Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक

मेष – सहकारी उपयोगी पडतील

- Advertisement -

आर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारची उलाढाल करताना काळजीपूर्वक करा. दोषारोपाने उद्विग्न मनस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळचे सहकारी उपयोगी पडतील. भागीदारीसाठी विचारणा होण्याची शक्यता आहे. भविष्यात घडणार्‍या घटनांचा अंदाज येईल. पारिवारिक स्नेह वाढेल. नयनरम्य स्थळांच्या सहलीला जाण्याचे योग आहेत. शस्त्रक्रिया संभवते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. म्हणूनच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनविण्यासाठी थोडी विश्रांती घ्या. शुभ तारखा : 29, 30

वृषभ – प्रगतीचा आलेख वाढेल

ठरवलेल्या कार्याचा उद्देश सफल होईल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा आलेख वाढेल. आर्थिक व्यवहाराबाबत भावनिक निर्णय घेऊ नका. खर्चाचा ताळेबंद आखने गरजेचे आहे. संततीकडून सहयोग मिळेल. कलाकारांसाठी उत्तम संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकाल. मित्रपरिवाराच्या सहाय्याने अनेक कामांना गती मिळेल. गोष्टी कशा कार्य करतात याबद्दल आपण व्यापक दृष्टीकोनातून सहज पाहण्यास सक्षम व्हाल आणि आपल्याकडे विचारांची एक दार्शनिक पद्धत असेल. वरिष्ठांसमोर प्रतिष्ठा आणि आदर प्राप्त करू शकाल आणि या दरम्यान त्यासाठी प्रयत्न कराल. शुभ तारखा : 31, 3

मिथुन – सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल

वस्थावर इस्टेटीचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी अनुकूल काळ आहे. नवीन वाहन खरेदी करू शकाल. नवीन व्यवसाय-उद्योग सुरु करण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश संपादन कराल. लाभाचे पद प्राप्त होईल. सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल. द्विधा मनस्थितीत काळाचा अपव्यय होण्याची शक्यता. इतरांच्या गरजांबद्दल सहानुभूती दर्शवाल. व्यवसायात चढ-उतार होऊ शकते. शत्रू असेल तर, परिस्थितीत काही बदल घडून येऊ शकतात, एकतर ते आपणास हानी पोहोचवू शकते किंवा दुसरीकडे, पुन्हा सुलह किंवा तडजोड करू शकता. ज्योतिष, मनोगत शास्त्रांमध्ये खूप रस असेल. कामाची प्रगती थोडी हळू होईल ज्यामुळे आपल्याला क्षेत्रातील काही आव्हानांना सामोरे जावे लागेल.शुभ तारखा : 30, 2

कर्क- यशाची चाहूल लागेल

मंगल कार्यात सहभागी व्हाल. भावाबहिणीमधील नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. न्यायहक्कासाठी लढत असलेली लढाई अंतिम पायरीवर येईल व यशाची चाहूल लागेल. कामकाजात प्रगती होईल. अधिकारात वाढ होईल. मनाला आनंद देणार्‍या घटना ऐकायला मिळतील. संतती विषयक प्रश्नावर उपाय लागू पडतील. जवळचे प्रवास घडून येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. शुभ तारखा : 2,3

सिंह – अर्थार्जन उत्तमप्रकारे करू शकाल

दगदग -धावपळीचा आठवडा आहे. कामकाजाचे नियोजन करणे इष्ट ठरेल. अर्थार्जन उत्तमप्रकारे करू शकाल. दिशाहीन विषयावर वाटचाल होणार नाही याची काळजी घ्या. दूरच्या नातेवाईकांकडून सहकार्य प्राप्त होईल. सामाजिक मानसन्मान मिळेल. स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. राजकीय क्षेत्रात होणार्‍या मानहानीमुळे विचलित मनस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरास अधिक सुंदर बनविण्यासाठी काळ अनुकूल आहे. नातेसंबंधांमधील कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींवर विशेषत: लक्ष केंद्रित कराल. तुमचा मूड वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करू शकतो, तुम्ही असा विचार कराल की लोकांमध्ये तुम्ही किती सुरक्षित आहात. शुभ तारखा : 29, 3

