त्रैमासिक भविष्य - तुला
त्रैमासिक भविष्य - तुलाQuarterly Future - Libra

त्रैमासिक भविष्य - तूळ Quarterly futures - Libra

सांपत्तिक आवक चांगली असेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी - 2021

नवीन वर्षाच्या महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनूस्थानी केतू, तृतीयात रवि-शुक्र-प्लूटो, चतुर्थात बुध-गुरू -शनी, पंचमात नेपच्यून, सप्तमात मंगळ-हर्षल, अष्टमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे रा, री,रू,रे,रो,ता,ती,तू,ते अशी आहेत. तुला राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी -शुक्र, तत्त्व-वायू, चर राशी असल्याने स्वभाव चंचल, पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग- पुरूष्र त्यामुळे काही स्त्रीयांची वागणूक पुरूषी थाटाची असते. रजागुणी, स्वभाव क्रूर, प्रकृती कफ-वात-पित्त. राशीचा अंमल गुप्तांगावर आहे. शुभ रत्न-हिरा, शुभ रंग- सफेद, शुभ दिवस- शुक्रवार, देवता- लक्ष्मी, संतोषी, शुभ अंक- 6, शुभ तारखा- 6,15,24.मित्र राशी- मिथून, मकर, कुंभ, धनू, कर्क, शत्रुराशी- सिंह. संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक, प्रभावशाली, नकारात्मक गुण, ईर्षा, घमेंड, अतिधूर्तता, मानसिक संतुलन चांगले, विनोदी वृत्ती.

सप्तमात मंगळ आहे. कौटुंबिेक सुखामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहीतांना प्रेमविवाहाच्या भानगडीत न पडलेले चांगले. घरातील कलह घरातच ठेवा. नवीन संबंध जोडू नये. व्यापार्‍यांनी सौदे पुढे ढकलावेत.

स्त्रियांसाठी - तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनादी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतूू, चतुर्थात रवि-बुध-गुरु-शुक्र-शनि-प्लुटो, पंचमात नेपच्यून, सप्तमात मंगळ-हर्षल, अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, प्रयत्न व वेळ वाया जातो. आणि पदरात काहीही पडत नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. वडीलांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. मातृसुखातही काही ना काही अडचणी येतील. मात्र निराश होऊ नका. काळ कधीही थांबत नाही.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवकही चांगली राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व घराबाहेर खेळीमेळीेचे वातावरण राहील.पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. स्त्री वर्गाबद्दल विशेष प्रेम वाटेल. वाहनसुख चांगले मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असल्यास हा महिना त्यासाठी फार चांगला आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल. निवासस्थानासंबंधी काही शुभ घटना घडतील.

स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील हे मात्र धोक्याचे आहे. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

मार्च - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी केतू, चतुर्थात बुध-गुरू-शनि-प्लुटो, पंचमात रवि-शुक्र-नेपच्यून, सप्तमात हर्षल, अष्टमात मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात रवि आहे. चंचल बुद्धीमुळे प्रवासाला निघावेसे वाटेल. विद्याभ्यासात चंचल बुदधीमुळे खंड पडेल. काहीही करून पैसा मिळवलाच पाहिजे अशी मनाला ओढ लागेल. त्यासाठी शेअर्स व्यापार बिनभरवश्याच्या बँकेत गुंतवणूक अशा प्रकारचे व्यवहार कराल. काहींना त्यातून पैसा मिळेलही परंतू असे व्यवहार जपून करावे. विनाकारण विषाची परीक्षा घेणे तोट्याचे आहे.

चतुर्थात गुरू आहे. या स्थानातील गुरूमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होऊ शकणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष अनुभव येईल. जमील जुमला व सांपत्तीक आवक नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही.

सप्तमात हर्षल आहे. विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुकांना चमत्कारिक अनुभव देईल. विवाह फार उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाहसंबंध ठरला असे वाटावे ऐनवेळी दुसर्‍या स्थळी असाही अनुभव येईल.

स्त्रियांसाठी - पंचमात शुक्र आहे. पती-पत्नीचेे आपसात प्रेम चांगले राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खर्च करू नये. काटकसर करावी.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना स्वास्थाची काळजी घ्यावी.विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहील.

शुभ तारखा - 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com