Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधचंदेरी दुनियेचा नवाब !

चंदेरी दुनियेचा नवाब !

भविष्य आपल्या हाती

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274

- Advertisement -

सैफ अली खान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी नवी दिल्ली येथे झाला. भूतपूर्व क्रिकेटर मन्सून अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा हा मुलगा.

सैफ अली खान यांना दोन लहान बहिणी आहेत, ज्वेलरी डिझायनर सबा अली खान आणि अभिनेत्री सोहा अली खान. सैफ यांनी हिमाचल प्रदेशातील द लॉरेन्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर वयाच्या नवव्या वर्षी हर्टफोर्डशायरमधील लॉकर्स पार्क स्कूलमध्ये त्यांना पाठविण्यात आले.

शालेय शिक्षणानंतर त्यांनी विंचेस्टर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बोर्डिंग स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर भारतात परत आले आणि त्यांनी दोन महिन्यांकरिता दिल्लीत एका जाहिरात फर्ममध्ये नोकरी केली.

चित्रपटात सृष्टीत करिअर करायचे हे ठरवून ते मुंबईला आले, बेखुदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे वेळी, सैफ यांची अभिनेत्री अमृता सिंगची यांच्याशी मैत्री झाली व त्यांनी ऑक्टोबर 1991 मध्ये अमृता सिंग यांचे बरोबर लग्न केले.

सैफ यांना सारा आणि इब्राहिम ही दोन अपत्ये झाली. 39 व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये आशिक आवाराच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळविले. ये है मुंबई मेरी जान, कच्चे धागे, आरझू आणि हम साथ-साथ है या यशस्वी चित्रपटात त्यांनी काम केले.

2005 मध्ये परिणीता आणि विनोदी चित्रपट सलाम नमस्ते यामध्ये मुख्य भूमिका करून स्वत: ला हिंदी सिनेमाचा प्रमुख अभिनेता म्हणून नावारूपास आला. परिणिता रिलीज झाल्यावर त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रथम फिल्मफेअर नामांकन मिळाले. 2011-2015 हे वर्ष सैफ यांच्या करियरमधील चढ-उतारचे होते. अभिनेत्री करीना कपूरबरोबर पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केले. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी या चित्रपटातील मुख्य भूमिकेत सैफ खान यांनी नव्या दशकाची सुरुवात केली.

सैफ यांचे संचित व भाग्य

भाग्य रेषेचा उगम आयुष्य रेषेतून झाल्यामुळे भाग्यवान व्यक्ती आहे, मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरलेली असल्याने मोठी कल्पनाशक्ती, अभिनय कौशल्य लाभलेले आहे. करंगळीची लांबी रवी बोटाच्या पहिल्या पेराखाली असल्याने वक्तृत्व व संवादफेक चांगली आहे. आयुष्य रेषा उत्तम खणखणीत त्यामुळे आरोग्य व उत्साह द्विगुणित झालेला आहे. अंगठ्याच्या शेवटाला सीमेवरच्या आडव्या रेषेत यवाचा आकाराची साखळी असल्याने पुत्र प्राप्ती निश्चित होते,पहिल्या पत्नीकडून 2 अपत्ये, करीनाशी लग्न झाल्यानंतर 1 अपत्य झाले. सैफ गडगंज सम्पत्तीचे मालक व महालांचे नवाब आहेत. त्यांच्या हातावरील रेषा व ग्रह हे स्पष्ट करतात कि अगणित पुण्य व संचितानंतर, वाडवडिलांच्या चांगल्या कर्माने नवाब व रईस खानदानात सैफ यांनी जन्म घेतला. सैफ यांच्या हाताचा पंजा मजबूत आहे बोटांची लांबी फार मोठी वा छोटी नाही. चंदेरी दुनियेची त्यांच्या मनावर खूप घट्ट पकड होती आकर्षण होते व स्वतःला सिद्ध करण्यासाठीची ईर्षा त्यांच्यात आहे. आंतराष्ट्रीय मान सन्मान मिळविण्याच्या दृष्टीने सैफ यांच्या हातावर बुध व रवीच्या बोटापर्यंत तळहाताकडून एक स्वतंत्र उत्तम रेषा आहे, तसेच सैफ शीघ्र कोपी आहेत कारण मस्तक रेषेतून खालच्या मंगळ ग्रहावर दोन्ही हातावर एक ठळक रेषा उतरली आहे.

