Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधआपल्यातील त्रुटींना सुधारा

आपल्यातील त्रुटींना सुधारा

आपण आपल्या जीवनावर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की सेवानिवृत्ती नंतर जीवन सुखकर होण्यासाठी सतत पैसे कमविण्यात लागलेलो असतो. भरपूर पैसे कमविण्यासाठी आपण खुप उशिरा पर्यत काम करतो, का? अधिक पैसे मिळविण्यासाठी आपण सुट्टीच्या दिवशी सुद्धा अधिक काम का करतो? आपल्या कामकाजातुन एखादा दिवस किवा काही तास कामाकाजाचा विचार न करता आपण आराम करीत सुट्टी घेतो का? जर आपल्या बरोबर असे घडत असेल तर हे बरोबर आहे का? जर आपण सर्व जगाचे धन-कमविले परंतु आपल्याला कामापासून शांती व समाधान मिळत नसेल तर अशा कामाचा काय फायदा?

जर आपल्या लक्षात आले कि आपण पैसे कमविण्यासाठी भरपूर वेळ देत आहोत आणि आपला परिवार, आपली आवड, आपली अध्यात्मिक साधना आणि आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी योग्य तितका वेळ देऊ शकलो नाही तर आपण केलेली निवड योग्य आहे का? भविष्यासाठी पैसे वाचवण हि चांगली गोष्ट आहे. गरज नसताना संपूर्ण आयुष्य धन कमविण्यासाठी खर्ची केले. हे बरोबर आहे का?

- Advertisement -

भविष्यात काय घडेल हे कोणी जाणू शकतो का? जेव्हा आपण वयस्कर होऊ तेव्हा आपल्याला वेळ मिळेल का, आपले आरोग्य ठीक असेल का? ज्याची आपण संपूर्ण आयुष्यभर वाट बघत होतो. अध्यात्म म्हातारपणी करण्यासाठी आहे असे म्हणून सोडून देतो. परंतु कोणाला माहित किं त्यावेळी आपण अध्यात्मिक साधना करू शकू का? आपण आपल्या परिवाराची एवढी काळजी करतो कि जो पर्यत ते वयस्कर होत नाही, त्यांना मुलेबाळे होत नाहीत,तेव्हा आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण काळ आपली अध्यात्मिक साधना व इतर आवडीच्या गोष्टीपासून वंचित राहतो आणि हि संधी परत येत नाही.

आपल्या वेळेचा उपयोग आपण कसाकरतो, याकडे आपण लक्ष दिल पाहिजे. जीवनातील इतर महत्वाच्या गोष्टीसाठी आपण वेळ काढला पाहिजे.आणि आवश्यकते पेक्षा अधिक धनसंचय करतांना त्या महत्त्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपण आपल्या वेळच्या नियोजनाकडे लक्ष दिल पाहिजे आणि आखणी केली पाहिजे. धन-संपत्ती आणि मालमत्ता यांच्यामुळेहोणार्‍या तणावामुळे आपली शांती आणि समाधान नष्ट होता कामा नये . आपण आपली वेळ आणि आपले जीवन कशा प्रकारे जगत आहोत हे महत्त्वपूर्ण आहे. जर आपण आपल्या आत्म्याचा आवाज ऐकला तर आपल्या लक्षात येईल कि आंतरिक शांती आणि समाधान संसाराच्या संपूर्ण धन संपत्ती पेक्षा अधिक मौल्यवान आहे.

(अध्यात्मिक गुरू संत राजिंदर सिंह जी महाराज हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्माचे विज्ञान) तथा सावन कृपाल रूहानी मिशन या आंतरराष्ट्रीय अध्यात्म संस्थेचे प्रमुख आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या