आजचे राशीभविष्य - 3 ऑगस्ट 2020 Daily Horoscope

आजचे राशीभविष्य - 3 ऑगस्ट 2020
Daily Horoscope
Horoscope

मेष -

आज सहकार्‍यांमध्ये आपली लोकप्रियता वाढणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या सर्व गोष्टी सुरळीत होतील आणि चांगली प्रगती होईल. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक लाभ मिळविण्यासाठी नवीन मार्ग देखील सापडतील. भावंड व वडीलधार्‍यांशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण व प्रेमळ राहतील. कुटुंबातील सदस्यांसह लहान सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदमय असेल. वाहन हळू चालवा.

वृषभ -

आज आपले काम वेळेत पूर्ण होईल. पैसा वाढेल. आज एखादा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. व्यवसायातील जोडीदाराच्या मदतीने काम करा, तुम्हाला फायदा होईल. मित्राकडून चांगला सल्ला मिळाण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना चांगल्या संधी मिळतील. कामात नवीनपणा जाणवेल. आज मुलांबरोबर केलेला छोटा प्रवासही आनंददायी असेल. विवाहित जीवन आनंदाने व प्रेमाने बहरेल.

मिथून-

आज प्रयत्न केला तर तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. घरातील काही प्रकरणे अचानक तुमच्याकडे येऊ शकतात. थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. तुमच्यासाठी ते चांगले असेल. सहकार्य आणि तडजोडीच्या दृढ हेतू मनात ठरवून घराबाहेर पडा. ऑफिस किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला काही प्रकरणात किंवा इतर बाबतीत तडजोडी कराव्या लागू शकतात. या तडजोडी येणार्‍या काळात तुमच्यासाठी यशदायक असतील.

कर्क -

फारसा अनुकूल कालावधी नाही. विशेषतः आरोग्याच्या बाबतीत. आपण काही जुनाट आजाराने ग्रस्त होऊ शकता. आर्थिक संदर्भात पैशांचा कमी झालेला ओघ आपल्या असमाधानाचे कारण असू शकते. आपण कामाच्या ठिकाणी वचनबद्धतेची पूर्तता करण्याचा निर्धार केला पाहिजे. एजंट, प्रॉपर्टी-डीलर, सर्व्हेअर, कर सल्लागार किंवा औद्योगिक सल्लागार म्हणून आपण अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता. कामाच्या दबावाचा सामना करण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करून कुटुंबातील सदस्यांसह सुट्टी घालवा.

सिंह -

आज जुन्या घरगुती समस्येवर तोडगा काढला जाईल. तुमची चिंता दूर होईल. आज तुम्हाला कुठल्याही कामात अधिक कष्ट करावे लागतील परंतु त्याचा तुम्हाला फायदा होईल. जे कॉस्मेटिक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी दिवस चांगला जाईल. त्यांचा आर्थिक फायदा होईल. जोडीदार आनंदी असेल. भागीदारीमुळे व्यवसायाला फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या-

आज ऑफिसमध्ये विविध कामांत यशस्वी होऊ शकता. करिअरशी संबंधित काही गुंतागुंतीच्या प्रकरणांचे निराकरण होईल. काळजी करू नका. ऑफिसमधील तुमच्या कार्याचे कौतुक होऊ शकते. बढती मिळण्याची शक्यता आहे. भेटवस्तू मिळू शकते. नवीन मित्रांची भे होईल. व्यवसाय ककरणार्‍या लोकांना बुडीत पैसे मिळू शकतात. तुमच्या कामावर अधिकारी आनंदी असतील.

तूळ -

आज तुम्हाला विविध स्त्रोतांकडून फायदा होऊ शकेल. काही महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही समृद्ध आणि आनंदी कौटुंबिक जीवन जगू शकाल. कुटुंबात उत्सव साजरा करण्याचे योग आहेत. आपल्या मुलांच्या सुयोग्य कामांमुळे आपल्या मनात अभिमान आणि आनंद निर्माण होईल. आपले घर तयार करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी आपले बरेच पैसे खर्च होऊ शकतात. आईची काळजी घ्या.

वृश्चिक -

आज आपल्या जोडीदाराबरोबर अधिकाधिक वेळ घालवाल. आपण आरोग्याबाबत मफिट आणि फाईनफ असाल. मित्राला मदत केल्याने आपल्या स्वभावाचे कौतुक होईल. तुमचा मानसन्मान वाढेल. आज तुम्हाला पैसे मिळवण्याचे काही नवीन मार्ग सापडतील. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. मुले पालकांची आज्ञा पाळतील. व्यवसाय किंवा नोकरीतील महिलांसाठी हा दिवस खास ठरणार आहे. कुटूंबाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज आपण इतरांशी उघडपणे बोलू शकाल. सफलता मिळेल.

धनू-

आर्थिक बाबतीत विवेकी व्हा. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेतल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. पैसे मिळवण्यासाठी योजना बनवाल. नोकरीत खूप चांगल्या ऑफर्सही मिळू शकतात. जुन्या मित्रांना भेटी होतील. आपण भविष्यातील योजना तयार कराल त्यासाठी मनात सतत नियोजन सुरूच राहील. कार्यालयातील लोक सहकार्य करतील. आपल्या मताचा लोकांना फायदा होऊ शकतो.

मकर -

आपला व्यवसाय आयात-निर्याती संदर्भात असेल तर परदेशी प्रवास शक्य आहे. हा प्रवास तुमच्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल. नवीन भागीदारी व्यवसाय विस्ताराच्या बाबतीत भागीदारांसाठी फायदेशीर ठरेल. नवीन संपर्क आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमांच्या आधारे खूप चांगले निकाल मिळतील. जे प्रकल्प लांबणीवर पडले होते ते आता प्रगती करतील. आपणास आपल्या कुटूंबाकडून खूप प्रेम आणि आपुलकी मिळेल. मुलांशी संबंधित समस्या सापडतील.

कुंभ -

आज, लोकांशी बोलताना त्यांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकणे तुम्हाला आवडेल. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. मन लावून काम करा. व्यवसायात पुढे जाल. कार्यालयातील वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. अभ्यासासाठी शिक्षकांची मदत मिळेल. करिअरशी संबंधित नवीन संधी तुम्हाला मिळतील.

मीन -

आज आपण आपले कार्य पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकता. कामात व्यस्त असूनही दिवस चांगला जाईल. धनाच्या रूपानेही फायदा होऊ शकतो. आपल्याला नवीन नोकरी देखील मिळू शकते. बहुतेक लोकांचा दृष्टीकाने आपल्यासाठी सकारात्मक असू शकतो. कुटुंबातील छोट्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. शेतात व व्यवसायात नफा मिळेल. मुलांच्या बाबतीत असलेला तणाव संपू शकतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com