Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कन्या Quarterly Future - Virgo

त्रैमासिक भविष्य – कन्या Quarterly Future – Virgo

सौ. वंदना अनिल दिवाणे : वैभव प्राप्त होईल

जानेवारी – 2021

- Advertisement -

नवीन वर्षाच्या महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयात केतू, चतुर्थात रवि-शुक्र-प्लूटो, पंचमात बुध-गुरू -शनी, षष्ठात नेपच्यून, अष्टमात मंगळ-हर्षल, नवमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे टो, पा, पी, पु, णा, ठा, पे, पो अशी आहेत. कन्या राशीचे चिन्ह एक हातात धान्याची लोंबी व दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री आहे. राशी स्वामी- बुध, राशी त्तत्व- पृथ्वी, असल्याने स्वभाव अतिशय सहनशील, द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेतला तरी कृतीस उशीर लागेल. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, लाजाळू व धीटही आहे. दक्षिण दिशा फायद्याची आहे. वात प्रकृती. राशीचा अंमल पोटावर असल्याने पोटाच्या विकाराची विशेष काळजी घ्यावी. शुभ रंग हिरवा, शुभ रत्न- पाचू, शुभ वार- बुधवार, रविवार, शुभ अंक- 5, शुभ तारीख- 5, 14, 23. मित्र राशी- तुला. शत्रु राशी- कर्क, गणरायाची उपासना फलदायी.

चतुर्थात रवि आहे. राजकारणी लोकांसाठी चांगला आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी हाण्यासारख्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना

शेतीवाडीपासून चांगला फायदा होईल. वृद्धांसाठी हा महिना विशेष चांगला राहील. शारिरीक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. बागाईतदारांना हा महिना प्रगतीकारक राहील. विशेषतः द्राक्ष बागाईतदारांना व्यापारासंबंधी लाभ होईल.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमात प्लुटो आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान ग्रहण सामर्थ्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. त्यामुळे अभ्यासात मनाला एकाग्र करणे शक्य होईल. प्रगतीकारक काळ आहे.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतूू, पंचमात रवि-बुध-गुरु-शुक्र-शनि-प्लुटो, षष्ठात नेपच्यून, अष्टमात मंगळ-हर्षल, नवमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. स्त्री, पुत्र सुख उत्तम राहील. उपासनेमध्ये मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती मिळेल. लेखक वर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. गूढशास्त्रांची आवड वाटेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह होईल. राजकारणी लोकांना राजसत्तेचा भाग मिळू शकेल. प्रतिष्ठेचे पद लाभेल. आपल्या बुद्धीमत्तेने इतरांना चकीत कराल.

पंचमात शुक्र आहे. विषयलोलुपतेकडे कल राहील. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक ठरेल. शत्रुवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललित कला लेखन, सट्टेे, शेअर्स यांपासून लाभ होतील.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावेत. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हिच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी. विवाह ठरवितांना नीटपणे चौकशी करा. अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शेक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव करावा.

शुभ तारखा – 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

मार्च – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, पंचमात बुध-गुरू-शनि-प्लुटो, षष्ठात रवि-शुक्र-नेपच्यून, नवमात हर्षल, मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात गुरू आहे. हा गुरू स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सर्वत्र पसरेल. सद्गुरू कृपेने व वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास प्रतिभेचा परीसस्पर्श होईल. लोकशिक्षणात भाग घेण्याची संधी मिळेल.

पंचमात शनि आहे. शरीरप्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय मिळवाल. स्थावरसंबंधी लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारणी लोकांशी संबंध यात यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत यश लाभेल. व्यापार्‍यांना लाभ होतील.

स्त्रियांसाठी – षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. पंचमातील गुरूची चांगली साळ मिळेल. शिक्षण घेत असलेल्या तरूणींची विद्येत उत्तम प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या