Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - कुंभ Quarterly Future - Aquarius

त्रैमासिक भविष्य – कुंभ Quarterly Future – Aquarius

मे – 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या स्थानी गुरू- नेपच्यून, तृतीयात रवि-हर्षल, चतुर्थात बुध-राहू-शुक्र, पंचमात मंगळ, दशमात केतू, व्ययात शनी-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास -राशीची आद्याक्षरे गू, गे, गो, सा, सी, सू, सो, से, दा अशी आहेत. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष असे आहे राशी स्वामी शनी, तत्त्व वायु, राशी स्वामी शनी, तत्त्व वायु, राशी स्वामी स्थिर असल्यामुळे जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जेवढा वर चढतो तेवढाच पटकन तो खालीही येतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष. तमोगुणी स्वभाव काहीसा क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यांवर आहे. पायाला इजा होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. शुभ रत्न निलम. शुभ रंग आकाशी, निळा व काळा. देवता- शनि व हनुमान. शुभ अंक- 8, शुभ तारखा – 8/17/26.

तृतीयात हर्षल आहे. लेखक वर्गांसाठी चांगला काळ आहे. लेखनात सूर लागेल. प्रसिद्धी मिळेल. नावलौकीक वाढेल. ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. विचित्र स्वभावाच्या लोकांपासून दूर रहा. अन्यथा नुकसान होईल.

व्ययातील प्लूटोने खर्चाचे प्रमाण काहीसे वाढविले तरी अध्यात्मात उत्तम प्रगती होऊन मानसिक शांती मिळेल.

स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना नुसतेच खेळ व मनोरंजनाकडे लक्ष न देता पुढील वर्षाची शैक्षणिक तयारी करावी. म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष आारामदायी जाईल.

शुभ तारखा -1, 3, 4, 5, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 26, 28, 30, 31

जून – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू- नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात रवि-बुध-राहू. पंचमात शुक्र, षष्ठात मंगळ, दशमात केतू व्ययात शनी-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठात मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे सामर्थ्य त्यात आहे. शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कौटुंबिक वातावरण शांत राहील. पंडीतजनांशी मैत्री राहील. वेळोवेळी त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. पंचमात शुक्र आहे. सरकारी दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावई सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक ठरेल. शत्रुवर विजय मिळेल. तीर्थयात्रा घडण्याचे योग. ललित, कला, लेखन, सट्टे शेअर्स यापासून लाभ होतील.

चतुर्थात रवि आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारख्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. शेतकर्‍यांना शेतीवाडीपासून चांगला फायदा मिळेल. वृद्धांसाठी हा महिना चांगला आहे. शारिरीक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. व्यापारातून आर्थिक लाभ होतील.

स्त्रियांसाठी -नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही. अभ्यासू मित्र जवळ करा.

शुभ तारखा – 2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू – नेपच्यून, तृतीयात हर्षल, चतुर्थात बुध-राहू, पंचमात रवि, षष्ठात मंगळ-शुक्र, दशमात केतू , व्ययात शनी-प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल परंतू तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा प्रयत्न वेळ वाया जातो व शेवटी पदरात काही पडत नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. वडिलांकडून आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता कमी आहे. मातृसुखात अडचणी येतील पण निराश होण्याचे काही कारण नाही. काळ कधीही थांबत नाही.

दशमातील केतूमुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बुद्धी तीक्ष्ण राहील. नीचांची संगत टाळा. नसत्या भानगडीत अडकाल.

व्ययात शनी आहे. धार्मिक बाबतीत स्वतंत्र मते असली तरी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा राहील. आळसाचा आळस करा. उत्साहाने कामाला लागा. यश तुम्हाला शोधत येईल. शनीला मेहनत व कष्ट करणारी व्यक्ती आवडते. फळ देतांना तो विलंब करतो पण हात आखडता घेत नाही.

स्त्रियांसाठी – षष्ठतील शुक्र नोकरी करू इच्छिणार्‍या तरूणींना तशी संधी उपलब्ध करून देईल. लग्नी असलेल्या गुरूमुळे स्वास्थ उत्तम राहील. हलका व्यायाम करावा. सहनशीलतेत वाढ हा

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या