साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

13 ते 19 मे 2021
साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष - पूर्वनियोजित प्रवासाचे बेत रद्द

कामाचे व्यवस्थित नियोजन करता येईल. अधिक कामाचा ताण सहन करावा लागेल. सहकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. महिलांकडून कार्यक्षेत्रात उत्तुंग कामगिरी होईल. चिंताजनक परिस्थिती सहजपणे हाताळण्यात यशस्वी व्हाल. पूर्वनियोजित प्रवासाचे बेत रद्द होतील. आप्तेष्टांशी वार्तालाप होऊन मन सुखावेल. घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे चांगले. शुभ तारखा - 14,15,19

वृषभ - प्रलोभनांमुळे फसवणूकीची शक्यता

मनास सुख प्रदान करणारा सप्ताह. चिंता मिटतील. एखादी शुभवार्ता कानावर पडेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांकडून केलेल्या कामाचे कौतूक होऊन कार्यक्षेत्रात पदोन्नती होईल. आप्तस्वकीयांची आरोग्यविषयी काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांनी प्रलोभनांच्या आहारी जाऊन कोणतीही खरेदी करू नये, फसवणूक होऊ शकते. कौटुंबिक सदस्य मडंळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊन मानसिक आनंद वाढेल. कामकाजात काही प्रमाणात स्थित्यंतर दिसून येण्याची शक्यता आहे. घर खरेदीचे व्यवहार मार्गस्थ होऊ शकतील. शुभ तारखा : 18,19

मिथुन - आळस झटकून काम करा

मनावर ताबा ठेवावा. प्रलोभनास बळी पडू नये. व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रमाण वाढेल. दूरचा प्रवास टाळावा. आत्मशांतीसाठी ध्यान, साधना, उपासना यांचा उपयोग करावा. आपल्याकडील असणार्‍या अनेक कला इतरांना शिकवण्याचा योग्य कालावधी. काही काळ स्वावलंबी जीवन जगावे लागेल. इतरांचे गुण दोष न दाखवता आपण स्वतःचे काम स्वतः करण्यात हित आहे. आळस झटकून कामाला सुरुवात करा, यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 15,16,17

कर्क - खर्चाचे प्रमाण वाढू शकते

मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. समाजकार्य करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आत्मनिर्भर होऊन काम करावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मानसिक ताण तणावातुन मुक्तीसाठी योगविद्येचा अवलंब करावा. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. मंगल कार्यात हजेरी लावताल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होईल. आर्थिक गुंतवणूक विशेष सावधानता ठेवूनच करणे उचित ठरेल. शुभ तारखा : 17, 18

सिंह - रखडलेली कामे मार्गी लागतील

आपल्याकडून झालेल्या चुकीचे आत्मचिंतन करून नव्या उमेदीने पुन्हा कामास सुरुवात करावी. स्वतःमधील प्रतिभा ओळखावी. कामगार व इतर कर्मचारी यांवर अतिविश्वास टाकू नये. जोडीदाराचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी व्हाल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. अचानक लाभ होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. अतिवेगाने वाहन चालवणे टाळावे. खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. दगदग व त्रास सहन करावा लागेल. संयम ठेवणेच उचित ठरेल.शुभ तारखा : 17, 18

कन्या - शेतीविषयक कामात आवड

मुलांचे मनोरंजन कराल. अपत्यप्राप्ती झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. शत्रूस कमी लेखून चालणार नाही. गाफील राहून चालणार नाही. योजना अंमलात आणण्यापूर्वी पुन्हा पुन्हा तपासून घ्याव्यात. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जेष्ठांचा सल्ला घ्यावा. शेतीविषयक कामात आवड निर्माण होईल. मातुल घराण्याशी ताणलेले संबंध सुधारून जवळीक निर्माण होईल. जोडीदाराची मनधरणी करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत अधिकारीवर्ग आपल्यावर खूष राहील. त्यांनी आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील व समाधान लाभेल. शुभ तारखा : 14, 15

