त्रैमासिक भविष्य – मीन – Quarterly Future

jalgaon-digital
5 Min Read

सौ. वंदना अनिल दिवाणे

सप्टेंबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी मंगळ- हर्षल, चतुर्थात राहू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि , सप्तमात बुध, दशमात केतू-गुरू-प्लुटो लाभात व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे दी,दू, झा, ज्ञा, था, दे,दो, चा,ची असे आहेत. राशी चिन्ह एकमेकांच्या विरुद्ध तोंड केलेल्या माशांची जोडी असा आहे. राशी स्वामी-गुरू, तत्त्व – जल, राशी स्वामी -गुरू, तत्त्व- जल, राशी द्विस्वभावी असल्याने निर्णयाच्या बाबतीत सदैव तळ्यात मळ्यात चालू असते. उत्तर दिशा फायद्याची आहे. लिंग- स्त्री, सत्वगुणी, वर्ण- ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ – प्रवृत्ती, राशीचा अंमल पायावर. शुभ रत्न- पुष्कराज, शुभ रंग- पिवळा, शुभ दिवस- गुरूवार, देवता- विष्णु, मित्र राशी- कर्क, वृश्चिक, शत्रुराशी- मेष, सिंह, धनु अध्यात्मप्रेमी, भावनाप्रधान, अध्ययनशील, विनम्र, कल्पनाप्रिय, उतावळा, हयगयी वृत्ती, च अनिश्चितता, परिश्रमी व इमानदार स्वप्रयत्नाने प्रगती करेल. दशमात केतू आहे. शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळण्याचा योग. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्या. कारागिरी आवश्यक असलेले काम चांगले जमेल. नीचांची संगत टाळा. प्रवास घडेल. त्यातून आर्थिक प्राप्तीची शक्यता आहे.

स्त्रियांसाठी – हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास टाळावा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्रकृतिची काळजी घ्या.

शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

ऑक्टोबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, द्वितीयात हर्शल , तृतीयात राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि, अष्टमात बुध, नवमात केतू, दशमात

केतू-गुरू-प्लुटो, लाभात शनी, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा त्यात यश मिळेल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होण्याइतपत उत्पन्न मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. उठसुठ रागावणे चांगले नाही. रागावर नियंत्रण ठेवा. लष्करी वृत्तीला अंकुश लावा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. धैर्यशील वृत्तीमुळे संकटात माघार घ्यावी लागणार नाही. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी कामे अथवा राजकृप यातून अर्थप्राप्ती होईल.

द्वितीयात हर्षल आहे. कौटुंबिक खर्चाविषयी अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक शिस्त पाळल्यास तसा त्रास होणार नाही. मोठ मोठ्या योजना आखण्याचे काम तूर्त स्थगित ठेवून पुढे ढकलावे. अंथरूण पाहून पाय पसरावे अन्यथा मोठ्या योजना अर्ध्यातच राहतील. दशमस्थानी असलेल्या प्लूटो नेतृत्त्वासाठी फार चांगला आहे.

स्त्रियांसाठी -धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थीदशा हा म्हणजे जन्मभरर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31

नोव्हेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, मंगळ,द्वितीयात हर्शल, तृतीयात राहू, सप्तमात शुक्र,अष्टमात रवि, बुध, नवमात केतू, दशमात गुरू-प्लुटो, लाभात शनी , व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

व्ययात नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. हॉस्पिटल व तुरुंगाशी संबंधित कामापासून लाभ होतील. लोकोपयोगी काम करण्यात फार आनंद वाटेल.

लाभात शनी आहे. तो भरपूर लाभ देईल. धनप्राप्तीच्या बाबतीत साडेसातीतून तूर्त सुटका झाल्याने याची प्रचिती येईल. तेजस्वीपणाला धार चढेल. कुरघोडी करणारे शत्रु नष्ट होतील किंवा सुतासारखे सरळ होतील. धनसंग्रह करणे शक्य होईल. सत्संगाची गोडी वाटेल. स्त्रियांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना विशेष लाभ होईल.

संततीच्या बाबतीत मात्र काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे. नातेवाईक किंवा लबाड मित्रांकडून फसवणूकीची शक्यता आहे.

तृतीयात राहू आहे. आतापर्यंत तुम्हाला थांबवून टाकणार्‍या समस्यांची उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या ही यशाचा बाय प्रॉडक्ट आहे. ते सर्व नष्ट होतील. काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमामुळे.

स्त्रियांसाठी – महिलांना सौदर्यवृद्धीसाठी ब्युटी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खूष राहील्यामुळे एखाद्या अलंकाराची खरेदी होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. तुमच्या अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र चांगले अभ्यासू असतील.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *