घरी करा हे 3 योगासन तंदुरुस्त राहा

घरी करा हे 3 योगासन तंदुरुस्त राहा

या काळात घरी राहणे सर्वात सुरक्षित आहे. अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहे. अशात पायी चालणे, जॉगिंग, जिम, व्यायाम हे योग्य प्रकारे होत नसल्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. अशात इतर आजरा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणून घरी राहून सोपे योगासन करुन आपण स्वत:ला फिट ठेवू शकता.

1. सूर्य नमस्कार : सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप 12 वेळा करा. सोबतच किमान 5 मिनिट अनुलोम- विलोम प्रणायाम करा. ही संपूर्ण क्रिया करण्यासाठी 15 मिनिट लागू शकतात. पण हे मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत फायद्याचं ठरेल.

2. मंडूकासन : मधुमेहाच्या रुग्णांसाठी मंडूकासन तसंच कुर्मासन देखील योग्य आहे. यात पेन्क्रियाज सक्रिय होतात ज्याने डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. हे पोटासाठी उत्तम व्यायाम आहे. याने गॅस, अपचन आणि कब्ज सारखे पोटाचे आजार नाहीसे होतात.

विधी : सर्वप्रथम दंडासनमध्ये बसत वज्रासनमध्ये बसावे नंतर दोन्ही हाताच्या मुठ्ठ्या बंद कराव्या. अंगठा बोटांमध्ये दाबावा. दोन्ही मुठ्ठया बेंबीच्या दोन्ही बाजूला लावून श्वास बाहेर सोडावा आणि समोरच्या बाजूला वाकून हनुवटी जमिनीवर टेकवावी. जरा वेळ या स्थितीत राहून पुन्हा वज्रासनमध्ये यावे. मंडूकासन केल्यानंतर उष्ट्रासन अवश्य करावे.

3. आंजनेयासन : संस्कृत शब्द आंजनेयचा अर्थ आहे अभिवादन किंवा स्तुती. हनुमानाचं एक नाव आंजनेय देखील आहे. इंग्रजीत याला डरर्श्रीींरींळेप झेीश म्हणतात. हे आसान त्याच प्रकारे करतात ज्याप्रकारे हनुमान आपला एक गुडघा टिकवून दुसरा पाय पुढे ठेवून कंबरेवर हात ठेवायचे.

अंजनेय आसनमध्ये दुसर्‍या आसन आणि मुद्रांचा देखील समावेश आहे. याने छाती, तळहात, मान आणि कंबरेला आराम मिळतो. नियमित अभ्यासाने जीवनात एक्रागता आणि संतुलन वाढतं.

विधी : सर्वप्रथम वज्रासनमध्ये बसावे. हळुवार गुडघ्यांवर उभे राहून पाठ, मान, कूल्हे आणि मांडी सरळ ठेवा. हात कंबरेला लावून ठेवा. आता डावा पाय पुढे वाढवून 90 डिग्री कोणासमान जमिनीवर ठेवा. या दरम्यान डावा हात डाव्या पायाच्या मांडीवर राहील.

मग आपल्या हाताचे तळवे हृदयाजवळ ठेवा म्हणजेच ते नमस्कार मुद्रा. श्वास आत खेचून जुळलेले हात डोक्याच्या वर सरळ करत डोकं मागील बाजूला वाकवा. या स्थितीत हळू-हळू उजवा पाय मागे सरळ करत कंबरहून मागे वाकावं. या अंतिम स्थितीत जरा वेळ राहावे. नंतर पुन्हा श्वास सोडत वज्रासन मुद्रेत यावे. ही क्रिया उजव्या पायासह देखील करावी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com