Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधअध्यात्मात एकाग्रता

अध्यात्मात एकाग्रता

असे लाखो लोक आहेत ज्यांना वाटतं की ते अध्यात्मिक मार्गावर आहेत पण त्यात ते काहीच प्रगती करत नाहीत याचे कारण हे आहे, की या मार्गात खरोखर काही घडण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून देणे गरजेचे आहे.

स्वतःला पूर्णपणे झोकून देणे याचा अर्थ असा नाही की आपण आपले काम थांबवले पाहिजे, कुटुंबाचा त्याग किंवा इतर कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हा गैरसमज नेहेमीच समाजात राहिला आहे, जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दरीत जा. डोंगर, दरींमध्ये कुठलीच अध्यात्मिकता नाही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे. तुम्ही तुमच्या आत जे काही करता, ते अध्यात्म Spirituality आहे, तुमच्या बाहेर, बाह्य जगात तुम्ही काय करता ते अध्यात्म नव्हे. तुम्ही कोठेही गेलात, शहरात रहात असाल किंवा हिमालयात, तुमचे आंतरिक जग हे सारखेच असते. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता किंवा कोणत्या वातावरणात वावरता ह्या वैयक्तिक पसंती आहेत. त्याचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही.

- Advertisement -

अध्यात्म Spirituality हे एक आतल्या दिशेने टाकले जाणारे पाऊल आहे – एक असा आयाम जो तुमच्या वर्तमान अनुभव कक्षेच्या बाहेर आहे, अशा आयामात प्रवेश करण्यासाठी एक वेगळ्याच पातळीची एकाग्रता लागते. आत्ता ह्या क्षणी, तुमची स्वतःची अशी वैयक्तिक समजण्याची रीत आहे, तुमचे स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या काही धारणा आणि स्वतःचे काही तत्वज्ञान आहे; आणि तुम्ही ते बाजूला सारले नाही. तुम्हाला जर

अनुभवात्मक आयामात पाऊल ठेवायचे असेल, तर आजपर्यंत तुम्ही करत असलेली सर्व व्यर्थ बडबड, तुमची धारणा, मान्यता असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्ही खरं किंवा खोटं समजत असलेल्या सर्व गोष्टी, हे सर्वकाही तुम्ही बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

आत्ता ह्या क्षणी, तुम्ही स्वतःला जे काही समजता किंवा जग तुम्हाला जे काही समजत असेल, ते केवळ सामाजिकदृष्ट्या निगडीत आहे. अस्तित्वाच्या दृष्टीने त्याचा काडीमात्र संबंध नाही. अस्तित्वाच्या दृष्टीने काही घडायला हवे असेल, तर तुम्ही त्याला पूर्णतः एका वेगळ्या मार्गाने सामोरे जाणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा सामाजिक मूर्खपणा बाजूला ठेवायला हवा. तुमचा सर्व मूर्खपणा जर तुम्ही बाजूला सारला, आणि नुकतेच जन्माला आल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली, तरच हे साध्य होण्याची शक्यता आहे.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या