प्रोफेशनल शाहरूख !

jalgaon-digital
1 Min Read

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274

सुपरस्टार शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीत झाला. मध्य दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिक्षण झाले. हंसराज कॉलेजमध्ये 1988 साली अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. खेळात करिअर करावे, अशी त्यांची इच्छा. परंतु त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे नाटकांमध्ये भूमिका केल्या. प्रारंभी मोठा वेळ दिल्लीच्या थिएटर अ‍ॅक्शन ग्रुपमध्ये अभिनयासाठी घालवला.

शाहरुख खान यांनी चित्रपट व दूरदर्शन वर 1988 ते 1992 पर्यंत जम बसविला. दूरचित्रवाणी मालिका सर्कस आणि इडियट या मालिकांतून त्यांना ओळख मिळाली. बॉलिवूडमध्ये पूर्णकाळ करिअर करण्यासाठी ते दिल्लीहून मुंबईला आले. जून 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’मध्ये त्याचा सहाय्यक अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पदार्पण पुरस्कार त्यांां मिळाला. त्यानंतर शाहरुख खान यांनी मागे वळून पाहिले नाही. आजपर्यंत ते सक्रीय आहेत.

आयपीएल क्रिकेट संघाची मालकी 2008 मध्ये जूही चावला आणि जय मेहता यांच्या भागीदारीत खरेदी केली. कोलकाताचे रायडर्सची फ्रँचायझीची मालकी त्यांच्याकडे आहे. 2012 व 2014 च्या आयपीएल सीझनमध्ये हा संघ चॅम्पियन ठरला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *