साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

11 ते 17 मार्च 2021
साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly horoscope

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक

मेष - परिश्रमांना न्याय मिळेल

हा आठवडा अत्यंत आनंददायी राहील. पति पत्नींमध्ये सुसंवाद वाढेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. व्यवसायात भागीदारी केल्यास फायदा वाढेल. दुर्विचाराने चुकीचे निर्णय तर होत नाहीत याविषयी सतर्क रहा. केलेल्या परिश्रमांना न्याय मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होऊ शकेल. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. परदेशी कंपन्यांमधील सेवेसाठी किंवा नागरिकत्वासाठी अर्ज यशस्वी होतील. आपल्या कोर्टाच्या खटल्यांमधील निर्णयाची चिन्हे देखील आपल्या बाजूने आहेत.शुभ तारखा : 13, 14

वृषभ - कीर्ती सर्वत्र पसरेल

आठवड्याच्या सुरुवातीला दोलायमान स्थितीचा सामना करावा लागेल. तुमच्या शब्दावर विश्वास न ठेवल्याने मनाची स्थिती अत्यंत कमजोर बनण्याची शक्यता आहे. प्रयत्ननाने स्थिती पूर्वपदावर आणली जाऊ शकते. आपले कर्तव्य विसरू नका. चांगल्या मित्रांची साथ लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मनाला समाधान लाभेल अशा प्रकारचा घटनाक्रम अनुभवायला मिळेल.परदेशातील आप्तइष्ट महत्वाचा दुवा बनतील. कीर्ती सर्वत्र पसरेल.शुभ तारखा : 16, 17

मिथुन - महत्वाच्या पदावर नियुक्ती

आर्थिक व्यवहाराची जुळवाजुळव करावी लागेल. कर्जासाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आरोग्यविषयक कुरबुरी चालूच रहातील. मित्र वर्गाच्या सहाय्याने प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी काळ आहे. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. अकारण कुणाच्याही मध्यस्थीत पडू नका. भागीदाराकडून फायदा होईल. कौटूंबिक स्थितीत सुधारणा होईल. सद्गुरुंच्या उपासनेची आवश्यकता भासेल. गुप्तशत्रू अपमान करण्याचा प्रयत्न करेल. वादांपासून दूर रहा. कोर्टाशी संबंधित बाबी बाहेर सोडविणे चांगले. मानसिक शांती मिळेल.शुभ तारखा ः 12, 13, 17,

कर्क- मानसिक विचलितता निर्माण होईल

घर वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. कामकाजासाठी नवीन दिशादर्शक काळ आहे. कौटुंबिक पातळीवर मंगल कार्यात सहभागी व्हावे लागेल. संतती सौख उत्तम राहील. अध्यात्मिक उपासना , ध्यानधारणा, पूजापाठ या सारख्या धार्मिक क्रियांकडे विशेष लक्ष केंद्रित होईल. आर्थिकविषयात अपेक्षित मदत अथवा उत्पन्न मिळण्याची प्रभावी शक्यता आहे. प्राकृतिक कारणाने मानसिक विचलितता निर्माण होईल. शुभ तारखा : 14 ,15,16

सिंह - उत्पन्नाची साधने वाढतील

संपूर्ण आठवडा आपल्याला अनेक अनपेक्षित परिणाम देण्यास सिद्ध करेल. उत्पन्नाची साधने वाढतील. थांबलेले पैसेही येतील. आकस्मिक पैशांच्या पावतीची बेरीज देखील असेल. एक महाग वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या, संक्रमित ग्रहांना यश असूनही थकवा येईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि भाऊ यांच्यात मतभेद होऊ देऊ नका, सरकारी सत्तेचे पूर्ण समर्थन मिळेल. विरोधींच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव वाढेल आणि तुम्हाला एकाग्र राहता येणार नाही.शुभ तारखा : 15,16

