Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मेष Quarterly Future - Aries

त्रैमासिक भविष्य – मेष Quarterly Future – Aries

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्षल, द्वितीयात राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि-बुध, अष्टमात केतू , नवमात गुरू-प्लुटो दशमात शनी, लाभात नेपच्यून, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षर चू,चो,लो,ला, ली,लू, ले,लो अशी आहेत. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी मंगळ, तत्त्व अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल, पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती. राशीचा अंमल डोक्यावर असल्याने डोक्याला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. शुभ रंग लाल, शुभ रत्न- पोवळे, शुभ दिवस- मंगळवार, शनिवार. देवता- शिव, भैरव, मारूती. शुभ अंक- नऊ, शुभ तारखा- 9/18/27. मित्र राशी-सिंह, तुला, धनु. शत्रु राशी- मिथुन, कन्या स्वभाव अत्यंत क्रोधी. कुटुंबाचे उत्तमप्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्विकारण्याची खुमखुमी.

षष्ठात शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहार विहारात जपून रहाल. विषयसुखाचा अतिरेक केल्यास स्वास्थ बिघडेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने योग्य पावले टाका.

स्त्रियांसाठी – षष्ठातील शुक्र नोकरी करणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. त्यात भाग्यात असलेल्या गुरूची साथ चांगल्याप्रकारे लाभेल. स्त्रियांच्या सहनशीलतेत वाढ होईल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा -4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

जानेवारी – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, हर्षल, द्वितीयात राहू , अष्टमात केतू , दशमात गुरू-बुध- शनि, लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. नवमातील बुध शत्रूंचा नाश करण्यास समर्थ आहे.

भाग्यात रवि आहे. जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. बाहेर बोलबाला होईल. काही लोकांना हे सहन न झाल्याने उत्साहात मीठाचा खडा टाकतील. माता पित्याशी म्हणावे असे पटणार नाही. विचारातील जनरेशन गॅपमुळे एकमेकांचे विचार पटत नाही. पण धार्मिक बाबतीत समभाव राहील.

दशमात बुध आहे. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. नावलौकीक वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात यश मिळेल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. वक्तृत्त्वात बहर येईल. प्रतिभेच्या परिसस्पर्शाने पुनित झालेले लेखन लेखकाच्या लेखणीतून उतरेल. सज्जनांची संगत मिळेल. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक आवक वाढेल. ती ही सन्मार्गाने असल्यामुळे तणावरहित स्थिती राहील.

दशमात शनि आहे. भाग्याचे दरवाजे उघडतील.आपल्या बुद्धीने लोकांना चकीत कराल. त्यामुळे जनमानसात आदर वाढेल. धाडसाची कामे कराल. राजाप्रमाणे सुख उपभोगाल. आपल्या क्षेत्रातील मोठे अधिकार प्राप्त होतील. शेतकर्‍यांना शेतीपासून लाभ होतील. नम्रतेमुळे लोकप्रियतेत वाढ होईल.

स्त्रियांसाठी – भाग्यात शुक्र आहे. ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव राहील.

शुभ तारखा – 3, 6, 7, 14, 18, 19, 21, 25, 26, 27, 29 ,30

फेब्रुवारी- 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-हर्षल, द्वितीयात राहू , अष्टमात केतू , दशमात रवि-बुध-गुरू-शुक्र-शनि-प्लुटो, लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्‍याच वेळा त्यात यश मिळेल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होण्याइतके उत्पन्न काहींना मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. उठसूट रागावणे चांगले नाही. नियंत्रण ठेवावे. लष्करी वृत्तीवर अंकूश लावावा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरूजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्तीमुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. जनसेवेची हौस भागवाल. व्यापार, वैद्यकीय, यांत्रिक कामे अथवा राजकृपा यातून अर्थप्राप्ती होईल.

राशीच्या तनूस्थानी हर्षल असल्याने धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी, चंचल एवढेच नव्हे तर इतरांना विचीत्र वाटेल असा राहील. लोकाचार व रूढी यांच्याविरूद्ध वर्तन ठेवण्यात भूषण वाटेल. स्वभाव क्षणात शांत जर क्षणात उच्छुंखल असा राहील.

स्त्रियांसाठी – दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी – माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा – 1, 2, 8, 12, 13, 14, 16, 18, 21, 22, 24, 25, 27, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या