शुभकारक हस्तरेषांमुळे होती सत्ता प्रसन्न

भविष्य आपल्या हाती
राम विलास पासवान
राम विलास पासवानram vilas paswan

प्रफुुुल्ल कुलकर्णी-ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 रोजी बिहारच्या खगेरिया जिल्ह्यातील शहरबनी येथे दलित कुटुंबात झाला. पासवान यांनी खसीरिया आणि पटना विद्यापीठातील कोसी महाविद्यालयातून कायद्यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली. 1969 मध्ये त्यांची बिहार पोलिसात डीएसपी म्हणून निवड झाली होती.

पासवान 1969 मध्ये बिहार राज्य विधानसभेवर संयुक्त समाजवादी पक्षाचे (युनायटेड सोशलिस्ट पार्टी)कडून आरक्षित मतदारसंघ अलाउली येथून निवडून गेले. 1974 मध्ये राज नारायण आणि जयप्रकाश नारायण पासवान यांचे प्रखर अनुयायी म्हणून लोकदलाचे सरचिटणीस झाले. 1975 मध्ये जेव्हा भारतात आणीबाणीची घोषणा केली गेली, तेव्हा पासवान यांना अटक करण्यात आली आणि संपूर्ण काळ तुरूंगात घालवला. तेंव्हा राज नारायण, कर्पूरी ठाकूर आणि सत्येंद्र नारायण सिन्हा या आणीबाणीत अटक असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली.

1977 मध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते जनता पक्षाचे सदस्य बनले आणि हाजीपुर येथून पहिल्यांच प्रयत्नात 4 लाख 24 हजार मतांच्या विक्रमी फरकाने विजयी होत त्यांनी संसदेत पाऊल टाकले.

1979 मध्ये जनता पार्टी फुटली तेव्हा ते चरणसिंग गटात सामील झाले. पासवान हे 1980 मध्ये हाजीपूर मतदारसंघातून जनता पक्षाचे (समाजवादी) उमेदवार म्हणून लोकसभेवर पुन्हा निवडून आले. 1983 मध्ये त्यांनी दलितसेना या दलित मुक्ती आणि कल्याण संस्थेची स्थापना केली. हाजीपूर लोकसभा मतदारसंघात 1984च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

पासवान 1989 मध्ये 9 व्या लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांना विश्वनाथ प्रताप सिंह सरकारमध्ये केंद्रीय कामगार व कल्याण मंत्री जबाबदारी स्वीकारली. 1996 मध्ये त्यांनी हाजीपुरातून पुन्हा विजय मिळविला. लोकसभेत सत्ताधारी आघाडीत सामील झाल्याने त्यांना मंत्रिपद मिळाले.

ऑक्टोबर 1999 ते सप्टेंबर 2001 पर्यंत ते अटलजींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय प्रसारण मंत्री होते. पुढे 2002 पर्यंत त्यांनी कोळसा मंत्रालय सांभाळले.

2000 मध्ये पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) ची स्थापना करण्यासाठी जनता दल सोडले. भाजपशी मतभेद निर्माण झाल्यावर 2002 मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी एनडीए सोडली.

2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पासवान संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सामील झाले. त्यांना रसायन व खते मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाचे केंद्रीय मंत्रीपद मिळाले.

फेब्रुवारी 2005 च्या बिहार राज्य विधानसभा निवडणुकीत पासवान यांच्या पक्षाने काँग्रेससमवेत निवडणूक लढविली. बिहार राज्यातील निवडणुकांमध्ये पासवान यांची तिसरी आघाडी पूर्णपणे अपयश ठरली. पुढे एनडीएने नितीशकुमार यांना नेता करून सरकार स्थापन झाले.

पासवान यांनी पाच वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते. 1996 पासून 2015 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळांमध्ये सातत्याने त्यांचा समावेश झाला. 1996 ते 2015 पर्यंत विविध पक्षांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या युनायटेड फ्रंट, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स अशा राजकीय आघाड्यांमध्ये ते सामील झाले होते.