कन्या - जमीन खरेदीच्या व्यवहारात फायदा

संपूर्ण आठवडा आपल्यासाठी पारिवारिक स्नेह वाढेल. अडकून पडलेली येणी वसूल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकेल. पूर्व संचित उपयोगाला येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत पदोन्नती संभवते. केलेल्या संकल्पना उचित मूर्तरूप घेतल्याचा अनुभव घ्याल. ह्रदय रोगानेग्रस्त असाल तर आरोग्यविषयक विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घर अथवा जमीन खरेदीच्या व्यवहारात फायदा होईल. शुभ तारखा : 13 ते 16

तूळ - पारिवारिक स्नेह वाढेल

परदेश गमन योग संभवतो. धनधान्याची वृद्धी होईल. शेतकर्‍यांसाठी दिलासादायक वातावरण तयार होईल. अडकलेले धन अथवा तत्सम व्यवहार सुरळीत होण्यासाठी अनुकूल काळ आहे. पारिवारिक स्नेह वाढेल. शारीरिक कमजोरी जाणवेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी . वयोवृद्ध मंडळींनी शंकराची उपासना केल्याने मनोधैर्य वाढण्यास मदतहोईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.शुभ तारखा - 17, 18

वृश्चिक - नेत्रविकर होऊ शकतात

कोणतीही जबाबदारी स्वीकारताना काळजीपूर्वक पाऊल उचला. आर्थिक नुकसान होऊ शकते. बदनामीमुळे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता वाटते. कर्ज वाढणार नाही याची काळजी घ्या. नेत्र विकार होऊ शकतात. परिवाराशी निगडित कोणत्याही कामी वेळ द्यावा लागेल. दूरचे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. उच्च अधिकार्‍यांशी संबंधही दृढ होतील. धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग घ्याल. वीन लोकांशी सामाजिक संवाद वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा देखील वाढेल.शुभ तारखा ः 14, 17, 18

धनू- समस्यांवर सामोपचाराने तोडगा काढा

पूर्वार्जित लाभ मिळतील. भेटीगाठी होतील. पारिवारिक विषयात आत्मिक समाधान प्राप्त होईल. वडिलोपार्जित परंपरांचा सन्मान राखल्याने आत्मिक समाधान प्राप्त होईल. अचानक निर्माण होणार्‍या समस्यांवर सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. प्राकृतिक कारणाने आत्मसंयम ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विषयावर व्यक्त केलेले मत फायदेशीर मार्गावर घेऊन जाणारे ठरेल. शुभ तारखा : : 13,17,18

मकर - शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी

कुटुंबातील व्यक्तीचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. कामामध्ये प्रगती होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. नवीन विषय हाताळताना अभ्यास करूनच त्यात पाऊल उचलावे. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावाल. क्रीडा क्षेत्रात यश संपादन कराल. वडिलोपार्जित स्थावर इस्टेटीचे रखडलेले विषय मार्गी लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक व्यवहारात अनियमितता येऊन व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 15, 16

कुंभ - वाणी प्रभुत्व वाढेल

भाग्योदयासाठी केलेली धावपळ फळाला येईल. परदेश गमन योग संभवतात. नोकरीत पदोन्नती संभवते. नवीन व्यवसाय सुरु करणार्‍या मंडळींचा आत्मविश्वास वाढेल अशी ग्रहस्थिती आहे. कौटुंबिक जीवनात वातावरण आनंदाचे राहील. शैक्षणिक जीवनात उत्तमप्रकारे यशाच्या वाटेने वाटचाल सुरु कराल. वाणी प्रभुत्व वाढेल. शुभ तारखा : 16, 17, 18

मीन - वंश परंपरांचा सन्मान राखाल

ठेवावी. नकारात्मक विचार प्रदर्शित केल्याने नुकसान वाढू शकते. अपघात किंवा अपमृत्यूची भीती मनात घर करून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनातील विचारांना योग्य दिशा मिळाल्याचा मनोमन आनंद उपभोगाल. धर्मप्रचारक किंवा धार्मिक विषयाचा अभ्यास या दोन्ही गीष्टींकडे कल वाढेल. वंश परंपरांचा सन्मान राखाल.शुभ तारखा : 16,17, 18

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com