त्रैमासिक भविष्य - धनू Quarterly Future Sagittarius

स्थावर मालमत्तेसंबंधी लाभ होतील
त्रैमासिक भविष्य - धनू Quarterly Future Sagittarius

सौ. वंदना अनिल दिवाणे

एप्रिल- 2021

नवीन वर्षाच्या महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी गुरू-शनि-प्लुटो, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात रवि-बुध-शुक्र, पंचमात हर्षल, षष्ठात मंगळ-राहू व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धर्नुधारी सज्ज पुरूष मुखरहित घोड्यावर बसलेला आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व अग्नी,त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभाव राशी असल्यामुळे लवकर निर्णय घेता येत नाही. लिंग पुरूष आहे त्यामुळे काही स्त्रीयांचे वागणे पुरूषी थाटाचे . वर्ण क्षत्रिय. स्वभाव क्रूर. पित्त प्रकृती. शुभ रत्न पुष्कराज. शुभ रंग पिवळा. शुभ दिवस गुरूवार. शुभ अंक-3, शुभ तारखा- 3,12,21,30. मित्र राशी - मेष, सिंह. शत्रु राशी-कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती. अतिधूर्तता, स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण. मुडी स्वभाव.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण असे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, वेळ, प्रयत्न वाया जातो व पदरात काहीच पडत नाही. मातृसुखात काही अडचणी येतील. पिताश्रीपासून काही मिळण्याची अपेक्षा ठेवू नका.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती धोक्याची आहे. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांचे ज्ञान ग्रहण सामर्थ्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. त्यामुळे अभ्यासात मनाला एकाग्र करणे शक्य होईल. प्रगतीकारक काळ आहे.

शुभ तारखा -4, 5, 7, 8, 13, 17, 18, 19, 21, 22, 24, 25

मे - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. स्त्री, पुत्र सुख उत्तम राहील. उपासनेमध्ये मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती मिळेल. लेखक वर्गाला साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. गूढशास्त्रांची आवड वाटेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह होईल. राजकारणी लोकांना राजसत्तेचा भाग मिळू शकेल. प्रतिष्ठेचे पद लाभेल. आपल्या बुद्धीमत्तेने इतरांना चकीत कराल.

पंचमात शुक्र आहे. विषयलोलुपतेकडे कल राहील. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक ठरेल. शत्रुवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललित कला लेखन, सट्ट े,शेअर्स यांपासून लाभ होतील.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावेत. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हिच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी. विवाह ठरवितांना नीटपणे चौकशी करा. अन्यथा विश्वासघातकी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी - धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शेक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव करावा.

शुभ तारखा - 1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 31

जून- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, पंचमात बुध-गुरू-शनि-प्लुटो, षष्ठात रवि-शुक्र-नेपच्यून, नवमात हर्षल, मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात गुरू आहे. हा गुरू स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सर्वत्र पसरेल. सद्गुरू कृपेने व वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास प्रतिभेचा परीसस्पर्श होईल. लोकशिक्षणात भाग घेण्याची संधी मिळेल.

पंचमात शनि आहे. शरीरप्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय मिळवाल. स्थावरसंबंधी लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारणी लोकांशी संबंध यात यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत यश लाभेल. व्यापार्‍यांना लाभ होतील.

स्त्रियांसाठी - षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. पंचमातील गुरूची चांगली साळ मिळेल. शिक्षण घेत असलेल्या तरूणींची विद्येत उत्तम प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com