Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य – Weekly Horoscope

मेष – घर खरेदीसारख्या व्यवहारात प्रगती

जवळच्या स्नेहीजनात घडणार्‍या घटना उल्हासवर्धक असतील. नवचैतन्याने पुढील मार्गक्रमण कराल. घर खरेदीसारख्या व्यवहारात प्रगती दिसून येईल. आर्थिक व्यवहार करताना त्यात्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. विवाहाची बोलणी अंतिम टप्यात येईल. प्रवास दरम्यान शारीरीक काळजी घ्यावी.ालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक कलहांमुळे आठवड्याच्या शेवटी मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो. शुभ तारखा : 2, 4

- Advertisement -

वृषभ – नोकरीत पदोन्नती होईल

उच्च वैचारिक पातळीमुळे कोणत्याही निर्णयातील फायद्या तोट्याचे परिणाम किंवा त्याचे अंदाज मांडण्यात मोलाची कामगिरी बजावलं. मित्रपरिवाराची अपेक्षित साथ मिळेल. विवाह इच्छूकांसाठी आनंदाची बातमी देणारा हा आठवडा आहे. भागीदारीतील व्यवसाय फायद्यात रहातील. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावाल. वाडवडिलांनी करून ठेवलेली तरतूद या काळात प्रत्यक्ष उपयोगास पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. वडिलांचा सल्ला आणि अनुभव आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. अचानक धनलाभ होईल. प्रलंबित प्रश्न सुटतील. धार्मिक स्थळाला भेट द्याल. स्पर्धेत उतरलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. कौटुंबिक कलह आणि मानसिक विवंचनेस सामोरे जाऊ शकते. काळजीपूर्वक प्रवास करा. शुभ तारखा : 3, 5

मिथुन – नोकरी व्यवसायात अनपेक्षित लाभ

पूर्वी केलेले व्यवहार मार्गी लागण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. परिवारासाठी वेळ द्यावा लागेल. डोळ्याचे विकार त्रासदायक ठरू शकतात. नोकरी व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील. समव्यावसायिकांची साथ मिळेल. सामूहिक कार्यात जबाबदारी घ्यावी लागेल. सामाजिक प्रतिष्ठा मानसन्मान मिळू शकतील. सरकार दरबारी अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. दूरचे प्रवासाबाबत नियोजन होण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून काही अप्रिय बातम्या प्राप्त होण्याचा योग. शुभ तारखा : 29,30

कर्क- वादात अडकू नका

महत्वाच्या कामाबाबत गुप्तता बाळगणे हिताचे राहील. अकारण दुसर्‍यांच्या वादात उडी घेऊ नका. न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होईल असे वागणे संकटाला आमंत्रण ठरू शकेल. जवळच्या नातेवाईकांची साथ मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय करण्याची संधी चालून येईल. मानसिक संतुलन ढासळल्याने आपत्तीजन्य स्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खोल पाण्यात जाणे टाळावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी येण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 30, 4

सिंह – कौटुंबिक वातावरणात आनंदाची लाट

आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. योग आणि व्यायामाला कमी पडू देऊ नका आणि शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. अनेक गोष्टी आपल्या समोर उभे राहतील तेव्हा जेव्हा आपले कुटुंब आणि आपले मित्र आधारस्तंभांसारखे उभे असतील. मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंदाची लाट दिसेल. नोकरीतही नवीन कंत्राटे मिळविण्याचा योग. कोर्ट कोर्टाच्या खटल्यांमध्येही आपल्या बाजूने निर्णय घेण्याचे संकेत. व्यापारी वर्गासाठीही वेळ अनुकूल असेल, उत्पन्न वाढेल. शुभ तारखा ः 2,4

कन्या – उच्च अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा

जमिनीचे व्यवहार करण्यासाठी अत्यन्त शुभ आठवडा आहे. घरातील सुभोभिकरणाच्या अथवा गृहउपयोगी वस्तू खरेदी करु शकाल. प्राकृतिक कारणाने विचलितपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तव्यात कसूर रहाणार नाही याची दक्षता घ्या. लाभाचे पद मिळण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल. वडिलोपार्जित संस्कारांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. उच्च अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित चिंतापासून आराम मिळेल. शुभ तारखा : 1, 3, 4

