Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य – Weekly Horoscope

मेष – अडचणीचा सामना करावा लागेल

कामाच्या संधी उपलब्ध होतील, त्याचा फायदा करून घ्यावा, महत्त्वाचे निर्णय घेताना थोरांचा सल्ला फायदेशीर ठरेल. व्यापार व्यवसायातून आर्थिक फायदा होईल, इतरांवर विसंबून राहू नका, आत्मनिर्भर व्हावे लागेल, आपल्या मनातील सर्व गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगू नका, अनेक स्वप्नपूर्तीचा काळ, वृद्ध व आजारी व्यक्ती यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. दगदग व त्रास सहन करावा लागेल. शुभ तारखा : 21,23

- Advertisement -

वृषभ – खर्चावर नियंत्रण ठेवा

आपण घेतलेल्या निर्णयावरून मागे सरकू नका, यश मिळण्यास विलंब लागेल. पण विजय आपलाच होईल असे सकारात्मक विचार ठेवून पुढे जा. आपले छंद जोपासण्यास अतिशय उत्तम काळ, मोबाईल, लॅपटॉपवर जास्त काळ काम केल्याने डोळ्यांचे विकार उद्भवू शकतात. रागावर नियंत्रण मिळवा, अन्यथा आप्तेष्टांशी संबंध बिघडू शकतात. महिलांनी खर्चावर नियंत्रण मिळविणे आवश्यक. महिलांसाठी उपासना करण्यास उत्तम काळ आहे. जोडीदाराचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी व्हाल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. अचानक लाभ होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. अतिवेगाने वाहन चालवणे टाळावे. नोकरीत अधिकारीवर्ग आपल्यावर खूष राहील. आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील व समाधान लाभेल. शुभ तारखा : 23,25,26

मिथुन – आळस झटकून काम करा

अनेक जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. त्यामूळे मानसिक आनंद लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढीस लागेल. पूर्वसंचित उपयोगात येईल. आर्थिक व्यवहार पूर्ण करावे लागतील. प्रवासात भेटलेल्या व्यक्तींची मैत्री फायदेशीर ठरेल. नि:स्वार्थपणे केलेल्या समाजसेवेचे आपणास योग्य ते फळ मिळेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विहीर, तलाव, नदी इत्यादी ठिकाणी पोहणे किंवा तत्सम गोष्टींसाठी जाणे टाळावे, अनर्थ घडू शकतो. महिलांनी प्रवास करणे टाळावे. वाहनपीडा योग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सावधगिरी ठेवणे आवश्यक ठरेल. शुभ तारखा : 24,25, 26

कर्क – कार्यसिद्धीचा काळ

आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी मदतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून कार्य सुलभ होईल. प्रत्येक वेळी आपल्याच हाताला यश लागेल असे नाही. काही वेळेस इतरांचीही मदत फायदेशीर ठरते, याचा प्रत्यय येईल. कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. वसुली करताना फार श्रम करावे लागतील. आईवडिलांची सेवा करण्याचा योग येईल. महिलांसाठी कार्यसिद्धीचा काळ. शुभ तारखा : 21, 22, 26

सिंह – कामाचा वेग वाढवा

साधना उपासना वाढीस लागून मनास शांती लाभेल, आध्यत्मिक गुरू किंवा आध्यत्मिक अधिकारी पुरुष यांच्या सहवासाने जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा सहज होईल. आपण करत असलेल्या कार्यामुळे इतरांस त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामाचा वेग वाढवावा लागेल. मित्रमैत्रिणी यांच्या बरोबर भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार सोडून द्यावा. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्यास अनुकूल काळ. जुन्या आठवणींचा ठेवा हाती लागेल. मनास प्रसन्नता लाभेल. दूर असलेल्या भावंडासोबत सुखकारक व आनंददायी वार्तालाप होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ तारखा : 23, 24

