Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य – Weekly Horoscope

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक

मेष – व्यवसायात भरभराट

- Advertisement -

अडचणीत भावंडांचा सहयोग मिळेल. आपल्याला कार्यक्षेत्रात आदर आणि लाभ प्राप्त होतील जे लोक व्यवसाय करतात, त्यांना या काळात चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाला गती मिळेल. पैशाशी संबंधित गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगा. आपण कागदी काम करणार असाल तर आपल्या आसपास विश्वासू लोक ठेवा. या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रातील उच्च अधिकार्‍यांकडून कौतुक केले जाऊ शकते, यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कोणत्याही प्रकारच्या गोंधळापासून दूर रहा. आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. शुभ तारखा : 26,29

वृषभ – चांगली बातमी मिळेल

व्यवसायात यश मिळेल. पैशाच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगा. कार्यक्षेत्रात उच्च स्थान मिळेेल. आपल्या वरिष्ठांशी विचारपूर्वक बोला. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका अन्यथा तुमची मानसिक स्थिती कमकुवत होऊ शकते. एखादी चांगली बातमी मिळेल. अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्या. स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपल्या जोडीदारासोबत मतभेद उद्भवू शकतात. प्रवास करणे टाळावे कारण प्रवासामुळे आरोग्यास काही समस्या उद्भवू शकतात. व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील आणि तुमच्या घरातही काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.शुभ तारखा : 29, 2

मिथुन – दान-पुण्य कराल

अडकलेले कामे पूर्णत्वास जातील. धार्मिक कामे आणि दान-पुण्य करण्याची आवड निर्माण होईल. यावेळी आपल्या कौटुंबिक जीवनात परिस्थिती सामान्य असेल. नोकरी करणार्‍या लोकांना आदर आणि पदोन्नती मिळेल. भूतकाळात केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. तसेच जे आतापर्यंत बेरोजगार होते त्यांनाही रोजगार मिळेल. विचार सुधारतील आणि एकाग्रता देखील वाढेल. पैशाशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला लाभ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले फळ मिळेल. शत्रू शांत राहतील. शुभ तारखा : 1, 2

कर्क – कार्यक्षेत्रातील स्थिती मजबूत होईल

व्यवसाय करणार्‍यांसाठी व्यापाराचे नवीन मार्ग खुले होतील. परदेशात देखील जाऊ शकता. नशिबाचे सहकार्य मिळेल. आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा दिली असेल आणि निकाल अजून येणे बाकी असेल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकेल. आपले मन धार्मिक कार्यात व्यस्त असेल आणि आपण दान-पुण्य कराल. कुटुंबाशी आपले संबंध चांगले राहतील. कार्यक्षेत्रातील तुमची स्थिती मजबूत होईल. दरम्यान, आपली कल्पना कार्यक्षेत्रात परिष्कृत होईल आणि तुम्हाला आदर मिळेल. प्रियजनांविषयी आपुलकी वाढेल. शुभ तारखा : 27

सिंह – नवीन मार्ग सापडतील

विवाहित जीवनात शुभ परिणाम मिळतील. तुमच्या साथीदाराचे सहकार्यही मिळेल. भागीदारी व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. शत्रू आपल्याविरूद्ध कट रचू शकतात, परंतु ते नुकसान करणार नाहीत. तरीही आपण थोडे सावध असणे आवश्यक आहे. आध्यात्मिक प्रगती होईल. तुम्हाला घरातील वडीलधार्‍यांसोबत सेवा करण्यात व बोलण्यात आनंद मिळेल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य रितीने पालन करा. जीवनात बरेच नवीन मार्ग उघडतील, ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल.शुभ तारखा : 28, 29

कन्या – कठोर परिश्रमांवर भर द्या

जुनाट आजारापासून मुक्तता मिळेल. जे नोकरी करत आहे त्यांना कार्यक्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळेल. या काळात व्यापार्‍यांची स्थितीही सुधारेल आणि त्यांना फायदा होईल. भागीदारीमध्ये व्यवसाय केला तर आपल्याला या काळात नफा मिळविण्यासाठी बर्‍याच संधी मिळू शकतात. तसेच, या राशीचे लोक जो भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत होते, ते त्यांच्या विचारांना अंमलात आणू शकतात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वडिलांशी सुसंवाद घडेल. नशिबापेक्षा कठोर परिश्रमांवर अवलंबून रहावे. शुभ तारखा: 27, 2

