दिवाळी

सद्गुरुंचा संदेश
दिवाळी

भारतीय संस्कृतीत, एक असा काळ होता जेव्हा वर्षाच्या प्रत्येक दिवशी काही ना काही उत्सव असायचा -365 दिवसांचे 365 सण. यामागे अशी धारणा होती की आपलं संबंध आयुष्य हे उत्सवाप्रमाणे असल ंपाहिजे. तुमच्या आयुष्यात उत्सवाची वातावरणनिर्मिती व्हावी ह्या कल्पनेतून दिवाळी (diwali) साजरी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी तुमच्यात थोडीशी उतरावी ह्या उद्देशाने ते वाजवले जातात. फक्त एक दिवस तुम्ही मजा करून निघून जाणे हे काही ह्यामागील कारण नाही. आपल्या आतमध्ये असं रोजच जाणवलं पाहिजे.

दीपावली (diwali) हा दिव्यांचा सण आहे. तुम्ही पाहता, दिवाळीत प्रत्येक गाव, नगर नि शहर हजारो दिव्यांनी लखलखून जातं. हा सण फक्त बाहेर दिव्यांची रोषणाई करण्यापुरता मर्यादित नाही; त्याचा प्रकाश आतपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रकाश म्हणजे स्पष्टता. स्पष्टता नसेल तर, तुमच्या अंगी असलेला प्रत्येक गुण, तुम्हाला मिळालेली एक देणगी न ठरता, तुमचं फक्त नुकसान करेल, कारण स्पष्टतेरहित आत्मविश्वास विध्वंसक आहे. आणि आज जगातील बहुतांश गोष्टी स्पष्टतेरहित केल्या जात आहेत.

स्पष्टतेशिवाय तुम्ही काहीही करायला गेलात तर अनर्थच होणार. प्रकाशामुळे तुमच्या दृष्टीला स्वच्छ दिसतं. फक्त भौतिकदृष्ट्या नाही. तुम्ही किती स्वच्छपणे तुमच्या जीवनाकडे पाहता आणि आजूबाजूचं सर्व काही कसं समजून उमजून घेता, ह्यावर तुम्ही किती सामंजस्याने तुमचं आयुष्य जगणार हे ठरतं. दिवाळी हा असा दिवस आहे ज्यादिवशी काळोखीशक्तींचा विनाश झाला आणि सर्वत्र उजेड पसरला. ही सुद्धा मानवी आयुष्यातील एक कोंडी आहे. काळ्या ढगांमुळे जसे मळभ दाटते आणि सगळं वातावरण काळवटून जातं आणि ढगांना कळत नाही की ते सूर्याला झाकताहेत. माणसांना देखील बाहेरील कुठल्याही दिव्यांची गरज नाही. त्याने फक्त स्वतःमधील जमवलेल्या काळ्या ढगांचा अंधःकार बाजूला सारला की आपोआप सगळं दैदिप्यमान होईल. ह्याचे आपल्याला स्मरण असावे याकरिताच हा दिव्यांचा सण आपण साजरा करतो.

Related Stories

No stories found.