त्रैमासिक भविष्य - सिंह Quarterly Future - Leo

पशुधनापासून धनप्राप्ती
त्रैमासिक भविष्य - सिंह Quarterly Future - Leo

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थ स्थानी केतू, पंचमात रवि-शुक्र-प्लूटो, षष्ठात बुध-गुरू -शनी, सप्तमात नेपच्यून, नवमात मंगळ-हर्षल, दशमात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे अशी आहेत. राशीचे चिन्ह सिंह आहे. तत्त्व-अग्नी, स्थिर रास असल्याने जीवनात कोणताही बदल नकोसा आहे. पूर्व दिशा फायदयाची आहे. लिंग-पुरूष, सत्व गुणी, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, प्रकृती-पित्तकारक. राशीचा अंमल हृदयावर आहे. सतर्क रहा. शुभ दिवस- रविवार. व बुधवार. सूर्य उपासना लाभदायक आहे. शुभ अंक- 1, शुभ तारखा-1,10,19,28. मित्र राशी- मिथून, कन्या, मेष व धनु. शत्रु राशी- तुला, मकर व कुंभ. पराक्रमी, अधिकारप्रिय, अतिआत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो याचे सदैव स्मरण असू द्यावे. मितभाषी, स्वतंत्रवृत्ती, मातृभक्त, शेतीची आवड.

पंचमात शुक्र आहे. विषयलोलुपतेकडे कल राहील. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईदेखील सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाढेल. देवीची उपासना लाभदायक होईल. शत्रुवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललितकला लेखन, सट्टे, शेअर्स यांपासून लाभ होतील.

स्त्रियांसाठी - महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील. शुभ तारखा - 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी केतूू, षष्ठात रवि-बुध-गुरु-शुक्र-शनि-प्लुटो , सप्तमात नेपच्यून, नवमात मंगळ-हर्षल, दशमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. शंकराची उपासना केल्यास या दोषावर नियंत्रण होऊ शकेल. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होण्याची शक्यता आहे.

षष्ठात शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहार विहारामध्ये जपून रहाल. विषयसुखाचा अतिरेक टाळा. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने हे बरे नाही.

षष्टात शनि आहे. शत्रुवर मात कराल. शत्रुचा पराभव मोठ्या कौशल्याने करू शकाल. थोर लोकांशी मैत्री होईल. देश व स्वधर्म याबद्दल फार आदर वाटेल. हाताखालचे लोक खुष राहतील. हातून सत्कर्म घडतील. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना पशुधनापासून धनप्राप्ती होईल. अध्यात्माची आवड वाटेल. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावेत. फसवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावी विवाह ठरवितांना नीट चौकशी करा.

स्त्रियांसाठी - नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. ललीत कलामध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता राहील. त्यामुळे वार्षिक परीक्षा देणे जास्त अवघड वाटणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव जास्त जास्त करावा. टक्केवारी वाढण्यास मदत होईल.शुभ तारखा - 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

मार्च - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थ स्थानी केतू, षष्ठात बुध-गुरू-शनि-प्लुटो, सप्तमात रवि-शुक्र-नेपच्यून, नवमात हर्षल, दशमात मंगळ-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठस्थानी गुरू आहे. यास्थानचा गुरू चांगला नाही असे समजले जाते. त्याचे कारण म्हणजे कामासक्तता वाढून मनुष्य बलहीन होतो. शत्रु जिंकण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीय व्यवसायासाठी हा गुरू पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे आवडेल. नोकरवर्गालाही हा गुरू विशेष चांगला आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होण्यासाठी किंवा इच्छितस्थळी बदली होण्याची शक्यता आहे. शरीरस्थूल होण्याची शक्यता आहे तसे होऊ नये यासाठी नियमीतपणे हलका व्यायाम करा. प्रकृती निरोगी राहील. पचनाच्या किरकोळ तक्रारी चालू राहतील.

मंगळ-गुरू नवपंचम योग होत आहे. नवनवीन कल्पना काढून अर्थप्राप्तीत वाढ करू शकाल. क्रिडाक्षेत्राशी संबंधितांना उत्तम यश प्राप्त होईल. मोठ मोठे व्यवसाय करणार्‍या उद्योगपतींना आपले साम्राज्य विस्तृत करता येईल. सार्वजनिक कार्य करणार्‍यांना त्यांच्या सत्यप्रियतेमुळे समाजात आदर व सन्मान मिळेल. अभिनय व अन्य कलावंतांना त्यांच्या कौशल्यात वाढ झाल्याने उच्च दर्जा प्राप्त करता येईल.

स्त्रियांसाठी - महिलांना पजीराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जास्त चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळा. गेलेला वेळ परत येणार नाही.शुभ तारखा - 2, 3, 9, 14, 15, 16, 22, 23, 24, 27, 30

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com