त्रैमासिक भविष्य – कर्क Quarterly Future – Cancer

jalgaon-digital
5 Min Read

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी शुक्र , चतुर्थात रवि-बुध, पंचमात केतू, षष्ठात गुरू -प्लूटो, सप्तमात शनी, अष्टमात नेपच्यून, नवमात मंगळ, दशमात हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही,हू, हे,हो, डा,डी,डू, डो अशी आहे. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र, तत्त्व जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल, उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्व गुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-मोती, शुभ रंग- पांढरा, क्रिम. शुभ दिन- सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक-2, शुभ तारखा- 2,11,20,29. मित्र राशी- वृश्चिक,मीन, तुला, शत्रु राशी – मेष, सिंह, धनु, मिथुन, मकर व कुंभ. अध्ययनाची आवड आहे. जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंधक, कल्पनाशील योजना तयार करण्यात प्रविण. प्रामाणिक, भावुक, विचारी, परोपकारी, ईश्वरभक्तीमध्ये रस.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. पण असे करणे फायद्याचे रहाणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा व वेळ वाया जातो आणि पदरात निराशा येते. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. त्यातल्या त्यात पिताश्रींकडून काही मिळण्याची अपेक्षा करू नये. आर्थिक सहकार्याची अपेक्षा ठेवू नये. मातृसुखातही काही ना काही अडचणी येतील.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतूू, षष्ठात रवि-शुक्र-प्लुटो , सप्तमात गुरु-बुध-शनि, अष्टमात नेपच्यून, दशमात मंगळ- हर्षल, लाभात राहू, अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठात शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहार विहारामध्ये फार जपून रहाल. विषयसुखाचा अतिरेक केल्यास स्वास्थ्य बिघडेल. एकांतवास प्रिय वाटणार नाही.

दशमात मंगळ आहे. इतरांना सल्ला देऊ शकाल.

इतरांना सल्ला देऊ शकाल. त्यातून त्यांचा फायदाही होईल. मात्र स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे काहीसे कठीण होईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहीली तरी खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

लाभात राहू आहे. अभिमानाची मात्रा वाढवील. अहंकाराची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी.

पंचमात केतू आहे. धर्माचरणाची ओढ लावील. उपासनेत चांगले यश मिळेल. संसारसुखात अडचणी येण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रकृतीविषयी तक्रारी निर्माण होतील. मुली मात्र दिर्घायुषी असतील. मोठ्या मुलाची वागणूक पित्याच्या विरोधात दिसून येते. पत्नीचा चेहरा उतरलेला राहील. याठिकाणी केतू मांत्रिक विद्येची आवड निर्माण करतो.

स्त्रियांसाठी – षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. सप्तमातील गुरूमुळे जोडीदाराशी चांगले पटेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमात केतू, सप्तमात रवि-बुध-गुरू-शुक्र-शनि-प्लुटो, अष्टमात नेपच्यून, दशमात मंगळ-हर्षल, लाभात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात रवि आहे. प्रामाणिकपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍यांना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याचा योग आहे. पूर्वार्धातील आनंदी वृत्तीला नंतर रागीटपणाचे गालबोट लागू देऊ नये. थोर सन्माननीय व्यक्तीशी वादविवाद करण्याची हौस वाटेल. पण त्यांचा बोलतांना नकळत अपमान होऊ नये याची काळजी घ्या. सभेत किंवा स्पर्धेत विजय मिळेल राजकारणी लोकांना याची प्रचिती येईल.

सप्तमात गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण- तरूणींना सद्गुणी व चांगला जोडीदार मिळेल. थोर लोकांची संगत प्राप्त होईल. उत्तम स्थळी प्रवास घडेल. स्वजातीच्या उन्नतीसाठी कार्य कराल.

नवविवाहांचा भाग्योदय होईल. कोर्ट कचेरीच्या कामात वारंवार यश मिळेल. पित्यापेक्षा मोठी योग्यता प्राप्त करण्याचा योग आहे. स्वतःच्या सामर्थ्याविषयी गर्व वाटेल. मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे. गर्वाचे घर खाली ही म्हण लक्षात ठेवावी. विद्वान लोकात मन रमेल.

स्त्रियांसाठी – सप्तमात शुक्र आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थामधून प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होतील.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *