) धान्यात विराजमान असते, म्हणून आपण अन्नाची पूजा करावी. जेव्हा जेव्हा आपण लआणि त्यानंतरच आपण भोजन सुरू करा.

- Advertisement -

गरिबांना अन्नदान केल्याने आई अन्नपूर्णा (Annapurna) प्रसन्न होते. गायीस भाकरी किंवा चपाती खाऊ घातल्याने आई अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळतो. धान्याच्या डब्यात नेहमी एक रुपयाची नाणी ठेवा.

वर सांगितलेल्या उपाययोजना केल्यास अन्नपूर्णा (Annapurna) प्रसन्न होईल. आणि घरात अन्नधान्याची कमतरता कधीच येणार नाही.

चुकूनही करू नका ह्या चुका

आई अन्नपूर्णा (Annapurna) त्याच घरात राहते जेथे स्वच्छता असते. म्हणूनच, आपण आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायला विसरू नका.

पलंगावर बसून कधीही जेवू नका. असे केल्याने राहूसह अन्नपूर्णा (Annapurna) देखील दु:खी होते. शास्त्रानुसार अंथरुणावर अन्न ठेवणे म्हणजे अन्नाचा अपमान आहे. म्हणून पलंगावर बसून तुम्ही कधीही भोजन करू नये. नेहमी जमिनीवर बसून अन्न खाणे चांगले मानले जाते.

बरेच लोक जेवणाच्या ताटामध्ये जास्त प्रमाणात अन्न घेतात आणि ते पूर्ण खात नाहीत. ज्यामुळे हे अन्न निरुपयोगी होते आणि त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला शक्य तितके अन्न घ्या. जे पूर्ण संपवू शकतो.

कधीही कोणालाही आपले उष्टे अन्न देऊ नका. जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला अन्न देता तेव्हा केवळ साफ अन्न द्या.

जेवण झाल्यानंतर, बरेच लोक जेवणाच्या ताटातच आपले हात धुतात. जे योग्य मानले जात नाही. ताटात हात धुतल्यामुळे चंद्र आणि शुक्र (Moon and Venus) रागावले जातात. एवढेच नव्हे तर अन्नपूर्णाचा अपमानही मानला जातो. तर जर तुम्हाला ही सवय असेल तर ती त्वरित बदला.

उरलेले अन्न (Food) कधीही टाकू नका. खरं तर, बरेच लोक जेव्हा जास्त अन्न बनते तेव्हा ते टाकून देतात, जे योग्य मानले जात नाही. जेव्हा अन्न शिजले असेल तेव्हा ते एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा पशूला खायला द्या.

या गोष्टींचे जर तुम्ही पालन केले तर माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या