Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मीन Quarterly Future - Pisces

त्रैमासिक भविष्य – मीन Quarterly Future – Pisces

सौ. वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, द्वितीयात हर्षल, तृतीयात राहू , सप्तमात शुक्र,अष्टमात रवि-बुध, नवमात केतू , दशमात गुरू-प्लुटो लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे दी,दू, झा, ज्ञा, था, दे, दो,चा, ची अशी आहेत. राशीचे चिन्ह एकमेकांच्या विरूद्ध तोंड केलेल्या माशांची जोडी आहे. राशी स्वामी – गुरू, तत्त्व- जल, राशी द्विस्वभाव असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची. लिंग- स्त्री, राशीचा अंमल पायावर आहे. पायांच्या दुखापतीविषयी सावध रहा. शुभ रत्न – पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस- गुरूवार, देवता- विष्णु, मित्र राशी- कर्क, वृश्चिक, शत्रु राशी- मेष, सिंह, धनु. अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनशील, विनम्र, कल्पनाप्रिय, उतावळा, हयगयी वृत्ती, अनिश्चितता, परिश्रमी व इनामदार, स्वप्रयत्नाने प्रगती होईल.

तृतीयात हर्षल आहे. कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास जसा त्रास होणार नाही. मोठ्या योजना आखण्याचे काम तूर्तास स्थगित ठेवून पुढे ढकलावे वाहनाच्या संबंधित संस्थातून नोकरी मिळण्याचा हा काळ चांगला आहे. अंथरूण पाहून पाय पसरावेत.

स्त्रियांसाठी -व्यक्तीमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी -विदयार्थीदशा हा खर म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहिल. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

डिसेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, द्वितीयात हर्शल, तृतीयात राहू , सप्तमात शुक्र, अष्टमात रवि-बुध, नवमात केतू, लाभात शनि व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

नवमातील बुध शत्रूंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्याच दृष्ट कारवायामध्ये अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित पाहुणे खूष होऊन तुमची समाजातील छबी आणखीनच उजळेल. प्रगती होईल. तृतीयात राहू आहे. आतापर्यंत भांबावून टाकणार्‍या समस्यांना उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या हा तुमच्या यशाचा बायप्रॉडक्ट आहे. ते सर्व नष्ट होतील. काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमाने शास्त्र संशोधनात तत्संबंधित लोकांना यश मिळेल. मोठ मोठ्या उलाढालीमुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरवर्गाला पदोन्नतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. भयमुक्त वातावरण तयार होईल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कृषी व पशुधनापासून लाभ होतील. राहूसमोर असणारा केतू भाग्यस्थानी विराजमान आहे. राहू-केतू अस्तित्वात नसताना न दिसणार्‍या हवेप्रमाणे मानवी जीवनाववर बरे वाईट परिणाम करतात. भाग्यातील केतू इतरांच्या सहकार्याने तुमच्या जीवनाच्या नावेची प्रगतीपथाकडे जाणार्‍या गतीत वृद्धी करेल. मात्र त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे. अन्यथा तुमची नोैका वादळात सापडेल.

स्त्रियांसाठी – धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12,13, 14,16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-हर्षल, तृतीयात राहू , नवमात केतू , दशमात नेपच्यून-रवि-शुक्र, लाभात बुध-गुरू-शनि व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

राशीच्या लाभात आलेला शनी भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने याची प्रचिती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारे शत्रु एक तर नष्ट होतील किंवा सरळपणाने वागतील. धनसंग्रह करणे शक्य होतील. सत्संगाची गोडी वाढेल. स्त्रियांना आवश्यक असणार्‍या वस्तूंचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना विशेष लाभ होईल. संततीच्या बाबतीत चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या स्वास्थाकडे विशेष लक्ष द्यावे. लबाड मित्रांपासून किंवा नातेवाईकांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

व्ययात नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्‍यांना आरोपी शोधण्यात यश मिळेल. सामाजिक मान्यता मात्र त्याप्रमाणात मिळणार नाही. लोकोपयोगी काम करण्यात आनंद वाटेल.

दशमस्थानी असलेला प्लुटो नेतृत्त्वासाठी फार चांगला आहे. पुढार्‍यांनी प्रगतीसाठी लावलेले फिल्डींग यशस्वी होईल. प्रतिपक्षाशी विरोध पत्करून यशस्वी होऊ शकाल.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी -शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

- Advertisment -

ताज्या बातम्या