Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - वृश्चिक Quarterly Future - Scorpio

त्रैमासिक भविष्य – वृश्चिक Quarterly Future – Scorpio

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, द्वितीयात रवि-शुक्र-प्लूटो, तृतीयात बुध-गुरू -शनी, चतुर्थात नेपच्यून, षष्ठात मंगळ-हर्षल, सप्तमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ, उत्तर दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्य, वर्ण- ब्राह्मण, कफ प्रवृत्ती, पाठीसंबंधी विकारांची काळजी घ्यावी. शुभ रत्न पोवळे, शुभ रंग लाल, शुभ वार मंगळवार, देवता-शिव, हनुमान, भैरोबा. शुभ अंक- 9, शुभ तारखा- 9,18,27. मित्र राशी -कर्क, मीन. शत्रु राशी- मेष, सिंह, धनु. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार कराल. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. औषध विक्रेता व डॉक्टरसाठी चांगली रास. साहसी, कर्मठ, स्पष्टपणे बोलणारी.

द्वितीयात रवि आहे. यामुळे वडीलमंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करत आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्याची शक्यता आहे. खर्चिक व उदार स्वभावाला अंकुश लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. कर्जापासून दूर रहा. कर्ज घेतले असेल तर हप्ते वेळेवर भरा.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. महिलांच्या हातात पैसा खेळता राहील. पतीराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारच्या सखा तुमचा हेवा करतील.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला या दोन्ही शाखांच्या विदयार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतूू, तृतीायात रवि-बुध-गुरु-शुक्र-शनि-प्लुटो, चतुर्थात नेपच्यून, षष्ठात मंगळ-हर्षल, सप्तमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात मंगळ आहे. कौटुबिक सुखामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहितांनी प्रेमविवाहाच्या भानगडीत पडू नये. फसगत होण्याची शक्यता आहे. विवाहीतांना घरातील कलह घरातच मिटवावे. व्यापार्‍यांनी सौदे पुढे ढकलावे.

तृतीयात बुध आहे. व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. अनेक मोठ मोठ्या व्यापार्‍यांशी ओळख होईल. त्यामुळे उलाढालीत वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. गूढ विद्येविषयी आकर्षण वाटेल. भावी घटनांची स्वप्नाद्वारे चाहूल लागेल. साहसाकडे कल राहील. विद्याव्यासंगात भर पडेल. लोकहिताची कामे कराल. व्यापारी लोकांशी मैत्री होईल. कला व व्यापार यांच्या संगमातून धनप्राप्तीचा वेग वाढेल.

तृतीयात शनि आहे. शत्रुपक्षात फूट पाडून मात करण्यात यश मिळेल. अकल्पितपणे भाग्योदय होण्याचा योग आहे. सरकारदरबारी वजन वाढेल. पुत्र व ग्रह यांचे सुख उत्तम आहे. आहार समतोल व सिमीत घ्या. कामात एकाग्रता साधा. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्या

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारीपाजारी यांचे संबंध चांगले राहतील. त्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. गायनादी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकपणाने केल्यामुळे मानसिक समाधान वाटेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहील. वार्षिक परिक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. लेखनाचा सराव जितका तितक्या प्रमाणात टक्केवारीत वाढ होईल.

शुभ तारखा – 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

मार्च – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात बुध-गुरू-शनि-प्लुटो, पंचमात रवि-शुक्र-नेपच्यून, षष्टात हर्षल, सप्तमात मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात गुरु आहे. त्यामुळे मनुष्य पराक्रमी बनतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. भावंडांकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य मिळेल. कमी श्रमात अधिक धनप्राप्ती होईल. राजकीय कार्यकर्ते व नेत्यांना हा गुरू विशेष चांगला आहे. विशेष पराक्रम न दाखवता भाग्यवृद्धी होईल.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण राहील. मातेची सेवा कराल. वाहनसुख चांगले मिळेल. खरेदीसाठी हा महिना चांगला आहे. निवासस्थानासंबंधी काही शुभ घटना घडतील.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. महिलांना आनंदी वृत्ती प्रदान करेल. कुटुंबात हुकुमाची राणी होऊ शकाल. हातात पैसा खेळत राहील. मनाप्रमाणे शॉपिंग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होंईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या