शनीचे मौल्यवान रत्न - नीलम

शनीचे मौल्यवान रत्न - नीलम

शनी हा मकर आणि कुंभ राशीचा ग्रह असून नीलम हा शनीचे मौल्यवान रत्न आहे. राशिभविष्यातील या 10 वी आणि 11 वी राशी आहे. नीलम हे रत्न नावाप्रमाणेच निळ्या रंगाचे आहे. तसेच हे रत्न पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या, काळ्या आणि नारिंगी रंगात आढळते.

नीलम हे रत्न कोण परिधान करू शकते ?

रत्नांमध्ये तुमच्या अडचणींवर मात करण्याची शक्ती असली तरी कोणीही नीलम रत्न घालू शकत नाही. नीलम रत्न घालण्यासाठी शनीचे जन्मकुंडलीतील स्थान, शनीची दशा, लग्न आणि चंद्र राशीवर अवलंबून आहे.

जेव्हा शनीची महादशा सुरू असेल तेव्हा नीलम रत्न परिधान करणे खूपच फायदेशीर ठरते. लग्न आणि चंद्र राशीच्या ज्या व्यक्तीने नीलम रत्न परिधान केले आहे त्यांना फायदा होतो. तुम्ही जर लग्न किंवा चंद्र राशीचे अथवा वृषभ, तूळ , मकर आणि कुंभ राशीचे असाल तर खालील अटी पाळून हे नीलम रत्न परिधान करू शकता.

1. जर एखाद्याच्या लग्न, चंद्र राशीमध्ये जर शनी देवाचे स्थान 6 व्या, 8 व्या आणि 12 व्या घरात असेल तर त्याने नीलम रत्न परिधान करू नये.

2. तसेच जर एखाद्याची शनीची डिग्री 11 ते 20 असेल तर शनीची शक्ती पुरेशी आहे आणि त्याने ती नीलम रत्न घालून वाढविण्याची गरज नाही.

नीलम रत्न परिधान करणार्‍या व्यक्तीच्या आर्थिक अडचणी अगदी जादू झाल्याप्रमाणे दूर होतात. या रत्नामुळे त्या व्यक्तीचे अपघातापासूनही सरंक्षण होते. कुठले ही रत्न परिधान करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्रज्ञ आणि अंकशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com