Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - िंसंंह

त्रैमासिक भविष्य – िंसंंह

सौ. वंदना अनिल दिवाणे

मार्च – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतू, षष्ठात बुध-गुरू-शनि-प्लुटो, सप्तमात रवि-शुक्र-नेपच्यून,नवमात-हर्षल दशमात मंगळ- राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे मा,मी, मू, मे, मो, टा,टे, टो, टू, अशी आहेत. राशी चिन्ह सिंह आहे. तत्त्व – अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा वाटतो. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग – पुरूष, सत्व गुणी, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव क्रूर, प्रकृती पित्तकारक, राशीचा अंमल हृदयावर आहे सतर्क रहा. शुभ दिवस रविवार व बुधवार. शुभ अंक- 1 ,शुभ तारखा- 1/10/29. मित्रराशी – मिथून, कन्या, मेष. शत्रु राशी- तुला, मकर, कुंभ. पराक्रमी, अधिकारप्रिय, अति आत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो. मितभाषी, मातृभक्त, शेतीची आवड.

सप्तमात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदाराीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याची शक्यता. थोर व्यक्तींशी वाद विवाद करतांना त्यांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहकार्य मिळेल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील .कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. आळस टाळा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

एप्रिल – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी चतुर्थात केतू, षष्टात गुरू-शनी-प्लुटो, सप्तमात नेपच्यून, अष्टमात रवि-शुक्र- बुध, नवमात हर्शल, दशमात मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल त्यातून फायदाही होईल. खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

अष्टमातील बुध शत्रुंचा नाश करण्यास समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायातील पाहुणे खूष होऊन सामाजिक छबी आणखीन उजळेल.

षष्ठात शनि आहे. शत्रुवर मात कराल. मोठ्या लोकांशी भेटी होतील. देश व स्वधर्म याविषयी आदर वाटेल. हातून सत्कर्म घडेल. शेतकर्‍यांना पशूधनापासून धनप्राप्ती होईल. अध्यात्माची आवड वाटेल.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावेत. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. विवाह ठरवितांना नीट चौकशी करावी.

स्त्रियांसाठी- अष्टमात शुक्र आहे. स्त्री वर्गाला अभिमानाची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व पुढे कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहावे. पतीराज खूष रहातील. खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी – बुध्दीमत्ता तीक्ष्ण राहील. त्यामुळे वार्षिक परिक्षा देणे जास्त अवघड जाणार नाही. लेखनाचा सराव वाढवा. टक्केवारी वाढण्यात मदत होईल.

शुभ तारखा – 4, 5, 7, 8, 13, 17, 18, 19, 21, 22, 24, 25

मे – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतू, षष्ठात शनी-प्लुटा, सप्तमात गुरू-नेपच्यून, नवमात रवि-हर्षल, दशमात बुध-शुक्र-राहु, लाभात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण तरूणींना सद्गुणी जोडीदार मिळेल. थोरांची संगत प्राप्त होईल. समाजोन्नतीसाठी कार्य कराल. लबाड लोकांना वश कराल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्टाच्या कामांत यश मिळेल. पित्यापेक्षा मोठी योग्यता प्राप्त होण्याचे योग आहेत. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व वाटेल. विद्वान लोकांत मान मिळेल.

दशमात शुक्र आहे. हा एक शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. ग्रामीण व शहरी असा भेदभाव रहाणार नाही. मातृ- पितृसुख उत्तम राहील. व्यवसाय, नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती. त्याबरोबी बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहील. राजमान्यता मिळेल. नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍यांना नोकरी मिळेल.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा सल्ला देतात. लेखिकांना महिलांसंबेधीत लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेत चांगला उपयोग होईल. खेळ व टीव्ही.कडे दुर्लक्ष करा. भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 21

- Advertisment -

ताज्या बातम्या