Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - धनू Quarterly future - Sagittarius

त्रैमासिक भविष्य – धनू Quarterly future – Sagittarius

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-शुक्र-प्लूटो, तृतीयात बुध-गुरू -शनी, तृतीयात नेपच्यून,पंचमात मंगळ-हर्षल, षष्ठात राहू, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धर्नुधारी सज्ज पुरूषाचा असा मुखरहीत घोड्यावर बसलेला आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव. द्विस्वभाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्वो दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, त्यामुळे काही स्त्रीयांचे वागणे पुरूषी थाटाचे वर्ण क्षत्रिय, स्वभाव क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यावर. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग – पिवळा, शुभ दिवस गुरूवार, देवता विष्णू, शुभ अंक- 3, शुभ तारखा- 3 /12/21/30. मित्र राशी- मेष व सिंह. शत्रु राशी- कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली. दुसर्‍याचे कल्याण करण्याची वृत्ती. मुडी स्वभाव.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. हौशी व रंगेल स्वभावची त्यात भर पडेल. नेहमी कामात दंग रहाल.. स्वतःची जागा व संसार याबद्दल फार प्रेम वाटेल. कोणतेही नवीन काम आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल. नेहमी कामात व्यस्त रहायला आवडेल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. महिलांसाठी सौंदर्यवर्धक सुपुत्र प्रदान करणारा, कला

कौशल्यासाठी प्रगतीकारक, स्त्रिजीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थी दशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी रवि-बुध-गुरु-शुक्र-शनि-प्लुटो, तृतीयात नेपच्यून, पंचमात मंगळ-हर्षल, षष्ठात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात मंगळ आहे. कौटुबिक सुखामध्ये अडथळे. द्वितीय स्थानी बुध आहे. धनस्थानातील बुध सांपत्ती भरभराट प्राप्त करून देईल. कमिशन बेसीसवर चालणारे धंदे सल्ला मसलत देणे, लेखन, प्रकाशन यापासून उत्तम धनप्राप्ती होईल.धनसंग्रहासाठी हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. मात्र सध्याच्या काळात बचत संस्थातील अनिश्चीतता पाहून योग्य व सुरक्षित सरकारी बँका अथवा तत्सम वित्तीय संस्थामधून गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. राजकारणी लोकांना विशेष फायदा घेता येईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्व कलेमध्ये उत्तम प्रगती करु शकाल. राजकारणींना याचा विशेष फायदा घेता येईल. व्यापारी वर्गालाही हा महिना उलाढालीच्या दृष्टीने चांगला जाईल. धनप्राप्ती स्वपराक्रमाने होईल. प्रवासात सामान व पैसे सांभाळा. वाचून पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नका.

द्वितीयात शनी आहे. आर्थिक व्यवहार जपून करावे. भागीदारीत सतर्क रहा.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. महिलांच्या हातात पैसा खेळत राहील. पतीराज खुष रहातील. मधुर बोलण्यामुळे तणाव घरात येणार नाही. शेजारीपाजारी हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येच्या बळावर अर्थप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव करावा.

शुभ तारखा – 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

मार्च – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी बुध-गुरू-शनि-प्लुटो, तृतीयात रवि-शुक्र-नेपच्यून, पंचमात हर्षल, षष्ठात मंगळ-राहू व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात रवि आहे. पराक्रमाला जोर येईल. शरीरप्रकृती उत्तम राहील. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाची छाप राहील. शास्त्रीय विषय व ललित कला यांची आवड वाटेल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहिल. प्रवासाची आवड वाटेल. राजकारणी लोकांची सत्तेकडे वाटचाल सुरू होईल. कोणत्याही प्रकारच्या लोकांशी सहज मैत्री होईल. यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली आहे.

पंचमात हर्षल आहे. सट्टे लॉटरीचा नाद असल्यास सोडा कारण यशस्वी होणार नाही. संततीविषयक त्रास संभवतो. व्यवहारात सावध रहावे. विवेकाची कास धरा.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व मित्र यांचे संबंध चांगले राहतील. त्यामुळे मन उत्साही व आनंदी राहील. ललितकला प्रगती होईल. काम नीटनेटकेपणाने केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यासात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ राहील.

शुभ तारखा – 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या