तूळ – आरोग्याच्या किरकोळ तक्रारी

घरातील घडामोडीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील महत्वाचा दुवा म्हणून अधिक जबाबदारी उचलावी लागेल. वाहन खरेदीसाठी सकारात्मक चर्चा होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रात पुढील दिशा ठरवण्यासाठी संबंधित अधिकारी अथवा तत्सम लोकांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील रहा. जवळच्या प्रवासाचे बेत ठरू शकतात. सामाजिक बांधिलकी जपताना सद्य परिस्थितीचे भान ठेवावे. सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावाल.

शुभ तारखा : 3, 4, 5

वृश्चिक – नेत्रदीपक यशाकडे वाटचाल

चांगल्या मित्रांच्या सहाय्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मानसिक स्थिती उत्तम राहील. प्रसन्न मनाने घेतलेले हाती घेतलेलं काम यश प्राप्त करण्यास मदतगार ठरेल. विद्यार्थी दशेत नेत्रदीपक यशाकडे वाटचाल होईल अशा प्रकारच्या मानसिकतेने अभ्यास कराल. इष्ट ध्येय साध्य करण्यासाठी पूरक ग्रहस्थिती आहे. उत्तम आर्थिक फायदा मिळेल. आर्थिक स्थिती ही आधीपेक्षा अधिक मजबूत होतांना दिसेल. शुभ तारखा : 30

धनू- प्राकृतिक स्थिती कमजोर

ठरविलेल्या दिशेने वाटचाल सुरु होण्यास मदतगार ग्रहस्थिती आहे. स्वतःच्या कर्तबगारीने कार्यपूर्तीस नेण्याची संधी उपलब्ध होईल. मन विचलित झाल्याने इष्ट ध्येय पूर्तीत विलंब लागू शकतो. प्राकृतिक स्थिती कमजोर रहाण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामकाजात काही प्रमाणात स्थित्यंतर दिसून येण्याची शक्यता आहे. घर खरेदीचे व्यवहार मार्गस्थ होऊ शकतील. शुभ तारखा : 28, 30

मकर – हितशत्रूंचा सुळसुळाट

खर्चावर काबू ठेवण्याची आवश्यकता मंद गतीने का होईना अपेक्षित दिशेने वाटचाल सुरु राहील. विद्यार्जनासाठी अत्यन्त दिशादर्शक काळ आहे. नोकरीमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याचे योग संभवतात. दुसर्याच्या व्यवहारात न पडणे हितकारक ठरेल. हितशत्रूंचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. कामकाजातील गुपित उघड होणार नाहीत याची काळजी घ्या. शुभ तारखा : 3,4

कुंभ – डोकेदुखी सारखे विकार त्रस्त करतील

आठवड्याची सुरुवात धावपळीच्या जीवनाने होत आहे. ठरवलेला मुकाम हस्तगत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. विरोधकांची मनधरणी करावी लागेल. अतिविश्वासाने कोणतेही निर्णय घेऊ नका. आठवड्याचा मध्यंतर काही प्रमाणात दिलासा देणारा असेल. न्यायालयीन विभागाशी संबंधित व्यवहार हाताळताना काळजी घ्या. डोकेदुखी सारखे विकार त्रस्त करतील. प्रवास टाळले हितकारक ठरतील. शुभ तारखा : 1,3

मीन – पारिवारिक स्थिती उत्तम राहील

व्यापारी लोकांसाठी महत्वपूर्ण उलाढालीचा हा आठवडा आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अपेक्षित लाभांश मिळू शकेल. तात्विक स्वरूपात केलेल्या कोणत्याही चर्चाना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पारिवारिक स्थिती उत्तम राहील. कामकाजात उत्तम प्रगती दिसून येईल. विविध वैविध्यपूर्ण गोष्टींमध्ये समरस होण्याची सवय फायदेमंद ठरेल. प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी, सतत यश मिळविण्यास सक्षम असल्याचे दिसून येईल. शुभ तारखा : 4,5

- Advertisment -

ताज्या बातम्या