अचूक निर्णयक्षमता व बुद्धी चातुर्याचा मेळ

भविष्य आपल्या हाती
राजनाथ सिंह
राजनाथ सिंहRajnath Singh

प्रफुुुल्ल कुलकर्णी-ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

राजनाथ सिंह यांचा जन्म 10 जुलै 1951 रोजी उत्तर प्रदेशातील चांदौली जिल्ह्यातील भभौरा गावात, शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावाकडच्या खेड्यातील शाळेत झाले.

गोरखपूर विद्यापीठातून प्रथम श्रेणी संपादन करून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली. लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने प्रेरित होते. त्यांनी भौतिकशास्त्राचे लेक्चरर म्हणून काम केले. पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज मिर्जापूर, उत्तर प्रदेश येथून केले.

राजनाथ सिंह भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. पहिल्या मोदी मंत्रालयात ते गृहमंत्री होते.

ते लखनौ (लोकसभा मतदारसंघ) व दोन वेळा गाझियाबाद (लोकसभा मतदारसंघ) येथून लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. ते राज्याच्या राजकारणातही सक्रिय होते आणि दोनदा मुख्यमंत्री म्हणून हैदरगड (विधानसभा मतदार संघ)चे आमदार होते.

ते वयाच्या 13 व्या वर्षी पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि ते संघटनेशी जोडले गेले. 1971 च्या दरम्यान ते गोरखपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटना सचिव होते.

1972 मध्ये ते आरएसएसच्या मिर्जापूर शाखेचे सरचिटणीस झाले. 1991 मध्ये त्यांनी अभ्यासक्रमात वैदिक गणिताचा समावेश केला.

एप्रिल 1994 मध्ये ते राज्यसभेवर निवडले गेले आणि ते उद्योगविषयक सल्लागार समिती, कृषी मंत्रालयाची सल्लागार समिती, व्यवसाय सल्लागार समिती, गृह समिती आणि द. मानव संसाधन विकास समिती नियुक्त होते.

राजनाथ सिंह यांची राजकीय कारकीर्द

उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री 1991-1992

उत्तर प्रदेश विधानसभेचे विधानसभा सदस्य मिर्जापूर (विधानसभा मतदार संघ) 1977

उत्तर प्रदेशमधील विधान परिषद सदस्य - 1988

उत्तर प्रदेशमधील राज्यसभा सदस्य - 1994 - 1999

हैदरगड (विधानसभा मतदारसंघ) (पोट निवडणुका) 2000

उत्तर प्रदेश विधानसभेचे विधानसभा सदस्य

खासदार, राज्यसभा - 2002

लोकसभा. खासदार गाझियाबाद (लोकसभा मतदारसंघ) 2009

मिर्जापूर . खासदार (लोकसभा मतदारसंघ) 2014 - 2019 केंद्रीय गृहमंत्री

लखनऊ . खासदार (लोकसभा मतदारसंघ) 2019 - केंद्रीय संरक्षणमंत्री मंत्री.

राफेल ह्या फ्रेंच बनावटीच्या अत्याधुनिक विमानांचे भारतीय वायू सेनेत समाविष्ट करण्यासाठी सिंग यांनी भारताचे संरक्षणमंत्री बनल्यानंतर करार पूर्ण केला. मे 2020 पासून भारत आणि चीनच्या सुरक्षा दलांमध्ये लडाखच्या सीमावर्ती भागावरून तणाव आहे.

चीनने भारतावर दबाव आणल्यामुळे या परिस्थितीत तणाव वाढला आहे. सिंग यांनी भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि लडाख रेंजलाही भेट दिली.

परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, जनरल मनोज नरवणे यांना भेटले.

2020 च्या चीन-भारत गलवान व्हॅली येथे झालेल्या चकमकीदरम्यान 20 भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर तणाव वाढला, चीनला चोख प्रति उत्तर दिले व गलवान खोर्‍यात सीमेवर सैनिकांची व आधुनिक शस्रांची जमवाजमव करून चीनच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवले.

राजनाथ सिंह यांच्या उजव्या हातावरील रेषा, बोटे व ग्रहांचे कारकत्व

आयुष्य रेषा व मस्तक रेषा वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत एकत्र व नंतर स्वतंत्र झालेल्या, वयाच्या 13 व्या वर्षानंतर आयुष्यात आपण काय करावे याचा निर्णय होतो त्याप्रमाणे आयुष्याच्या 13 व्या वर्षीच आर.एस.एस.या संघटनेत ते सामील झाले, लहानपणापासूनच हिंदू धर्माचा पगडा असल्याने हिंदुत्ववादी बनले गेले.

आयुष्य रेषा जोमदार असल्याने शारीरिक काटकपणा होता व आहे. वयाच्या 50 वर्षापासून मंगळ रेषेची साथ मिळाल्यामुळे उत्साह अधिक वाढला गेला.