हस्तसामुद्रिकशास्त्रात जातकाचे व्यक्तिमत्व व चारित्र्य लगेचच ओळखता येते.

हस्तसामुद्रिकशास्त्राचे वैशिष्ट्य असे आहे की, अभ्यासकाने दोन्ही हातावर एक नजर बारकाईने जरी फिरविली तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू ताबडतोब लक्षात येतात. व्यक्तिमत्त्वामध्ये स्वभाव, अंगी असलेले गुण – दुर्गुण, त्यामध्ये रागिष्ट व कोपिष्टपणा, हुशारी, वैवाहिक सौख्य, आर्थिक परिस्थिती मान सन्मान, व्यक्ती आळशी आहे का कामसू, आजार,अरिष्टे इत्यादी अनेक बाबींची उकल होते. हे व्यक्तिमत्वाचे पैलू हे ज्यावेळेस बालकाचा जन्म होतो त्यावेळच्या आकाशीय ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात असे कुंडलीशास्त्र सांगते. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे कि बालक 4 ते 5 महिन्याच्या गर्भवस्थेमध्ये असताना त्याच्या शरीरावर व हातावर त्वचा येते त्या काळातच हातावरील रेषा व बोटांवरील छाप तयार होतात व हातावरील ग्रहस्थिती सुद्धा उभार घेते त्यावेळेस बालकाचे भविष्य त्याच्या मुठीमध्ये तयार असते, जन्म मात्र नंतर 4 महिन्याने म्हणजे 9 महिन्यानंतर होतो. हातावर आधी रेषा, छाप व ग्रहांचा उभार येतो. येथे एक महत्वाची बाब विशद करायची कि जन्मवेळ अचूक असेल तर हातावरील रेषा ,बोटांवरील छाप व ग्रह हे त्या बालकाच्या जन्मानंतर काढलेल्या कुंडलीशी तंतोतंत जुळतात. थोडक्यात जन्म कुंडली व हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे जातकाचे भविष्य एकसारखे वर्तविता येत किंवा एकसारखे पाहावयास मिळते. जन्मकुंडली वरून जातक जेव्हा प्रश्न भविष्यकाराला विचारतो त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच भविष्यकार आपले गणित मांडतो व त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देतो परंतु जातकाच्या व्यक्तिमत्वाबाबत व अन्य बाकीच्या बाबींची उकल त्याला जन्म कुंडलीचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय समजत नाही किंवा उलगडत नाही. हस्तसामुद्रिकशास्त्रात असे होत नाही जातकाच्या आयुष्यातील सर्व सुख दुःखांच्या व शुभ अशुभ बाबींची कल्पना येते व जातकाचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लगेचच समजून येतात त्यासाठी जातकाने प्रश्न न विचारताच हस्तसामुद्रिक तज्ज्ञाला जातकाच्या स्वभाव वैशिष्ट्ये व भविष्याबाबत भरपूर माहिती कळते.

हस्तसामुद्रिकशास्त्रात जातकाचे व्यक्तिमत्व व चारित्र्य लगेचच ओळखता येते. (यासाठी सैफ यांच्या हातावरील हृदय रेषा बाणाने दाखविली आहे व दोनही हातावरील हृदय रेषा ही शनी उंचवट्यावर थांबलेली आहे.) हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे हृदय रेषा शनी ग्रहावर थांबली किंवा बोटाकडे वाळलेली असेल तर असे लोक जास्त कामुक असतात. असे लोक जोडीदाराशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आता एक लक्षात घ्या हातावरील रेषांचा प्रवास हा कुठून असावा व तो कुठे समाप्त व्हावा हे मानवाच्या हातात नाही, ही परमेश्वराची देणगी आहे. मात्र ह्या हृदयरेषेच्या शनी ग्रहावरच्या थांब्याचे गुण अवगुण हे पहिल्या बोटाखाली विराजमान असलेला गुरु ग्रह नियंत्रित करतो. गुरु शुभ असेल त्याला प्रमाणात उभार असेल व गुरु वलय असेल तर हृदय रेषेचे कामुकतेचे गुण गुरु नियंत्रित करतो. सैफ यांच्या हातावरील गुरु ग्रह उत्तम आहेत त्यामुळे त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी करिनाबरोबर दुसरे लग्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या