कन्या – अनाठाई खर्च टाळा

अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. व्यवहारात फसवणूक होऊ शकते, प्रलोभनास बळी पडू नये. आपले सात्विक विचार लोकांच्या हिताचे ठरतील. अंतर्गत वादविवाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. अवघड वाटणार्‍या कार्यांत मित्राचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी दिली जाईल. सप्ताहाचा उत्तरार्ध महिलांच्या उत्कर्षाचा ठरेल. पुढील काळात मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता त्या दृष्टीने योग्य पद्धतीने नियोजन करावे. आपणही समाजाचे घटक असून समाजाचे देणे लागतो हे समजून गरजूंना मदत करावी. अनाठाई खर्च करणे टाळावे. शुभ तारखा : 23, 25

तूळ – व्यसनांना दूर ठेवा

संमिश्र फळ प्रदान करणारा सप्ताह. विवाह आदी समारंभात आपला सहभाग तेथील वातावरण प्रसन्न करेल. समाजोपयोगी कार्य करावे लागतील. प्रवास करताना वाहन चालवणे टाळावें. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवावेत. लांबच्या प्रवासाचे बेत रद्द होतील. योगासने, ध्यान यातून शरीर थकवा कमी होऊन प्रसन्नता जाणवेल. संशोधनासाठी योग्य काळ. महिलांनी वाद विवाद टाळावेत. शुभ तारखा : 22, 23

वृश्चिक – आर्थिक आवक उत्तम

आपल्या कल्पनांना मूर्तरुप देण्यासाठी योग्य काळ. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक अडचणी कमी होऊन, प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मित्रांच्या मंगलकार्यत सहभागी होता येईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवास दरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ शकते, खबरदारी घ्यावी. घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्यप्रकारे पाहुणचार करावा. विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. शुभ तारखा : 21, 22

धनू – इच्छापूर्तीसाठी संघर्ष

आपले म्हणणे समोरच्याला पटवून देण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. व्यसन करणे टाळावे, आर्थिक व शारीरिक हानी संभवते,काळजी घ्यावी. किरकोळ आजार उद्भवतील. हक्कासाठी देत असलेल्या लढ्याला अनेक लोकांचे समर्थन मिळून आपली बाजू भक्कम होईल. न्यायालयातील प्रलंबित केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल. महिलांना इच्छापूर्तीसाठी संघर्ष करावा लागेल. शुभ तारखा : 21,23

मकर – कर्ज टाळा

प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवण्यात यश येईल. नोकरचाकरांवर अतिविश्वास ठेवू नका, घात होण्याची शक्यता. सट्टा किंवा तत्सम ठिकाणी पैसे वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. कर्जाऊ रक्कम घेणे टाळावे. तांत्रिक विद्या, गूढ विद्या शिकण्याचा तीव्र योग. विवाहोत्सुकांचे विवाह जमण्यास अतिशय उत्तम काळ. महिलांनी कर्ज घेणे टाळावे. शुभ तारखा : 25, 26

कुंभ – शेतकर्‍यांचे आर्थिक संकट दूर होईल

आनंदाची डोही आनंद तरंग, अशा प्रकारे भरपूर आनंद देणारा सप्ताह. संगीत, गायन, कला प्रेमीसाठी साधनेचा काळ. नवयुवकांचे गृह , वाहन इत्यादी स्वप्न साकार होण्यास उत्तम काळ. आईवाडील यांच्या सहवासात अनेक दिवस उत्तम जातील. शेतकरी मजूर यांचे आर्थिक संकट दूर होईल. आजारी व्यक्तींच्या तब्यतीमध्ये विशेष सुधारणा होऊन हॉस्पिटलमधून रजा मिळेल. शुभ तारखा ः 21 ते 25

मीन – आर्थिक संकटावर मात

हसतमुख स्वभावामुळे अनेक कार्ये सुलभ होतील. मागील येणे वसूल होतील. त्यामुळे आर्थिक संकटावर मत करता येईल. व्यवसाय किंवा इतर गोष्टींसाठी कर्जाच्या प्रतीक्षेत असणार्‍यांची कर्ज मान्य होतील. आईविषयीची आदरभावना अधिक वृद्धिंगत होईल. संशोधनात्मक अभ्यास वाढीस लावा. भविष्याची योग्य प्रकारे आखणी करून आपले भविष्य अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा. वृद्धांची काळजी घ्या. महिला व उद्योजकांसाठी अनुकूल काळ. शुभ तारखा : 25, 26, 27

- Advertisment -

ताज्या बातम्या