Sunday, April 28, 2024
Homeभविष्यवेधविविध दिशा आणि त्यांचे महत्त्व...

विविध दिशा आणि त्यांचे महत्त्व…

ईशान्य – नवनवीन विचार त्यांना सुस्पष्टता देणारी ईशान्य दिशा ,नैसर्गिक ऊर्जा ग्रहण शक्ती वाढविते. देवघराची उत्तम दिशा या दिशेवर गुरुचा अंमल असतो त्यामुळे येणारी मनाची शांतता इथे मिळते.

पूर्व ईशान्य – शरीर व थकलेल्या मनाला ऊर्जा देण्याचे काम ही दिशा करते अत्यंत आल्हाददायक समजली जाते.

- Advertisement -

पूर्व दिशा – समाजातील घटकांशी सामाजिक बांधिलकी व्यवसाय राजकारण जनसंपर्क यासाठी ही महत्वाची दिशा आहे.

पूर्व आग्नेय- ही दिशा मंथन या क्रियेशी संबंधित असल्यामुळे इथे बेडरूम नसावी. भावनिक संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा वाद-विवाद वाढू शकतात.

अग्नेय दिशा – नावाप्रमाणेच अग्नीशी संबंध असणारी ही दिशा आहे. मंगळाचे प्रतिनिधित्व करते. स्वयंपाक घरासाठी ही दिशा महत्त्वाची समजली जाते घरात येणारा पैसा आणि त्यांच्याने मिळणारी सुरक्षितता या दिशेद्वारे समजून येते.

दक्षिण आग्नेय हीसुद्धा अग्नी तत्वाची असणारी ,दिशा हॉल किंवा बेडरूम साठी उत्तम दिशा व्यक्तीचे शारीरिक सामर्थ्य या द्वारे पाहता येते व्यक्तीचा आत्मविश्वास पाहता येतो.

दक्षिण दिशा – बेडरूमसाठी उत्तम दिशा व्यायाम-योगासने-ध्यान यासाठी चांगला पर्याय आहे. तिथे झोपल्याने मानसिक समाधान मानसिक शांतता कार्यशक्ती वाढते.

दक्षिण नैऋत्य – टॉयलेट बाथरूमसाठी ही दिशा महत्त्वाची ठरते.

नैऋत्य दिशा – पृथ्वी तत्त्वाची सर्वात वजनदार असावी अशी दिशा. या दिशेचा कारक राहू-केतू यांना समजले जाते तिथे कोषागार म्हणजेच कपाट आणि तिजोरी असावी. मूळ कर्त्या पुरुषाची आरामाची दिशा ही असावी.

पश्चिम नैऋत्य – अयोग्य वस्तू या दिशेस ठेवल्यास हानिकारक होऊ शकते त्यामुळे इथे ठेवताना योग्य ती वस्तू ठेवावी.

पश्चिम दिशा – नातेसंबंध टिकवण्यासाठी, बैठकीसाठी किंवा डायनिंग टेबलसाठी ही जागा योग्य आहे

उत्तर दिशा- जलतत्वाची आहे उत्तमोत्तम संधी वापरून मिळणारा पैसा या दिशेकडून येतो.

ईशान्य दिशा – ही आरोग्याची निगडित आहे. औषध ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही महत्त्वाची दिशा आहे.

ऑफिसला जाताना

व्यवसायात मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सहकार्‍यांशी वाद, अधिकार्‍यांशी वादाची परिस्थिती उद्भवत असेल, तर अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा. करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे वास्तु उपाय आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

काम किंवा व्यवसायात प्रगतीचा संबंध सूर्यदेवाशी असतो असे मानले जाते. यामुळे तुमचा सूर्य बलवान होईल आणि नोकरीत येणारे सर्व अडथळे दूर होतील.

सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात रोळी आणि लाल फुले टाकून दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे, परंतु पायावर पाण्याचा शिडकावा करू नये.

गुरुवारी बेसन, हरभरा डाळ आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करा. रविवारी मसूर दान करा. कामावर जाण्यापूर्वी कपाळावर हळदीचा टीळा लावा. ऑफिसमध्ये काम करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे.

रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. पाण्यात अखंड, काळे तीळ आणि लाल फुले अर्पण करा. करिअरच्या प्रगतीसाठी हिरवा रंग शुभ मानला जातो.

कामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाचे कपडे जास्त वापरा. रोज गाईला हिरवा चारा किंवा गूळ, तूप आणि हरभरा खाऊ घाला. दररोज हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्राचा जप करा.

घरातील सर्व सदस्यांनी जमिनीवर बसून एकत्र भोजन करावे. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होते. कामाच्या ठिकाणी समस्या दूर होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या