Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मेष Quarterly Future - Aries

त्रैमासिक भविष्य – मेष Quarterly Future – Aries

सौ. वंदना अनिल दिवाणे

सप्टेंबर – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी मंगळ- हर्षल, तृतीयात राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि, षष्ठात बुध, नवमात केतू-गुरू-दशमात शनि लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे चू, चे, चो, ली,ला,लू,लो, आ अशी आहेत. राशीचे चिन्ह- मेंढा, राशी स्वामी- मंगळ,, तत्व – अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल. पूर्व दिशा फायद्याची. लिंग- पुरूष, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव – क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल डोक्यावर. डोक्याला इजा होण्यापासून जपा. शुभ रंग – लाल, शुभ रत्न- पोवळे, शुभ दिवस- मंगळवार व रविवार. देवता- शिव, भैरव, मारूती. शुभ अंक- 9. शुभ तारखा- 9,18,27. मित्र राशी – सिंह, तुला , धनु, शत्रु राशी – मिथून, कन्या. स्वभाव- अत्यंत क्रोधी. कुटुंबाचे उत्तमप्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.

तृतीयात राहू आहे. आतापर्यंत भांबावून टाकणार्‍या समस्यांना उत्तरे सापडतील. पराक्रमास जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या हा यशाचा बाय प्रॉडक्ट आहे. सर्व शत्रु नष्ट होतील. काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमामुळे. शास्त्र संशोधनात तत्संबंधित लोकांना यश मिळेल. सौख्य व विलास उपभोगाल. मोठ मोठ्या उलाढालींमुळे व्यापारर्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरवगाला पदोन्नतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थीदशा हा म्हणजे जन्मभरर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

ऑक्टोबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्शल, द्वितीयात राहू , तृतीयात राहू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि, सप्तमात बुध, अष्टमात केतू, नवमात

केतू-गुरू-प्लुटो, दशमात शनी, लाभात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात बुध आहे. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. भावी पत्नी सुविद्य आहे. व्यापार्‍यांना चांगले भागीदार मिळतील. त्यामुळे आर्थिक आवक वाढेल. कला,कौशल्यात प्रगती होईल. विनोदप्रियतेमुळे घरात व बाहेर तणाव राहणार नाही.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन मिळतील. शत्रुवर विजय मिळेल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललितकला, सट्टे, शेअर्स यापासून लाभ होतील. सरकार दरबारी वजन वाढेल.

तनुस्थानी हर्शल असल्याने धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल राहील. एवढेच नाही तर इतरांना विचीत्र वाटेल असा राहील. स्वतःला कितीही फिलगुड वाटले तरी इतरांना वाटेलच असे नाही. लोकाचार व रूढी परंपरा यांच्याविरूद्ध वर्तन ठेवण्यात भूषण वाटेल.

स्त्रियांसाठी -पंचमात शुक्र आहे. धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्र्रकृतीची काळजी घ्या.

शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31

नोव्हेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्शल,द्वितीयात राहू, षष्टात शुक्र,सप्तमात रवि, बुध, अष्टमात केतू, नवमात गुरू-प्लुटो, दशमात शनी , लाभात नेपच्यून, व्ययात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

भाग्यात गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील, लोकांना दिलेला सल्ला त्यांना लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक मिळेल. त्यामुळे पुष्कळ लोकांचा विश्वास संपादन होईल. जनशक्तीच्या आधारावर आपल्या उद्योग व्यवसायात प्रगती होईल. विद्वान लोकांत गौरव प्राप्त होईल. परदेशगमन केलेल्यांचा भाग्योदय होईल. शक्तीप्रमाणे देशसेवा घडेल. काटकसरीची वृत्ती ठेवल्यास अडचण येणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राची आवड वाटेल.

नवमात प्लूटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर त्यात यश मिळेल. हे विश्वची माझे घर अशी विश्व भावना राहील. अध्यात्मिक बंधुत्वाची भावना राहील. अध्यात्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

दशमात शनी आहे.भाग्याचे दरवाजे उघडतील. आपल्या बुद्धीमत्तमने लोकांना चकीत कराल. त्यामुळे जनमाणसात आदर निर्माण होईल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे कराल. थोर व्यक्तींबरोबर वाद विवाद घडण्याची शक्यता..

स्त्रियांसाठी -षष्ठात शुक्र आहे. नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. भाग्यात असलेल्या गुरूची त्यासाठी चांगली साथ लाभेल. स्त्रियांची सहनशीलता उत्तम राहील.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्म स्मरणशक्ती व उत्तम बुद्धीमत्ता यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 4, 5, 8, 12, 13, 14, 16, 19, 20, 21, 23, 24, 28, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या