Bhavishyvedh
Bhavishyvedh|weekly horoscope
भविष्यवेध

साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

20 ते 26 ऑगस्ट 2020 ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक (ठाणे, मुंबई) 9869575547

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

मेष - विवाहोत्सुकांसाठी आनंदाची बातमी

विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी अनुकूल काळ आहे. आपण केलेल्या प्रयोगाच सफल परीक्षण होईल. सात्विक भाव जागृत होतील. धार्मिक संस्कारात मन रमेल. कर्जाऊ रकमेची मागणी केली असल्यास ती रक्कम मिळू शकेल. हितशत्रूंच्या कारवायांपासून सतर्क असावे. रक्तदाबासंबंधी विकार असतील तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मित्र परिवाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. विवाह इच्छूकांसाठी हा आठवडा आनंदाची बातमी देणारा ठरेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. शुभ तारखा : 20,21,24,25.

वृषभ - उन्नतीच्या दिशेने वाटचाल

घरासाठी उपयुक्त वस्तूंची खरेदी कराल. कामकाजात उन्नतीच्या दिशेने वाटचाल कराल. संततीकडून समाधानकारक कर्तबगारी घडल्याने मानसिक आनंद प्राप्त होईल. भक्तिमय वातावरणात काळ व्यतीत कराल. भविष्यातील घटनांचा अंदाज बांधू शकाल. संतान प्राप्तीचे योग संभवतात. क्रियाशील बनून नवा आदर्श निर्माण कराल. प्राकृतिक कारणाने काही प्रमाणात विचलित मनस्थिती निर्माण होऊ शकेल. कर्ज वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. शुभ तारखा : 22 ते 25

मिथुन - भाग्योदयासाठी अनुकूल काळ

सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होतील. देशविदेशातील हितसंबंध सुरळीत होण्याची प्रक्रिया मनाला तसल्ली देणारी ठरेल. भाग्योदयासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. भावंडांकडून सहकार्य मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर या आठवड्यात तो प्रयत्न सफल होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना नवीन आशा पल्लवित करणारा काळ आहे. अभ्यासाला उत्तम गती प्राप्त होईल. स्त्री-पुरुषातील मतभेद चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. शुभ तारखा : 20,21,24,25

कर्क- पारिवारिक स्नेह संबंधात सुधारणा

अर्थार्जनासाठी उत्तम आठवडा आहे. आपण करीत असलेल्या उद्योग व्यवसायाचा आलेख चढता राहील. पारिवारिक स्नेह संबंधात सुधारणा होईल. न्यायालयीन कामकाजास होणारा विलंब पथ्यावर पडेल. निर्हेतुक केलेल्या कामाचे सुद्धा श्रेय मिळेल. वाहन खरेदीसाठी हा आठवडा शुभ आहे. अकारण पैशाचा अपव्यय देखील होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना कामकाजात उत्तम सहयोग करणारे मंडळी भेटतील. जवळपासचे प्रवास घडून येतील. कोणत्याही नवीन कामास सुरुवात करताना आत्मविश्वास दृढ असेल तरच पाऊल उचला. शुभ तारखा : 20,21,22,23,2े6

सिंह - साथीदारांकडून उत्तमप्रकारे सहकार्य

मनाला प्रसन्नता प्राप्त करून देणारा काळ आहे. त्यातून मिळालेले आत्मिक समाधान भविष्यासाठीचा ऊजास्त्रोत बनेल. साथीदारांकडून उत्तमप्रकारे सहकार्य मिळेल. भागीरदार-मित्रपरिवार अशा मंडळींचा सहवास लाभून त्यात घडलेल्या चर्चा सार्थकी ठरतील. आठवड्याचा मध्यंतरातील काळ अल्पप्रमाणात असमंजस्य निर्माण करू शकतो.अशावेळी विषयाचे गांभीर्य -साद -पडसाद लक्षात घेऊनच तो विषय हाताळणे उचित ठरेल. विरोधकांच्या पाशात अडकले तर जात नाही ना याबाबत काळजी घ्यावी. शुभ तारखा : 20 ते 25

कन्या - दूरचे प्रवास टाळावेत

मतमतांतरे दिसून आली तरी मनामनामध्ये भेद होईल असे आचरण कामाचे नसते याची जाणीव ठेवावी. आपणाबाबत चर्चिल्या गेलेल्या विषयांवर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता वाटते. कोर्टकचेरीत जाण्यासारखे विषय सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करा. ध्येय जरूर असावे पण त्यासाठी आपण करीत असलेल्या कर्माचे देखील शुभाशुभ परिणाम त्यास कारण बनतात याकडे दुर्लक्ष करू नये. परिवारासाठी वेळ द्यावा लागेल. दूरचे प्रवास टाळावेत. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्यावरील ॠणनिष्ठा अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. शुभ तारखा : 22 ते 25