मस्तक रेषा लांब वरच्या मंगळ ग्रहाच्या थोडीशी खालपर्यंत आलेली आहे यामुळे विचारपूर्वक आक्रमकतेत भर घातली आहे, येथे दोन मस्तक रेषा आहेत त्या विचारशक्ती चंद्र ग्रहांमुळे वाढीस लागते व मस्तक रेषेने आत्यंतिक हुशारी प्रदान केल्याने प्रत्येक क्षेत्रात बुद्धिमत्तेच्या जोरावर यश व छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत.

हृदय रेषेचा उगम गुरु उंचवट्यावर होऊन ती कमानदार आहे, यामुळे प्रेमभावनेत सात्विक व प्रेमळपणाचा भाव असतो. गुरु उंचवटा अत्यंत शुभकारक त्यावर गुरु वलय आहे, असे लोक परंपरा जपणारे देवाला मानणारे असतात, हे आपणाला पहिल्या राफेल विमानाची फ्रान्समध्ये नारळ व कुंकवाने पूजा करतानाचे दूरदर्शनवरील दृष्य आठवतच असतील. गुरु वळत असणारे लोक खूप धार्मिक व नीतिवान असतात त्यांची आदर्शवत वृत्ती प्रवृत्ती असते.ते अवैध व्यवसाय करत नाही आणि त्यांची कुणाला फसवण्याची वृत्तीही नसते.

भाग्य रेषा आयुष्य रेषेमधून उगम पावली आहे व या भाग्य रेषेतूनच रवी रेषेचा उगम आहे, अश्या परिस्थितीत हे लोक जे कार्य हातात घेतात त्यात त्यांना यश मन सन्मान सहजतेने प्राप्त होत जातो. यांचे अंगी जात्याच समय सूचकता, अचूक निर्णय क्षमता व बुद्धी चातुर्य असते, हे लोक आपले कार्य निरंतर करीत असताना यांना कायम यशाची सहजच प्राप्ती होत जाते.

भाग्य रेषा मस्तक रेषे पासून बारीक झाली आहे त्यामुळे वयाच्या 35 वर्षांपासून आर्थिक परिस्थिती उत्तम दाखविते.चंद्र ग्रह मनगटाजवळ अधिक फुगीर झाल्याने विद्वत्ता वाढीस लागली आहे.

हातावरील मुख्य रेषा व्यतिरिक्त आडव्या तिडव्या किंवा भाग्याला अडथळा आणणार्‍या रेषा नाहीत त्यामुळे भाग्याची कायम साथ मिळते आहे.रवीचे तिसरे बोट मोठे आहे त्यामुळे मान-सन्मान प्राप्त करण्याची कायम धडपड असते व रवी रेषा हातावर भाग्य रेषेच्या साहाय्याने उगम पावत असल्याने मान-सन्मान हे कायम मिळत आहेत.

चारही बोटे लांब आहेत बोटाचे टोक बोथट व गोलाईयुक्त आहे, अश्या वेळेस असे लोक विचारी असतात, समोरच्याला ओळखण्यात अजिबात चूक करीत नाहीत एखादा निर्णय अतिशय शांततेने निर्धारपूर्वक घेण्याची यांची क्षमता असते.

अंगठा मजबूत आहे पहिले व दुसरे पेर समप्रमाणात आहे, पहिले पेर विचार शक्तीव दुसरे पेर हे तत्पर अंमलबजावणी व त्वरित कृती करण्यासाठी प्रेरित करीत असते. त्यामुळे या लोकांना आळस माहित नसतो कामाचा उरक मोठा असतो. मजबूत अंगठ्यामुळे स्वयं निर्णयक्षमता व स्वतःच्या तत्वाला हे कायम बाध्य व स्वयंभू असतात. आपल्या निर्णयाशी तत्वाशी ठाम असतात मोडेन पण वाकणार नाही असा यांचा बाणा असतो.

धीर गंभीर, खर्जातल्या आवाजाची देणगी लाभलेले त्यामुळे यांच्या अंगी असलेली कठोरता लक्षात येते यांचा एक एक शब्द हृदयाला भिडतो कारण यांचे बुद्धीचे बोट म्हणजेच करंगळी प्रमाणापेक्षा थोडी लांब आहे अश्यावेळी वक्तृत्वशैलीत शब्दांचे प्रयोग अचूक असतात व त्यांचा भाषणांचा प्रभाव मोठा असतो.

राजनाथ सिंह यांच्यासारखा एक खंबीर संरक्षण मंत्री भारताला अशा वेळी लाभला की ज्यावेळेस नेपाळ, चीन व पाकीस्तान भारताची कोंडी करत आहेत, युद्धजन्य परिस्थिती आहे अश्या वेळेस अमेरिका, रशिया फ्रान्स, आस्ट्रेलिया, जापान व अरब अमिरात हे आपल्याला मदत करीत आहेत, राजनाथ सिंह यांचे राजनैतिक कौशल्य या आणीबाणीच्या परिस्थितीत खूप मोठे आहे यात शंका नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com