कन्या – परदेश गमन योग संभवतो

विवाह इच्छूकांसाठी हा आठवडा कामना पूर्तीचा ठरेल. अनेक रखडलेल्या कामांना उचित दिशेनं चाल मिळेल. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळेल. अकारण दुसर्‍याच्या वादात उडी घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा यश मिळू शकेल. डोळ्याच्या विकाराने त्रस्त व्हाल. वैद्यांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. परदेश गमन योग संभवतो. भविष्यात घडणार्‍या घटनांचा अंदाज मांडणे सोपे जाईल. शुभ तारखा: 30, 31

तूळ – शत्रूचे नामोहरण करण्यात यश

प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, छोटेमोठे आजार डोके वर काढतील. शत्रूचे नामोहरन करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक भागीदाराशी यशस्वी बोलणी होऊन मागील प्रलंबित समस्या सुटण्यास मदत होईल. विवाहासाठी उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अनपेक्षीत घटना घडतील. प्रवासाच्या दरम्यान काळजी घ्यावी . संगती संग दोष: या वचनाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. शनी महाराजांची उपासना करावी. शुभ तारखा: 28, 29

वृश्चिक – शुभ वार्ता ऐकायला मिळतील

जिवलग व्यक्तींचा सहवास लाभेल. सुखद घटनांचा सिलसिला चालू राहिल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायाच्या ठिकाणी शुभ वार्ता ऐकायला मिळतील. मामा मावशी किंवा आजोळच्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. कामानिमित्त न्यायालयाची पायरी चढावी लागेल. वैवाहिक जोडीदारासोबत वेळ व्यतीत होईल. हित शत्रूंच्या कारवाईमुळे मानसिक कमजोरी जाणवेल. व्यावसायिक कामात कार्यमग्न रहाल. शुभ तारखा : 2, 3

धनू – वाहन खरेदीचे योग

आई वडील यांच्या समवेत वेळ व्यतीत होईल. वाहन खरेदीचे योग संभवतात. स्वप्नपूर्तीचा काळ आहे. घर खरेदी विषयक बोलणी मार्गी लागतील. सामाजिक कार्यात कार्यमग्नता वाढेल. परीक्षार्थींना यश मिळेल. प्रवासदरम्यान किरकोळ आजार वाढू शकतात. सप्ताहाच्या शेवटी पाठीचे दुखणे जाणवेल. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप केल्यास प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. शुभ तारखा : 1, 2

मकर – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती

आप्तेष्ठांच्या भेटीगाठी होतील. राजदरबारात सन्मानाची वागणूक मिळेल. नवीन व्यवसाय-उद्योग सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. लोकहिताचे निर्णय घेतल्याने जनमानसात प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी मंडळींचा आत्मविश्वास वृद्धिगंत होईल. शुभ तारखा : 31, 3

कुंभ – कुटुंबासाठी वेळ द्यावा

पारिवारिक संबंधावर परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित कराल. अर्थार्जनाचे नवीन श्रोत मिळण्याच्या दिशेने केलेले विचार यशस्वी ठरतील. राजकीय- सामाजिक उन्नतीसाठी केलेला प्रयासास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. गृहसजावटीच्या वस्तू खरेदी कराल. विविध क्षेत्रातील व्यावसायिक मातब्बर लोकांच्या अनुभवाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. आपण करीत असलेल्या कामाला योग्य प्रतिसाद मिळेल. शुभ तारखा : 2

मीन – गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ

प्रत्यक्ष कामाच्या दिशेने उचललेले प्रत्येक पाऊल याबाबत नियोजन – कामाची आखणी आणि त्याच्या दर्जाविषयी विचारविनिमय करूनच पुढील दिशा ठरवण्यात भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहेफ भागीदाराकडून योग्य सहकार्य मिळेल. वारंवार बदलणार्‍या विचारसरणीचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या. शुभ तारखा: 2,3

- Advertisment -

ताज्या बातम्या