Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधख्रिसमस पर्व

ख्रिसमस पर्व

ख्रिसमसचा उत्सव संपूर्ण विश्वामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो. या दिवशी ईसा मसीह यांचा जन्म झाला होता ज्याच्या उपदेशाच्या आधारावर इसाई धर्माची सुरुवात झाली होती.

संत राजिंदर सिंह जी महाराज

ख्रिसमसच्या (Christmas) ह्या पर्वामध्ये लोक एकमेकांना प्रेमाने भेटतात, त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात व भेटही देतात. ख्रिसमसचा हा पर्व आपल्याला संधी देतो कि आपण ईसा मसीह (क्राईस्ट) याचा अर्थ समजला पाहिजे. ईसा मसीह यांनी आपल्या शिष्याना जो अनमोल संदेश दिलेला आहे त्याला आपण दोन उपदेशांमध्ये पूर्ण करू शकतो किंवा सांगू शकतो.

- Advertisement -

तुम्ही तुमच्या परमेश्वराला पूर्ण हृदयातून, आत्म्यातून प्रेम करा. आणि आपल्या शेजार्‍यावरही स्वतः सारखे प्रेम करा . आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं कि ह्या दोन उपदेशावरच सर्व नियम आणि आचार आधारित असतात.

ईसा मसीह यांनी केवळ हे दोन उपदेशच दिले नाही तर स्वतः सुद्धा याप्रमाणे जीवन जगले. हीच संतांची खरी विशेषता असते कारण ती प्रेमाची प्रतिमा असतात.

परमेश्वर म्हणजे प्रेम आहे आणि आपला आत्मा म्हणजे त्या प्रेमाचा किरण आहे आणि हे प्रेम एकतर परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे मनुष्य आणि परमेश्वर यांनी बनवलेल्या या सृष्टीच्या धाग्यामध्ये बांधलेलं आहे. प्रेम म्हणजे जीवन आणि प्रकाश यांच्या नियमांची पूर्णता आहे.

तर आपण यावर विचार करुया की आपल्या जीवनामध्ये खरंच प्रेम आहे का? खरंच आपण एकमेकांची प्रेमाने सेवा करतो का? आपण खरंच दुसर्‍याबद्दल म्हणजे अशा लोकांबद्दल ज्यांचे विचार आपल्यापेक्षा भिन्न आहेत, त्यांच्याबद्दल उदार आणि सहनशील असतो का? काय आपल्या मनात दलित लोकांबद्दल दया आणि सहानुभूती आहे का? आजारी, दुःखी कष्टी लोकांसाठी प्रार्थना करतो का? जर आपण प्रेमानी एक दुसर्‍या सोबत राहू शकत नाही तर आपण खरंच परमेश्वरापासून फारच दूर आहोत आणि धर्मापासून ही दूर आहोत. मग आपण कितीही मोठ्या मोठ्या गोष्टही करत असलो, कितीही धर्मनिष्ठ असलो तरी त्याला काहीच अर्थ नाही.

संतांच्या मनामध्ये सर्वांप्रती प्रेमभाव असतो. संत हे कधीच लोकांचा रंग, देश किंवा त्यांचा धर्म यावरून भेदभाव करीत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीही उच्च किंवा निच्च नाही. क्राईस्ट ने यहुदी आणि गैर- यहुदी दोघांनाही समान वागणूक दिली आणि समाजातील शूद्र समजल्या जाणार्‍या वर्गाला सुद्धा स्वीकारले आणि स्वतःच्या जीवनाचा एक आदर्श उदाहरण त्या काळातील लोकांसमोर ठेवला.

ईसा मसीह यांना नेहमी वाटायचं कि त्यांचे शिष्य नेहमी त्यांचा उपदेश फक्त ऐकू नयेत तर त्यानुसार वागायला पाहिजे . खूप लोक ऐकतात पण त्यातील फक्त काहीच लोकं समजतात आणि ज्यांना समजते त्या मधून पण फारच कमी प्रमाणात आचरणात आणतात.

ख्रिसमसच्या या पावन पर्वावर भगवान ईसा मसीह यांनी जो संदेश आणि उपदेश दिलेला आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा. जर खरंच आपण ईसा मसीह यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायला लागलो तर खर्‍या अर्थाने आपण ख्रिसमस हे पर्व आनंदाने साजरा करत आहोत असं समजू.

- Advertisment -

ताज्या बातम्या