तूळ – बौद्धिक क्षमता वाढेल

उच्च शिक्षण घेत असाल तर गुरु व पालकांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगले कामगिरी करू शकाल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. या राशीच्या जातकांना मुलाच्या बाजूकडून चांगली बातमी मिळू शकते. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटेल. आपण बराच काळ एखाद्या आजाराने त्रस्त असल्यास, या काळात आपण त्यापासून मुक्त होऊ शकता. विरोधक या काळात शांत राहतील. व्यापारातील भागीदारीच्या व्यवसायात मदत करेल. तसेच कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. वित्त सुधारेल आणि आपल्याला कमाईचे चांगले स्रोत मिळू शकतील. शुभ तारखा: 28

वृश्चिक – नोकरीचे योग

कौटुंबिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना खबरदारी घ्या. कौटुंबिक जीवनात संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करा. कष्टकरी लोकांना कार्यक्षेत्रात सहकार्यांचे सहकार्य मिळेल आणि आपला प्रतिस्पर्धी देखील शांत असेल. कार्यक्षेत्रातील उच्च अधिकार्‍यांशी तुमचे चांगले संबंध असतील. या काळात आपले उत्पन्न वाढेल. विरोधकांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. नव्या नोकरीची किंवा नवीन कार्याचे अधिक योग आहे, त्याचबरोबर रोजगाराचे नवीन मार्गही उघडले जातील. शुभ तारखा : 26, 1

धनू – खर्चात वाढ होईल

या आठवड्यात मित्रांसह प्रवासावर जाण्याची योजना आखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि आपण लहान भावंडांसह चांगला वेळ घालवाल. घराच्या सुविधांशी किंवा नूतनीकरणाशी संबंधित काही खर्च कराल. कामाच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. परदेशी ग्राहकांशी व्यापार करणार्‍यांना हे संक्रमण फायदेशीर ठरेल. शुभ तारखा: 1,2

मकर – मनोबल कमी होऊ देऊ नका

कौटुंबिक समस्या वाढू शकतात. खर्चाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. संभाषणादरम्यान विचारपूर्वक शब्द वापरा. स्वत:ची प्रशंसा करण्याचा प्रयत्न करु नका.आपण जमिनीवर असाल तरच लोक जास्त आपला आदर करतील. भविष्यात सुधारणा करण्याच्या योजनाही बनवतील. घरात एखाद्या गोष्टीबद्दल भांडण होत असेल तर तेही यावेळी सोडवता येईल. कोणत्याही परिस्थितीत आपले मनोबल कमी होऊ देऊ नका. शुभ तारखा: 29, 30

कुंभ – आरोग्याची काळजी घ्या

वडीलधार्‍यांचा सल्ला घ्या. सामाजिक स्तरावर लोकांशी संवाद साधताना संयम ठेवा. नोकरी पेशा लोकांना कार्यक्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. आपल्या क्षमतेच्या उत्कृष्टतेसाठी फळ मिळेल. आठवड्याच्या शेवटी आपल्या कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवणे तुम्हाला आवडेल. वडिलांबरोबर व्यवसाय करीत असाल तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणत्याही कामात घाई करू नका; अन्यथा, यामुळे नुकसान होऊ शकते. शुभ तारखा: 2

मीन – नवीन व्यवसायात यशस्वी व्हाल

पैशाच्या बाबीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, खर्चावर लक्ष ठेवा. मानसिक शक्ती वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचा वेग वाढेल, जे तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करेल. जे काम बर्‍याच दिवसांपासून रखडलेले आहे ती कामे पूर्णत्वास जातील. नशिबाचे सहकार्य मिळेल आणि आपण जे काही कराल त्यामध्ये यशस्वी व्हाल. आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. शुभ तारखा: 30

- Advertisment -

ताज्या बातम्या