तूळ - उत्तम सौख्याची प्राप्ती

या आठवड्यात लाभाच्या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. सरकार दरबारी मानसन्मान प्राप्त होऊ शकेल. उत्तम सौख्याची प्राप्ती होईल. पूर्वायुष्यात केलेली गुंतवणूक उपयोगाला येईल. नियोजन करूनच कोणताही कारभार करण्याचा प्रयत्न करा. आपण घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे आत्मिक समाधान लाभेल. सहकार्‍यांचा विचार करून केलेले कोणतेही व्यवस्थापन भविष्यातील यशाची नांदी ठरू शकेल. शेतकर्‍यांना अन्नधान्याची भरभराट होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ विशेष फलदायक नाही. शुभ तारखा : 20,21, 24 ,25,26

वृश्चिक - अचानक धनलाभ

पूर्ण सामर्थ्याने कामावर लक्ष केंद्रित करा. उद्योजकांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक आहे. नवीन व्यवसायाचा आरंभ करणे, व्यवसायासाठी भूमी किंवा वास्तू खरेदी करणे यासारखे विषय पूर्णत्वास जातील. जमिनीच्या व्यापारातून फायदा होईल. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करा. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. संरक्षण क्षेत्रात विशेष जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. ईश्वरीय चिंतनाने समस्यांवर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. शुभ तारखा : 20,21,22,23,26

धनू- शाब्दिक चकमकी टाळा

या आठवड्यात आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील. चर्चेला वेगळे वळण लागणार नाही याबाबत काळजी घ्या. शाब्दिक चकमकी टाळण्याचा प्रयत्न करा. राजकारणात भय वाढेल. स्थानांतर होण्याची शक्यता आहे. सरकार दरबारी कार्यरत असाल तर कोणत्याही बाबतीत लालसा वाढणार नाही याची काळजी घ्या. फसगत होण्याची शक्यता आहे. परदेशातील हितसंबंध सुधारण्यासाठी हा काळ अत्यन्त उपयुक्त आहे. आयात निर्यात संबंधी क्षेत्रात कार्यरत असाल तर या आठवड्यात उत्तम लाभ होऊ शकतील. शुभ तारखा : 21 ते 24

मकर - वाहन चालवताना काळजी घ्या

आठवड्याची सुरुवात द्विधा मनस्थितीत होत आहे. अनिश्चिततेमुळे नुकसान वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. खोल पाण्याकडे जाणे टाळावे. आपल्यापेक्षा मानाने अथवा वयाने मोठ्या मंडळींचा सल्ला जीवनाच्या दशा आणि दिशा बदलवणारा ठरेल. आपल्याबाबत समाजात दिला जात असलेला संदेश मनाची अवस्था बिकट करण्यास कारणीभूत ठरू शकेल. भगवान शिवाची उपासना वाढविल्याने निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. शुभ तारखा : 22 ते 26

कुंभ - आरोग्यविषयक तक्रारींची शक्यता

जुन्या जाणत्या मंडळींचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. वडिलोपार्जित रूढी परंपरांचा सन्मान वाढेल असे कर्म आपल्या हातून घडून येईल. गूढ विद्यांचा अभ्यास वाढेल. वैज्ञानिक सिद्धांतानुसार केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. कर्ज उभारणीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. कुलदेवतेची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी दैवी उपासना करावी. आरोग्यविषयक काही तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. हितशत्रूंच्या कारवाया मनाला उद्विग्नता निर्माण करू शकतात. शुभ तारखा : 20,21,24,25,26

मीन - पदोन्नतीस अनुकूल काळ

भाग्योदयासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहयोग प्राप्त होईल. पदोन्नती होण्यासाठी अनुकूल काळ आहे. आपण घेतलेले महत्वपूर्ण निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. कुटील कारस्थानापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन ध्येय धोरण अंमलात आणण्यात यशस्वी व्हाल. इंश्युरन्स व्यावसाईकांसाठी हा आठवडा उत्तम फलदायी राहील. जमिनींबाबतचे व्यवहार मार्गी लागतील.कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता वाटते. शुभ तारखा : 22,23 ,26

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com