Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधद रन मशीन विराट

द रन मशीन विराट

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड – 8888747274

विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर, 1988 रोजी दिल्लीत राहणार्‍या एका पंजाबी कुटुंबात झाला. तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.

- Advertisement -

1998 साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.

विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवले. कोहली खेळाशिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला एक तेजस्वी आणि हुशार मुलगा गणना करीत असत.

विराट कोहली भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारताचा राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे.

दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने 2008 साली मलेशियामधील 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले.

त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट 2008 मध्ये, 19 वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. 2011 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, 2013 पर्यंत त्याने एकदिवसीय विशेषज्ञ हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.

20-20 क्रिकेट विश्वचषक 2014 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.

त्याने अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी च्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. 2014 मध्ये धोनिने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान 1000 धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. 2015 मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक

अर्धशतके (16) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला विराट द रन मशीन म्हटले आहे. डिसेंबर 2017 रोजी विराट कोहली सिने अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाहबद्ध झाला. कोहली विराट कोहोली यांना मंगळ ग्रहाचा वरदहस्त ! विराट कोहोली याने क्रिकेट विश्वात जे यश संपादित केले ते सचिन तेंडुलकर, धोनी यांचे नंतर विराट याच्या वाट्याला आले आहे. आपण म्हणतो कि अरे तो विराट नशीबवान आहे, त्यामुळे त्याच्या पदरी यश कायम विराट कोहोलीने क्रिकेट विश्वात जे यश संपादित केले ते सचिन तेंडुलकर, धोनी यांचे नंतर विराट याच्या वाट्याला आले आहे.

हस्त सामुद्रिकदृष्टया हातावर दोन ठिकाणी मंगळ ग्रहाला स्थान दिलेले आहे, त्यापैकी करंगळीच्या खाली हृदय रेषा ते मस्तक रेषेच्या मधल्या फुगीर भागात वरचा मंगळ आहे, ह्या मंगळाचे गुण निश्चय, सारा-सार विवेक बुद्धी व युक्तीने काम करण्याची क्षमता या मंगळ ग्रहात असते तो जितका शुभ तितके त्याच्या गुणात वाढ होते. हातावरील दुसर्‍या मंगळाचे स्थान अंगठ्याच्या जवळ व आयुष्य रेषेच्या आत आहे, ह्या मंगळा गुण आक्रमकता हे आहेत, कठोर कष्ट उचलणारे व शारीरिक क्षमता प्रदान करणारे आहेत.

याच मंगळ ग्रहावरून विराट यांच्या हातावर मंगळ रेषेचा उगम होऊन ती मणिबंधापर्यंत गेली आहे त्या सोबतची आयुष्यरेषा सुद्धा कणखर आहे. या मंगळ रेषेचे वैशिष्टय म्हणजे ही रेषा त्या व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेत प्रचंड वाढ करते, असे लोक लवकर थकत नाहीत व ते 18-18 तास अखंड काम करू शकतात. यांच्यात आक्रमकता असते, अरे ला कारे करण्याची क्षमता असते, थोडक्यात तापटपणा असतो.

विराट याच्या हातावरील मंगळ रेषा अनन्यसाधारण आहे कारण तिचा उगम स्वतंत्रपणे आयुष्य रेषेच्या सुरवाती पासून झाला आहे व ही रेषा मणिबंधापर्यंत अखंड गेली आहे. मंगळ रेषा असलेल्या व्यक्ती शारीरिक क्षमतेच्या कुठल्याही क्रीडा प्रकारात यश सहज मिळवू शकतात, नव्हे तर ज्यांच्या हातावर मंगळ रेषा स्पष्ट आहे अश्या व्यक्तींनी पोलीस, मिलिटरी, विविध खेळ यामध्ये करियर करावे त्यांना अंगी असलेले जास्तीची शारीरिक क्षमता त्यांना निश्तितच कामास येते.

याच मंगळ उंचवट्यावर मस्तक रेषेतून आडवी गेलेली व मंगळ रेषेला छेदलेली रेषा, विराट यांच्या हातावर आहे ह्या रेषेमुळे क्रोधीपणा येतो, हा क्रोध क्षणिक असतो परंतु अश्या वेळेस त्या व्यक्तीचा स्वतःवर नियंत्रण राहत नाही. विराट भाग्यवान आहे यात मुळीच शंका नाही कारण विराट याच्या हातावरील भाग्य रेषा मणिबंधापासून स्वतंत्रपणे उगम

पावून शुक्र ग्रहावरून आयुष्य रेषेतून उगम पाऊन थेट शनी ग्रहापर्यंत गेली आहे. अश्या प्रकारची भाग्य रेषा करोडो व्यक्तीत एखाद्याच्या हातावर पाहावयास मिळते. मस्तक रेषेला तिच्या शेवटी दोन फाटे फुटले आहे हे आत्यंतिक हुशारी प्रदान करतात अश्या व्यक्ती एका वेळेस दोन वेगवेगळ्या विषयात प्राविण्य मिळवू शकतो.

विराट यांच्या हातावर अशुभ ग्रह, रेषा नाहीत तो भाग्य घेऊन जन्माला आलेला आहे, तरी पण त्याने क्रिकेट क्षेत्रात येण्यासाठी घेतलेले काबाड कष्ट हे फक्त मंगळ ग्रहाच्या निश्चय व असामान्य शारीरिक क्षमता या गुणामुळेच मिळालेले आहेत व त्याला जोड हुशारीची मिळाली आहे. क्रिकेटचे प्रशिक्षण घेताना पैशाची अडचण त्यांना आली नाही, वडीलांकडून आर्थिक बाबींची कमतरता नसल्याने उच्च श्रेणीच्या संस्थेत क्रिकेटचे प्रशिक्षण मिळाले. भाग्यवान व्यक्ति सधन घरात जन्माला आली की तिला करियर करण्यात अडचण येत नाही, भाग्य नेहमी साथ देते कष्टाचे, श्रमाचे चीज होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या