दुराव्याची ही आहे कारणे

दुराव्याची ही आहे कारणे

बहुतेकदा काही महिलांच्या तोंडून असे ऐकले जाते की, लग्नाआधी माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे , पण लग्नानंतर काय झाले आहे कुणास ठाऊक.

केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषही असे म्हणतात की, लग्नाआधी आमच्यात बरेच प्रेम होते, परंतु आता माझी पत्नी रोज माझ्याशी भांडते.

आमच्यातील प्रेम का संपत आहे हे माहित नाही. वाद आणि भांडणाशिवाय जीवनात काहीही शिल्लक नाही. पण हे सत्य नाही.

हे चांगले आहे की दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढला पाहिजे. याखेरीज आज तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या पती-पत्नीमधील नाते गोड होईल.

या गोष्टी चुकूनसुद्धा ठेऊ नका

आजकाल लोकं त्यांच्या बेडरूममध्ये टीव्ही वापरतात. नवरा-बायकोच्या नात्यासाठी हे अजिबात चांगले मानले जात नाही. खरं तर, बेडरूममध्ये जितके कमी इलेक्ट्रॉनीक वस्तू असतील तितके चांगले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर राहूचा प्रभाव असतो असे म्हटले जाते. या वस्तूंच्या अशुभ प्रभावामुळे वैवाहिक जीवनाला तडा जाऊ शकतो. असेही म्हटले जाते की यातून निघणारी नकारात्मक उर्जा पती-पत्नीमधील संबंध खराब करते. रात्री झोपताना मोबाईल फोनही खोलीच्या बाहेर ठेवून झोपायला हवं.

बेडरूममध्ये झाडे लावू नका

काही लोकांना वनस्पती इतक्या आवडतात की ते त्यांच्या बेडरूममध्ये देखील लावतात. वास्तूनुसार, हे योग्य नाही. बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेरील भागात रोपे लावता येतात. तुमची इच्छा असल्यास तुम्ही बेडरूममध्ये ताजे गुलाबाचे झाड लावू शकता. लक्षात ठेवा की ही फुले शिळी होता कामा नयेत. खोलीत शिळी फूले ठेवल्याने नात्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

अशी चित्रे ठेवू नये

वास्तूनुसार, हिंसक दृश्यांची छायाचित्रे बेडरूममध्ये लावू नका. असे केल्याने तुम्ही आणि जोडीदारात भांडण होऊ शकते व मतभेद निर्माण होण्याची शक्यता वाढते. तुम्ही तुमच्या लग्नाची चित्रे येथे ठेवू शकता हे बेडरूमसाठी चांगले आहे. अशी चित्रे दररोज पाहिल्यास तुमच्या नात्यात एक नावीन्यता येते. अशी चित्रे दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवली पाहिजेत.

बेडरूममध्ये रद्दी ठेवू नका

बहुतेक वेळा असे दिसते की काही लोक बेडरूममध्ये असलेल्या बेडच्या बॉक्समध्ये रद्दी भरतात. तुम्ही असे चुकूनसुद्धा करू नका. फक्त त्या वस्तू बॉक्समध्ये ठेवा ज्या वापरात असतात आणि वापरात नसलेल्या गोष्टी त्यात चुकूनही ठेऊ नका. अशा वस्तू नकारात्मक उर्जा निर्माण करतात.

बेडरूममध्ये काळ्या वस्तू ठेवू नका

बेडरूममध्ये काळ्या रंगाचा वापर करू नये. थोडासा काळा रंग असलेल्या खोलीत कोणतीही हानी होत नाही. परंतु हा रंग मनात नकारात्मकता आणतो. जेव्हा हा रंग अधिक असतो तेव्हा मनात वाईट विचार येऊ लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही बेडरूममध्ये काळ्या रंगाच्या गोष्टी टाळल्यास तुम्हाला फायदा होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com