2014 च्या हाजीपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पासवान यांनी भाजपशी युती केली होती. पासवान यांनी पुन्हा 2014 मध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा पदभार सांभाळला. 2019 पर्यंत या पदावर ते कायम होते. 2019 मध्ये भाजपाच्या मदतीने ते राज्यसभेवर निवडून गेले होते. पासवान यांचे 8 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले, पासवान यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर 10 ऑक्टोबर 2020 रोजी पाटना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राम विलास पासवान
राम विलास पासवानram vilas paswan

पासवान यांच्या हातावरील ग्रह रेषा या अत्यंत शुभदायी आहेत. हातावरील सर्व रेषांचा मार्ग, त्या रेषेचा आकार व पोत हा सामुद्रिकशास्रातील अत्यंत शुभकारक गणल्या गेलेल्या व शास्त्रीय नियमांनुसार आहेत. हातावरील ग्रह त्यांचे उभार हे उच्चीचे आहेत. हाताचा व बोटांचा आकार हा प्रमाणात आहे. नेतृत्व कौशल्य, हुशारी, चतुराई या गुणांचा मिलाफ आहे.

हातावर अशुभकारक कुठलीही गोष्ट नाही फक्त वैवाहिक सौख्यातील सुरवातीच्या आयुष्यातील कमतरता आहे. हातावर आडव्या रेषा आणि अशुभ चिन्हे नाहीत त्यामुळे रामविलास पासवान हे भाग्य घेऊनच जन्माला आले होते व त्यांनी त्यांना लाभलेल्या भाग्याचे सोने केले कारण कोणत्याही पक्षाच्या सरकारात त्यांनी मंत्रीपद मिळविले व सर्व राजकीय पक्षांशी सोयी व लाभानुसार चांगले संबंध ठेवण्यात ते यशस्वी झाले.

स्व. रामविलास पासवान यांच्यासारखे बोटावर मोजण्या इतके लोक जन्मतः भाग्य घेऊन येतात. पासवान यांच्या हातावरील ग्रह रेषा या अत्यंत शुभ दायी आहेत. त्यांच्या आयुष्यातील वैवाहिक सुखात कमतरतेव्यतिरिक्त हातावरील सर्व रेषा ग्रह शुभकारक आहेत. त्याचा त्यांना आयुष्यभर लाभ मिळाला आहे त्यात मान सन्मान, पैसा, मालमत्ता, अनेक मंत्रीपदे भूषविली, लोकनायक झाले, त्यांच्या आयुष्यात काळी कारकीर्द नाही, अडचणी नाहीत, मानहानी, घोटाळे यांच्यातही कधीच नाव नव्हते.

तसे पहिले तर अंकशास्रातील आकड्यांचा माझा अनुभव असा आहे की, ज्यांचा जन्म 1,3,5,7 व नाव तारखेस झाला आहे किंवा ज्यांच्या जन्म तारखेची बेरीज विषम येते असे लोक सम जन्म तारीख असणार्‍या लोकांपेक्षा जास्त भाग्यवान असतात.

हस्तसामुद्रिकशास्त्र सांगते की, बाळ जेंव्हा आईच्या पोटात 4 ते 5 महिन्याचे असते तेंव्हाच हातावरील रेषा, बोटांचे ठसे व हातावरील ग्रहांची स्थिती, जन्मतः असलेले शुभकारक चिन्हे, हाताचा व बोटांचा आकार यांची निर्मितीला आकार मिळतो. जन्म मात्र नऊ महिन्यानंतर होतो. व्यक्ती आपले कर्म व भाग्य घेऊन जन्माला येते.हातावरील शुभ अशुभाप्रमाणे ती व्यक्ती आपले जीवन व्यतीत करते.

जीवन सुखी समृद्ध असण्यासाठी आपले संचित अत्यंत चांगले असावे लागते, मन व बुद्धी आयुष्यात सफल होण्याच्या दृष्टीने अत्यंत चतुराईने काम करते, व्यक्ती भाग्यवान असेल तर तिने हाती घेलेले कार्य सफल होते त्यात अडचणी येत नाहीत. व्यक्तीला ती भाग्यवान असली तरी तिला तिच्या आयुष्यात प्रयत्न व कष्ट तर करावेच लागतात भाग्यवान व्यक्तीच्या प्रयत्नांना यश लाभते व कमी भाग्य किंवा ज्या प्रमाणात भाग्याची साथ असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे आयुष्यातील यश-अपशय अवलंबून असते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com