त्रैमासिक भविष्य - वृश्चिक Quarterly Future - Scorpio

उत्तरोत्तर भाग्योदय होईल
त्रैमासिक भविष्य - वृश्चिक Quarterly Future - Scorpio

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू , पंचमात शुक्र, षष्ठात रवि-बुध, नवमात शनि, दशमात नेपच्यून , लाभात मंगळ, व्ययात हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे इ, उ, ए, ओ,

वा, वी, वू, वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. स्वामी शुक्र, रास पृथ्वी तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली राशी, स्वरूप स्थिर, काहीसा आळशी व ऐशोआरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची. लिंग स्त्री असल्याने स्वभाव लाघवी, रजोगुणी, वर्ण वैश्य, राशीचा अंमल मुखावर. वाचा स्पष्ट, शुद्ध व प्रभावी अभ्यासाने वक्तृत्त्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न हिरा. शुभ रंग हिरवा व पांढरा. देवता- लक्ष्मी माता, संतोषी माता. शुभ अंक 6, शुभ तारखा- 6,15,24. मित्र राशी- मकर व कुंभ. शत्रु राशी-सिंह, धनु, मीन. चिकाटी, निश्चयी, कष्टाळू, तेजस्वी व बुद्धीवान.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांची सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगती ठेवल्यास भांडणाचे प्रकार वारंवार येतील. स्थावर इस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

स्त्रियांसाठी - पंचमात शुक्र आहे.व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी राहू ,सप्तमात केतू , अष्टमात गुरू-बुध- शनि, दशमात शनि, व्ययात मंगळ - हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

नवमातील बुध शत्रूंचा नाश करण्यास समर्थ आहे.

अष्टमात असलेल्या रविमुळे नवविवाहीतांना लाभ होईल. किंबहुना अशा लोकांना विवाहानंतर भाग्योदय सुरू झाल्याची प्रचिती येईल. नववधूवर असलेल्या प्रेमामुळे किंवा अन्य काही कारणामुळे घरातील इतर मंडळींशी पटणार नाही. सास भी कभी बहू थी अशी परिस्थिती निर्माण होईल.

अष्टमात शुक्र आहे. पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शविते आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवा स्वकष्टावर आधारित असावी. आणि त्यासाठी अवैध मार्गांचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी शेवटी त्याचा परिणाम विषासारखा असतो.

नवमात प्लुटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर अता यशस्वी व्हाल. अध्यात्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

स्त्रियांसाठी -अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा - 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-हर्षल, सप्तमात केतू , नवमात रवि-बुध-गुरू-शुक्र-शनि-प्लुटो, दशमात नेपच्यून, व्ययात मंगळ- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात बुध आहे. पुत्रसुख उत्तम मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. तिही सरळ मार्गाने व सत्संग व सत्पुरूषाच्या सेवेपासून लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रतिभासंपन्न लेखन निर्माण होईल. काहींना परदेशगमनाची संधी उत्पन्न होईल. धार्मिक मते जुन्या वळणाची असूनही नवीन विचार प्रवाहाचे स्वागत कराल.

नवमात गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला त्यांच्यासाठी उपयोगी व लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. विद्वान लोकांत गौरव प्राप्त होईल. वृद्धांना तीर्थयात्रा घडतील. शक्तीप्रमाणे देशसेवा घडेल. काटकसरीची वृत्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी येणार नाही. ज्योतिष व धर्मशास्त्राची आवड वाटेल.

लग्नी राहू आहे. स्वतःच्या कुलाचा फार अभिमान वाटेल. नातेवाईकांशी फार पटणार नाही. आयुष्याच्या सुरूवातीस गरीबी असली तरी हळु हळु प्रगती होऊन आर्थिक सुस्थिती निर्माण होईल. उत्तरोत्तर भाग्योदय होईल. स्वजनासमोर हात पसरणे टाळा.

स्त्रियांसाठी - महिलांना पतीराजांची सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळले जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com