त्रैमासिक भविष्य - धनु Quarterly future - Sagittarius

हरहुन्नरीपणामुळे धनप्राप्ती करू शकाल
त्रैमासिक भविष्य - धनु Quarterly future - Sagittarius

सौ. वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर - 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरु- प्लूटो, द्वितीयात शनि, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात मंगळ, पंचमात हर्षल, षष्ठात राहू, दशमात शुक्र, लाभात रवि-बुध, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीचे चिन्ह शरीराचा वरचा भाग धर्नुधारी सज्ज पुरूषाचा अंसा पुरूष मुखरहित घोड्यावर बसलेला आहे. राशी स्वामी गुरू, तत्त्व अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभाव रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्व दिशा फायद्याची. लिंग पुरूष असल्याने काहि स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे. वर्ण क्षत्रिय. स्वभाव -क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यांवर आहे. शुभ रत्न - पुष्कराज, शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस- गुरुवार, देवता- विष्णु, शुभ अंक-3, शुभ तारखा-3,12,21,30. मित्र राशी- मेष व सिंह. शत्रु राशी-कर्क, वृश्चिक, मीन. गुणग्राही वृत्ती. अतिधूर्तता. व्यावहारिकता चांगली. स्वतःला टाळून दुसर्‍याचे कल्याण, लहरी स्वभाव.

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू सिद्धीस जातील. संगीताची आवड वाटेल. सभा-संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीसाठी बुध चांगला. त्यातून अध्यात्मिक उन्नती साधाल. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक व प्राध्यापक यांचा गौरव होईल.

स्त्रियांसाठी -धार्मिकतेकडे कल राहील. बोलतांना कटू शब्द टाळल्यास घरात वातावरण तणावरहीत राहील. अपघातातून आश्चर्यकाररित्या सलामत बाहेर पडाल. पतीराज शब्दाबाहेर जाणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी - पंचमातील गुरू धनस्थानी आहे. विदयार्थी अध्ययनात विशेष प्रगती करू शकतील मात्र आळस झाडून नियमीतपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे लक्षात ठेवा.शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

डिसेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-प्लुटो, द्वितीयात शनि, तृतीयात नेपच्यून, चतुर्थात मंगळ, पंचमात हर्शल, षष्ठात राहू, दशमाम शुक्र, व्ययात केतू, रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. साहजिकच त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता दर्शवितो. वाहनांचे अपघात होऊ नये ही काळजी घ्या. घरी आग किंवा चोरीची घटना घडण्याची शक्यता आहे काळजी घ्या. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकला. वृद्धांनी घरातील मंडळींशी जमवून घ्यावे. अन्यथा उगीचच मनस्तान सहन करावा लागेल. नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. विशेषतः कापूस, चांदी, हिरे यांच्या व्यापार्‍यांसाठी चांगला महिना आहे. वाहनखरेदीसाठी चांगला काळ.

पंचमात हर्षल आहे. सट्टे-लॉटरीचा नाद असल्यास तो सोडावा कारण यश मिळण्याची शक्यता नाही. संततीविषयक काही त्रास संभवतो. संततीच्या स्वास्थ्याची काळती घ्यावी. भावनेच्या भरात प्रेमप्रकरणात चुका होण्याचा संभव.

स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधून गॅस आणि मुलाच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देतो. लेखिकांनी महिलांसंबंधी लेख लिहावे.

विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील. शुभ तारखा - 4, 5, 8, 12,13, 14,16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-शुक्र-नेपच्यून, द्वितीयात बुध-गुरू- शनि, तृतीयात नेपच्यून , पंचमात मंगळ-हर्षल,षष्ठात राहू, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयात गुरू आहे. यास्थानीतील गुरूमुळे विद्वत्तेबद्दल विशेष नावलौकिक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वात विशेष यश मिळेल. केवळ शब्दाने लोकांवर चांगली हुकूमत गाजवता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल.आर्थिक आवक विशेष राहील. सुग्रास भोजन मिळेल. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा विशेष योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्त्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबददल फार प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणते ही काम आत्मसात करून धनप्राप्ती करू शकाल. नेहमी कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सकांना सुंदर पत्नी मिळेल.

स्त्रियांसाठी -ग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी - अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. आळस मात्र टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.शुभ तारखा - 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com