आपल्यातील त्रुटींना सुधारा

आपल्यातील त्रुटींना सुधारा
संत राजिंदर सिंह जी महाराज

प्रत्येक क्षणा-क्षणाला बदलणाऱ्या जीवनात आपण बर्‍याच लोकांना भेटत असतो आणि बर्‍याचशा समस्यांचा सामना करीत असतो. जर आपण मनाला मोकाट सोडले तर दुसर्‍या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यावर आणि कार्यावर निंदा condemnation करू लागलो तर प्रत्येक घटना परत-परत सांगण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा तर आपण एका टेप रेकॉर्ड प्रमाणे बनू. आपला प्रत्येक श्वास अनमोल आहे.

जर आपण दुसर्‍याची निंदा करण्यात वेळ वाया घालवत बसलो तर आपले जीवन व्यर्थ जाईल. काय माहित पुढील जन्मात आपण कोण बनणार? आपण केवळ आपल्या अध्यात्मिक Spiritual जीवनाकडे लक्ष ठेवायला पाहिजे. दुसरे काहीही करो, काहीही बोलो परंतु आपण आत्मकेंद्रित असले पाहिजे. परमेश्वराकडे घेऊन जाणार्‍या आत्मिक यात्रेकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला प्रत्येक दुसर्‍या माणसा ची आलोचना, निंदा करण्याची नोकरी दिलेली नाही. आपण आपली स्वतःची निंदा Self-condemnation केली पाहिजे. आपण आपली निंदा इतक्या तीव्रतेने करायला हवी, जेवढी आपण दुसर्‍याची करतो. तेव्हा आपल्याला जाणवेल आपल्यात काय काय त्रुटी आहेत. आपण त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपल्यातील वाईट विचार, बोल आणि कार्याचा आपण त्याग करून आपल्यामध्ये सदगुणांना धारण केले पाहिजे. आपण दुसर्‍यांच्या चुका आणि त्रुटींकडे सहानुभूतीने पहावयास हवे. जसे एखादे लहान बालक चुका करत असल्यास, आपण त्याची निंदा condemnation करत नाही, त्याच्याकडे दयेच्या दृष्टिकोनाने पहात असतो. आपल्याला या गोष्टीचा अनुभव असतो की ते शिकण्याच्या अगोदर अनेक चुका करतील. अशाच प्रकारे इतर देखील चुका करत असल्यास, आपण त्याकडे प्रेमाने व सहानुभूतीने पाहिले पाहिजे.

जर आपण रोजच्या जीवनात दुसर्‍यांच्या बाबतीत प्रेम आणि सहानुभूतीचा अवलंब करत असू, तर आपल्याला याचा अनुभव येईल की परमेश्वर आपल्यावर प्रसन्न आहे व जास्तीत-जास्त त्याच्या दयेचा आपल्यावर वर्षाव होत आहे. मग आपण आपल्या चारी बाजूच्या लोकांसाठी शांती आणि प्रेमाचे प्रतिक बनू. त्यामुळे आपली प्रगती लवकर होईल व इतर सद्गुण ही आपल्यात येतील.

जर आपल्यातील प्रत्येक मनुष्य या महान लक्ष्याला प्राप्त करू शकला, तर आपली ही धरती सुवर्णयुगास Golden Age प्राप्त करेल. ज्यामुळे कोणतेही युद्ध अथवा लढाई होणार नाही. आपण अशा विश्वात जाऊ ज्यामध्ये प्रत्येक जटिल आणि वादविवादाचे समाधान शांततेने होईल.

(अध्यात्मिक गुरू संत राजिंदर सिंह जी महाराज हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्माचे विज्ञान) तथा सावन कृपाल रूहानी मिशन या आंतरराष्ट्रीय अध्यात्म संस्थेचे प्रमुख आहेत.)

Related Stories

No stories found.