तूळ - व्यसनांना दूर ठेवा

बर्‍याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मातृभूमीत जाण्याचा योग येणार आहे. कुटुंबियांसोबत हा काळ अतिशय आनंदात व्यतीत होणार आहे. व्यसन करणे टाळावे. सट्टा, लॉटरी इत्यादी विषयात फायदा होण्याची दाट शक्यता. कोर्टात रखडलेले काम पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे, संयम राखावा. पाठीचे विकार जाणवतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महिलांनी वाद विवाद करणे टाळावे. वाहनपीडा योग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सावधगिरी ठेवणे आवश्यक ठरेल. शुभ तारखा : 17, 18, 19

वृश्चिक - वाहनसौख्य लाभण्याचे योग

मनातील संकल्प पूर्ण होण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील, यशाच्या अंतिम टप्प्याजवळ आहात. गृहस्वप्न पूर्ण होऊ शकते. महिलांना वाहन सौख्य लाभण्याचे योग. आपले काम साधून घेण्यासाठी काही काळ विरोधकांशीही गोड बोलावे लागेल. गुढविद्या, तंत्रविद्या इ शिकण्याचे योग. पूर्वजांकडून जतन केलेले अतिमहत्वाचे दस्तावेज हाती लागतील, यापासून भविष्यात फायदा होईल. शुभ तारखा : 17, 19

धनू- कौटुंबिक सौख्य लाभेल

कामाचे व्यवस्थित नियोजन करून कार्य मार्गी लावावे. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत. जुन्या आठवणींचा ठेवा हाती लागेल. मनास प्रसन्नता लाभेल. दूर असलेल्या भावंडासोबत सुखकारक व आनंददायी वार्तालाप होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील, यातुन घरातील सात्विकता वाढीस लागेल. गृहकर्ज मान्य होईल. पुढील काळात आर्थिक संकट येण्याची शक्यता त्यादृष्टीने योग्य पद्धतीने नियोजन करावे. शुभ तारखा : 14, 15, 17

मकर - गरजूंना मदत करावी

स्वतःमधील विविध कलागुणांना वाव देण्याचा कालावधी. आपले बोलणे कोणालाही यातना देणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आपले कामे आपण स्वतः करून स्वावलंबी व्हावे. सामाजिक किंवा राजकीय भाष्य करू नये यामुळे टीकेचा धनी व्हावे लागेल. आपणही समाजाचे घटक असून समाजाचे देणे लागतो हे समजून गरजूंना मदत करावी. अनाठाई खर्च करणे टाळावे. शुभ तारखा : 16, 17

कुंभ - समाधान लाभेल

सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक, तंत्रज्ञान, उच्चशिक्षण व आजवर केलेल्या संशोधनाचे चीज होऊन मोठे यश हाती लागेल. संकल्पना व संकल्प पूर्णत्वास येतील. परदेशातून अनेक संधी उपलब्ध होतील. जीवनाच्या अति महत्वाच्या टप्प्यावर आहात, विचार करून निर्णय घ्यावेत. सर्वांशी प्रेमाने वागावे. समाजिक जबाबदारीचे भान ठेवा. जुने येणे वसूल होतील. सरकारी कामे पूर्ण होण्यास विलंब लागेल. सकारात्मक विचार करावा. आरोग्यविषयी तक्रारी सुरू राहतील. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शुभ तारखा ः 17 ते 19

मीन - मानसिक शक्तीत वाढ

मानसिक खच्चीकरण करणारा काळ. कोणाच्याही बोलण्याने व्यथित होऊ नका आपले कार्य सुरू ठेवा. संघर्ष करावा लागेल. मित्र परिवाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. भविष्याची दिशा ठरवण्यासाठी उत्तम काळ. थोरामोठ्यांच्या सहवासाने मानसिक शक्ती विकसित होईल. विविध कामाचे अनुभव मिळतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक चणचण दूर होऊन आर्थिक लाभ होण्याची शक्यता, पैशांचा योग्य पद्धतीने वापर करावा. शुभ तारखा : 15, 18

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com