Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य – Weekly Horoscope

मेष – मित्रांचा सल्ला उपयोगी

व्यावसायिक भागीदारीत फायदा होईल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. थोड्याप्रमाणात वैचारिक घालमेल होऊ शकते. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. घर खरेदी करू शकाल . भावनांना ठेच लागू शकेल. कर्ज वाढणार नाही याची काळजी घ्या. नेत्र विकार होऊ शकतात. सरकारी सत्तेचे पूर्ण समर्थन मिळेल. विरोधींच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव वाढेल आणि तुम्हाला एकाग्र राहता येणार नाही.शुभ तारखा : 19,20,21

- Advertisement -

वृषभ – वैचारिक मतभेद दूर ठेवा

शारीरिक स्थिती नाजूक बनेल. वैद्यकीय उपचार घेतल्याने बरे वाटेल. हित शत्रूंच्या कारवाया त्रस्त करतील. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करा. राजकीय क्षेत्रात सतर्क रहावे लागेल. शारीरिक स्थिती अधिक कमजोर होईल. वैचारिक मतभेद दूर ठेवा. कुटुंबातील व्यक्तीचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. कामामध्ये प्रगती होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. प्राकृतिक कारणाने आत्मसंयम ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विषयावर व्यक्त केलेले मत फायदेशीर मार्गावर घेऊन जाणारे ठरेल. शुभ तारखा : 23, 24

मिथुन – कौटुंबिक जीवनात आनंद

संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्रात उन्नती कराल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारीत वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. चांगले विचार जीवनात प्रगतीकडे घेऊन जातील. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. अडकलेले धन अथवा तत्सम व्यवहार सुरळीत होण्यासाठीअनुकूल काळ आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. नवीन व्यवसाय सुरु करणार्‍या मंडळींचा आत्मविश्वास वाढेल अशी ग्रहस्थिती आहे. कौटुंबिक जीवनात वातावरण आनंदाचे राहील. शुभ तारखा ः 21, 22, 23

कर्क – यशाच्या वाटेने वाटचाल

नोकरीमध्ये संधी उपलब्ध होतील. घरातील शोभेच्या अथवा चैनीच्या वस्तू खरेदी कराल. जवळचे प्रवास घडतील. शैक्षणिक क्षेत्रात यशाकडे वाटचाल कराल. राजकीय क्षेत्रात अतिविश्वास घटक ठरेल . रोग्यांनी विशेष काळजी घ्यावी. न्यायालयाची पायरी चढणे धोक्याचे ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शैक्षणिक जीवनात उत्तमप्रकारे यशाच्या वाटेने वाटचाल सुरु कराल. वाणी प्रभुत्व वाढेल. शुभ तारखा : 19, 20, 24

सिंह – विचारांना योग्य दिशा मिळेल

व्यवहार सांभाळून करावेत. नेत्र विकार वाढू शकतात. पारिवारिक संबंध सुधारतील. वाहन खरेदीचे योग आहेत. गायन कला विषयक स्वारस्य अधिक वाढेल. कौटुंबिक विषय चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील विचारांना योग्य दिशा मिळाल्याचा मनोमन आनंद उपभोगाल. धर्मप्रचारक किंवा धार्मिक विषयाचा अभ्यास या दोन्ही गीष्टींकडे कल वाढेल. शैक्षणिक जीवनात उत्तमप्रकारे यशाच्या वाटेने वाटचाल सुरु कराल. वाणी प्रभुत्व वाढेल.शुभ तारखा 21, 22,23

कन्या – विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील

दीर्घ काळासाठी फायदा होईल असे निर्णय घ्याल . वैचारिक पातळीवर मनस्वी आनंदी रहाल. कौटुंबिक जीवनात चढ उतार अनुभवायला मिळतील. मित्रांकडून जास्त अपेक्षा करणे घातक ठरेल. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. आर्थिक व्यवहारात अनियमितता येऊन व्यवहारात नुकसानीची शक्यता. शुभ तारखा : 19, 20

तूळ – तात्विक मतभेद दूर ठेवा

ठोस निर्णय घेण्यात अग्रेसर रहाल. तात्विक मतभेद दूर ठेवावेत. इतरांनी केलेल्या आरोपपासून स्वतःचा सहज बचाव करू शकाल. व्यवसायात विविध उत्पादने विक्री करून फायदा वाढवू शकाल. परदेश गमन योग संभवतो. हितसंबंध जोपासण्यात यशस्वी व्हाल. आनंदी रहाल. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावाल. क्रीडा क्षेत्रात यश संपादन कराल.शुभ तारखा – 21 ते 23

वृश्चिक – आत्मिक समाधान प्राप्त होईल

आर्थिक खर्च वाढेल. काही प्रमाणात चूकीचे निर्णय होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात मानसिक स्थिती सुधारेल. भागीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. पारिवारिक संबंध सुधारतील. आर्थिक स्थितीत चढता आलेख अनुभव कराल. संतती कडून समाधान मिळेल

वडिलोपार्जित परंपरांचा सन्मान राखल्याने आत्मिक समाधान प्राप्त होईल. काही विषयावर व्यक्त केलेले मत फायदेशीर मार्गावर घेऊन जाणारे ठरेल. शुभ तारखा ः 19, 20, 24

धनू – काळजीपूर्वक नियोजन करा

वडिलोपार्जित परंपरांचा मान राखाल. जवळचे प्रवास ठरतील. आर्थिक बाजू कमजोर होण्याची शक्यता आहे, काळजीपूर्वक नियोजन करावे. प्राकृतिक कारणाने अस्वस्थता जाणवेल. हितशत्रूंचा त्रास मनाला बेचैन करील. व्यावहारिक जगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये प्रगती होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. शुभ तारखा : : 23, 24

मकर – घर खरेदीचा निर्णय

सौख्य प्राप्तीचा काळ आहे. कामकाजाला नवीन दिशा मिळतील. घर खरेदीचा निर्णय होऊ शकेल. वडीलधार्‍या व्यक्तींकडून प्रशंसा होईल. आर्थिक लाभ वाढतील. शैक्षणिक ध्येय धोरणे ठरवू शकाल. कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रयत्नशील रहा नवीन व्यवसाय सुरु करणार्‍या मंडळींचा आत्मविश्वास वाढेल अशी ग्रहस्थिती आहे. कौटुंबिक जीवनात वातावरण आनंदाचे राहील. शुभ तारखा : 22, 23

कुंभ – भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण

परदेश गमन योग्य संभवतात. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावन्डाची योग्य साथ मिळेल. नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. मनातील विचार साकार करण्यात यशस्वी व्हाल. मनातील विचारांना योग्य दिशा मिळाल्याचा मनोमन आनंद उपभोगाल. नकारात्मक विचार प्रदर्शित केल्याने नुकसान वाढू शकते. शुभ तारखा : 21, 22

मीन – स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील

मानसिक विचलितपण जाणवेल. चुकीचे निर्णय होणार नाहीत याची काळजी घ्या. दूरचे प्रवास टाळा. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. व्यावसायिक वृद्धी होऊ शकेल. थोरांचे निर्णय लाभदायक ठरतील. पोटदुखीसारखे विकार त्रासदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. शुभ तारखा : 20 , 24

- Advertisment -

ताज्या बातम्या